रशियाकडून ६ कोटी बॅरल तेल खरेदी, एप्रिल महिन्यात होणार पुरवठा

नवी दिल्ली : आखाती देशातील युद्धस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताने रशियाकडून तब्बल ६ कोटी बॅरल तेलाची खरेदी केली आहे. एप्रिल महिन्यात या तेलाचा पुरवठा होणार आहे. अमेरिका-इस्रायल आणि इराणमध्ये युद्ध सुरू असल्याने होर्मूझच्या सामुद्रधुनीतील जल वाहतूठ ठप्प झाली आहे. त्यामुळे देशाला होणारा तेल पुरवठा आटला आहे. अमेरिकेने रशियन तेल खरेदीसाठी ३० दिवसांची मुभा दिली आहे. एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात ही मुदत संपणार आहे. त्यामुळे भारताने रशियन तेलाची खरेदी वाढविली आहे. मात्र, वाढलेल्या मागणीच्या पार्श्वभूमीवर रशियाने ब्रेंट क्रूडच्या तुलनेत ५ ते १५ डॉलर अधिक आकारण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी भारताला सवलतीच्या दरात तेल देण्यात येत होते. केप्लर या तेल बाजार अभ्यासक संस्थेच्या मते चालू महिन्याप्रमाणेच एप्रिलमध्ये रशियन तेल येईल. मात्र, फेब्रुवारीच्या तुलनेत दुप्पटीने रशियन तेल भारतात येईल.

Comments
Add Comment

देशामध्ये १०० नवीन विमानतळ, २०० हेलीपॅड उभारणार, केंद्रीय मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत देशाच्या विमान वाहतूक, इमिग्रेशन आणि

देशभरात पेट्रोल-डिझेल, एलपीजीचा पुरवठा सुरळीत, सर्वपक्षीय बैठकीत सरकारची स्पष्टोक्ती

नवी दिल्ली  : पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज सर्वपक्षीय बैठकीचे

पीएनजी असलेल्या भागात एलपीजी पुरवठा होणार बंद

नवी दिल्ली : देशातील ऊर्जा साखळीत मोठी सुधारणा करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले

आकाशवाणीवरुन २६ मार्चपासून "वंदे मातरम्" राष्ट्रीय गीताची पूर्ण आवृत्तीचे प्रसारण

नवी दिल्ली : स्वातंत्र्यानंतर आकाशवाणी केंद्रांच्या सकाळच्या प्रसारणाची सुरुवात वैशिष्ट्यपूर्ण 'सिग्नेचर

सोनिया गांधी रुग्णालयात दाखल; प्रकृती स्थिर

नवी दिल्ली : पोटात संसर्ग झाल्याची तक्रार केल्यानंतर काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना मंगळवारी

पीएनजी आणि सीएनजी पुरवठ्यावर भर; भारताकडे पुरेसा इंधन साठा

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर, सरकारने बुधवारी देशातील पेट्रोलियम