Ashok Kharat: न्यायालयात बोलताना जादुटोणाबाबत काय म्हणाला अशोक खरात?

मुंबई: महिलांवर लैंगिक अत्याचार आणि तंत्र-मंत्राचा वापर करीत अमानुष अत्याचार करणाऱ्या अशोक खरात याला न्यायालयाने २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ३० वर्षांच्या महिलेचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून सुरू झालेला हा तपास आता थेट मानवी बळी आणि वन्यजीव शिकारीपर्यंत पोहोचल्याने संपूर्ण राज्य हादरले आहे. नाशिक न्यायालयात आज न्यायाधीशांनी अशोक खरात याला तुम्हाला काही बोलायचं आहे का? अशी विचारणा केली असता अशोक खरातने स्वतः बाजू मांडली.



अशोक खरात न्यायालयात काय म्हणाला?


1 जादूटोणा याबाबत मला काहीही माहिती नाही
2 साप, वाघ, हरिण हे सगळं मी आत्ताच ऐकत आहे
3 या अगोदर पोलिसांनी मला याबाबत कोणताही प्रश्न विचारलेला नाही
4 मी पूजा करत असताना ईशान्येश्वर मंदिरात एकाच वेळी शंभरहून अधिक लोकं असायचे
5 ईशान्येश्वर मंदिरात शिवरात्र आणि श्रावणी सोमवार अशावेळी जात होतो
6 सात दिवसांच्या पोलीस कोठडीत जे प्रश्न विचारले त्याची उत्तर मी दिली आहेत
7 साप, वाघ याबद्दल मला काहीच माहिती नाही.



अशोक खरातच्या संपत्तीचा सातबारा


नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत खरातच्या तब्बल ५२ मालमत्ता आहेत...
पाथर्डीत १५० कोटींची ३० एकर जमीन
सिन्नरच्या कहांडळवाडीत ५ कोटींची ४५ एकर जमीन
पाथर्डी, गौळाणेत ३० कोटींहून अधिक किमतीची जमीन
गौळाणेत मोक्याच्या जागी १५ भूखंड
सिन्नरमध्ये १ कोटीचे २ व्यापारी गाळे
मीरगावात १० कोटींहून जास्त किमतीचे फार्म हाऊस
अहिल्यानगरमध्ये ५ एकरांचा कोट्यवधींचा भूखंड
ओझर विमानतळाजवळ ५ कोटींची जमीन
जानोरी, दहावा मैल भागात मोक्याचे भूखंड
नाशिकमध्ये कॅनडा कॉर्नरवर सुमारे एक कोटीचं ऑफिस
कर्मयोगीनगरमध्ये ५ कोटींचा बंगला
शिर्डीच्या पानमळ्यात ३० गुंठ्यांची कोट्यवधींची जागा
निघोजमध्ये ४ एकरांची कोट्यवधींची जागा
शिर्डीमध्ये ७० कोटींचे प्लॉट
मिरगावातल्या घरी लाखोंची कॅश
वेगवेगळ्या ठिकाणी ३० फ्लॅट
सिन्नरमध्ये महत्त्वाच्या जागांवर दुकानं
आणि ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टची दोन कोटींची वार्षिक उलाढाल


Comments
Add Comment

राज्यात लॉकडाऊन अजिबात लागणार नाही - मुख्यमंत्री फडणवीस

- अफवा पसरवणाऱ्यांना फौजदारी कारवाईला सामोरं जावं लागेल युद्धाच्या पार्श्वभूमीवर राज्यात इंधन आणि गॅसचा

Ashok Kharat Case Update: अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट समोर, भोंदूबाबाची HIV टेस्ट पॉझिटिव्ह की निगेटिव्ह?

नाशिक: नाशिकमधील भोंदुबाबा अशोक खरातच्या अत्याचार प्रकरणाने महाराष्ट्राचे राजकीय, सामाजिक वातावरण ढवळून

एसआयटीला अशोक खरातच्या ऑफिसमध्ये काय काय दिसलं?

मुंबई: अशोक खरात याला न्यायालयाने २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या अशोक खरातची एसआयटीकडून कसून

श्रीरामपूरमध्ये राम नवमीदिवशी मिरवणुकीवर दगडफेक, १२ जणांवर गुन्हा

अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात रामनवमीच्या उत्सवाला दगडफेकीचे गालबोट लागले आहे. गोंधवणी

Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात विरुद्धच्या तक्रारींना पूर; SIT च्या हेल्पलाईनवर १०० हून अधिक तक्रारी दाखल

मुंबई : महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या भोंदू अशोक खरात प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढतच आहे. अघोरी पूजा आणि

Maharashtra Rain Update: राज्यातील 'या' भागात दोन दिवस वादळी पावसाचा अलर्ट

मुंबई: सध्या राज्यातील काही भागात अंशतः हवामान आभाळी असून ही स्थिती या आठवड्यात कायम राहण्याची शक्यता आहे.