Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात विरुद्धच्या तक्रारींना पूर; SIT च्या हेल्पलाईनवर १०० हून अधिक तक्रारी दाखल

मुंबई : महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या भोंदू अशोक खरात प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढतच आहे. अघोरी पूजा आणि महिलांच्या शोषणाच्या आरोपांमुळे आधीच चर्चेत असलेल्या या प्रकरणात आता धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या SIT ने जाहीर केलेल्या हेल्पलाईनवर अवघ्या काही दिवसांत तक्रारींचा अक्षरशः पूर आला असून, खरातने केवळ महिलांचाच नाही तर राजकीय नेते आणि सेलिब्रिटींनाही कोट्यवधींनी गंडा घातल्याची माहिती समोर येत आहे.



हेल्पलाईनवर १०० हून अधिक तक्रारी :


SIT ने माहिती गोळा करण्यासाठी सुरू केलेल्या हेल्पलाईनवर आतापर्यंत १०० हून अधिक फोन कॉल्स आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने नाशिक, पुणे आणि अहिल्यानगर परिसरातील नागरिकांचा समावेश आहे. अनेक महिलांनी स्वतः पुढे येत खरातकडून झालेल्या अत्याचार आणि फसवणुकीबाबत धक्कादायक माहिती दिली आहे.



‘चमत्कारी’ खड्यांच्या नावाखाली लाखोंची फसवणूक :


तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, खरातने ‘रत्न’ आणि ‘मौल्यवान खडे’ देण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केली. बाजारात केवळ ५० रुपयांना मिळणारे खडे ‘चमत्कारी’ असल्याचे सांगून तो १ ते २ लाखांना विकले. या प्रकारे शेकडो लोकांना लाखोंचा गंडा घातल्याचे समोर आले आहे.



राजकीय नेते आणि सेलिब्रिटीही जाळ्यात :


या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, खरातच्या जाळ्यात केवळ सामान्य नागरिकच नाही, तर अनेक बडे राजकीय नेते आणि सेलिब्रिटीही अडकले होते. राजकीय यश आणि भविष्यातील संकट टाळण्यासाठी अनेक जण त्याच्याकडे जात असल्याची माहिती आहे. ‘भविष्य सांगणे’ आणि ‘विशेष विधी’ यांच्या नावाखाली खरातने मोठ्या रकमांची उकळपट्टी केली.



महिलांच्या तक्रारींमुळे वाढल्या अडचणी :


आर्थिक फसवणुकीसोबतच अनेक महिलांनी शारीरिक शोषणाच्या तक्रारी केल्यामुळे खरातच्या अडचणी अधिकच वाढल्या आहेत. अघोरी पूजा आणि तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलांवर अत्याचार केल्याचे आरोप गंभीर स्वरूपाचे आहेत. पोलिस आता या तक्रारींवर आधारित ठोस पुरावे गोळा करत आहेत.


या संपूर्ण प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता असून, तपास जसजसा पुढे सरकत आहे तसतशी नव - नवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे.

Comments
Add Comment

Nagpur News : नागपुरात खळबळ! नामांकित 18 शाळांना एकाच वेळी अचानक सुट्टी जाहीर; 'या' धक्कादायक कारणामुळे पालक धास्तावले

नागपूर : नागपूर शहरातील काही नामांकित शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी देणारे ईमेल मिळाल्यानंतर सुरक्षेचा प्रश्न

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रातील पावसाची प्रतीक्षा कायम; हिंगोली-नांदेडला यलो अलर्ट, हवामान विभागाचा इशारा

मुंबई : राज्यातील हवामानात सध्या चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मागील काही दिवसांपासून अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस

Mumbai Port Crane Accident : मुंबई पोर्टवर कार्गो उचलताना मोठी दुर्घटना; क्रेनला आग, दोन ऑपरेटर जखमी

मुंबई : मुंबई पोर्ट परिसरातील बीपीएस (BPS) पोर्ट येथे कार्गो उचलण्याच्या कामादरम्यान रविवारी (३० ऑगस्ट) सायंकाळी

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरपर्यंत ठराविक वेळेत वाहतूक बंद

मुंबई : समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आहे. मुंबई-नागपूर समृद्धी

Pune Ganeshotsav : गणेशोत्सवात ‘प्लाझ्मा साऊंड’ आणि लेझरला बंदी; डेसिबल मर्यादा ओलांडल्यास मंडळांवर कारवाई

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना ध्वनिप्रदूषण आणि

Ganeshotsav 2026 Sound Restrictions : गणेशोत्सवात ‘प्लाझ्मा साऊंड’ आणि लेझरला बंदी; डेसिबल मर्यादा ओलांडल्यास मंडळांवर होणार थेट कारवाई

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी महत्त्वाच्या