कर्नाटकात खळबळ, माजी आमदाराच्या मुलाची हत्या; जळालेल्या कारमध्ये...

धारवाड: कर्नाटकच्या धारवाडजवळील एका निर्जनस्थळी जळालेल्या कारमध्ये कोळसा झालेला मृतदेह सापडल्याने हत्येचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. हा मृतदेह राजू बोलाशेटी यांचा असल्याचे निष्पन्न झाले असून ते बैलहोंगळचे माजी आमदार बाबुराव बोलाशेटी यांचे पुत्र होते. बैलहोंगळमधील उडीकेरी गावचे रहिवासी असलेले राजू प्रामुख्याने शेती व्यवसायात होते आणि सोमवारपासून ते बेपत्ता होते.


कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारभर त्यांचा फोन वाजत होता पण त्यांनी तो उचलला नाही. अखेर मध्यरात्री अडीचच्या सुमारास त्यांचा फोन स्विच ऑफ झाला. सकाळी आपल्या शेतात जाणाऱ्या स्थानिक नागरिकांना जळालेली कार दिसली आणि त्यांनी तात्काळ पोलिसांना पाचारण केले. कारमधील मृतदेह पूर्णपणे जळून कोळसा झाल्यामुळे ओळख पटवणे कठीण होते. मात्र पोलिसांनी कारच्या नंबर प्लेटवरून ही गाडी राजू बोलाशेटी यांचीच असल्याची पुष्टी केली.


प्राथमिक तपासानुसार राजू यांची दुसऱ्या एखाद्या ठिकाणी हत्या करण्यात आली असावी आणि त्यानंतर त्यांचा मृतदेह त्यांच्याच कारमधून रामापूरच्या वेशीवर आणला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने गुन्हेगारांनी मृतदेहासह कार पेटवून दिली असावी. पोलिसांनी घटनास्थळावरून एक शस्त्र जप्त केले असून, त्याचा सखोल तपास सुरू आहे.


स्थानिक पोलिसांसह फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि ठसे तज्ज्ञांच्या पथकाने घटनास्थळाला भेट देऊन पुरावे गोळा केले आहेत. या हत्येमागचा नेमका उद्देश आणि आरोपींची ओळख अद्याप पटलेली नाही. मात्र पोलिसांनी अधिकृतपणे गुन्हा दाखल केला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी शोधमोहीम तीव्र केली असून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.

Comments
Add Comment

Shopian Terror Case : जम्मू आणि काश्मीरच्या शोपियानमध्ये तीन संशयितांना अटक, हँड ग्रेनेड आणि पोस्टर्स जप्त

श्रीनगर : काश्मिरी पंडितांना असलेला धोका आणि दक्षिण काश्मीरमध्ये सुरू असलेल्या दहशतवादविरोधी मोहिमेच्या

Dattatray Bharne : पीएमएफएमई योजनेत महाराष्ट्राचा राष्ट्रीय गौरव; अतीउत्कृष्ट कामासाठी प्रथम पुरस्काराने सन्मान

“पीएमएफएमई योजनेला मिळालेला पुरस्कार महाराष्ट्रातील शेतकरी, महिला, युवा आणि कृषी विभागाच्या मेहनतीची पावती”:

Artificial Intelligence : शिक्षणात AI चा वाढता प्रभाव, भारताची शैक्षणिक व्यवस्था आता बदलणार

मुंबई : AI आता फक्त तंत्रज्ञान क्षेत्रापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. ते थेट वर्गखोल्यांपर्यंत पोहोचलं आहे. पण

Kashmiri Pandit Threat Letter : काश्मिरी पंडितांना १५ दिवसांत दुसऱ्यांदा धमकीचं पत्र; वैयक्तिक माहिती व्हायरल, सुरक्षा यंत्रणा सतर्क

काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काश्मिरी

Tamil Nadu Gold Ring Scheme : ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर; ७५५ कोटींचा खर्च, ‘या’ बाळांना मिळणार १ ग्रॅम सोनं!

चेन्नई : तामिळनाडू सरकारने तब्बल ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर दिल्याने सध्या या निर्णयाची चर्चा सुरू

INS Mangrol : ‘आयएनएस मंगरोल'मुळे नौदलाची ताकद वाढली; पाण्याखालील शत्रूंच्या हालचालींवर ठेवणार नजर!

नवी दिल्ली : भारतीय नौदलाची सागरी ताकद आणखी वाढली आहे. स्वदेशी बनावटीची ‘आयएनएस मंगरोल’ (INS Mangrol) ही पाणबुडीविरोधी