श्रीरामपूरमध्ये राम नवमीदिवशी मिरवणुकीवर दगडफेक, १२ जणांवर गुन्हा

अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात रामनवमीच्या उत्सवाला दगडफेकीचे गालबोट लागले आहे. गोंधवणी परिसरातून श्रीराम मंदिराच्या दिशेने निघालेल्या भव्य शोभायात्रेवर अचानक दगडफेक झाल्याने एकच खळबळ उडाली. सय्यद बाबा चौकातील दर्गा परिसरात ही घटना घडली आहे. यामध्ये दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी तातडीने धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. सध्या श्रीरामपूरमध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून शहरात तणावपूर्ण शांतता आहे.



कशी झाली दगडफेक?



मिळालेल्या माहितीनुसार, श्रीरामपूरमधील गोंधवणी येथून रामनवमीनिमित्त पारंपरिक शोभायात्रा काढण्यात आली होती. ही मिरवणूक उत्साहात श्रीराम मंदिराकडे जात असताना सय्यद बाबा चौकातील दर्गा परिसरात पोहोचली. याच वेळी अचानक मिरवणुकीच्या दिशेने दगड येण्यास सुरुवात झाली.


यामुळे मिरवणुकीत सहभागी असलेल्या भाविकांमध्ये मोठी धावपळ उडाली. या हल्ल्यात दोन तरुण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, सय्यद चौकातील काही स्थानिकांनी दावा केला आहे की, आधी मिरवणुकीतून दगडफेक करण्यात आली होती. या परस्परविरोधी दाव्यांमुळे तणाव अधिकच वाढला.



मौलाना आणि १२ जणांविरोधात गुन्हा दाखल



या घटनेप्रकरणी सुयोग झिरांगे यांनी श्रीरामपूर पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी मस्जिदमधील मौलाना आणि इतर १० ते १२ अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी घटनेचा पंचनामा सुरू केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दगडफेक करणाऱ्यांचा शोध घेतला जात आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी स्वतः श्रीरामपूरमध्ये तळ ठोकून आहेत.



आमदार संग्राम जगतापांचा रांगडा अवतार



अहिल्यानगर जिल्ह्यात एका बाजूला श्रीरामपूरमध्ये तणावाचे वातावरण असताना, दुसरीकडे अहिल्यानगर शहरात मात्र राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित रामनवमी मिरवणुकीत आमदार जगताप यांनी चक्क 'अफजल खान वध' आणि 'गर्व से कहो हम हिंदू हैं' असे पोस्टर्स झळकवले. मिरवणूक कोतवाली पोलीस ठाण्याच्या चौकात येताच कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावर उचलून घेतले आणि आमदारांनी भगवा पंचा फिरवत, दंड थोपटत जोरदार नृत्य केले.



तब्बल १० वर्षांनंतर पारंपरिक मार्गावरून मिरवणूक



अहिल्यानगर शहरात यंदाची रामनवमी विशेष ठरली, कारण तब्बल १० वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर ही मिरवणूक पुन्हा एकदा पारंपरिक मार्गाने काढण्यात आली. हजारोंच्या संख्येने तरुण या मिरवणुकीत सहभागी झाले होते. आमदारांच्या आक्रमक पवित्र्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. प्रशासनाने या मिरवणुकीसाठी ड्रोन आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोख बंदोबस्त ठेवला होता, जेणेकरून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये.


श्रीरामपूरमधील दगडफेकीच्या घटनेनंतर पोलिसांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे. सोशल मीडियावर कोणतीही आक्षेपार्ह पोस्ट किंवा अफवा पसरवू नका, असा इशारा देण्यात आला आहे. श्रीरामपूरमधील संवेदनशील भागात सध्या राज्य राखीव दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या असून, परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Comments
Add Comment

Pune-Mumbai Highway : काळोखात भरधाव कारचा भीषण अपघात; ओढ्यात कोसळून दोन तरुणांचा मृत्यू

लोणावळा : जुन्या पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी, २७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला.

Pune News : 'MH 12' ची जागा आता 'MH 61' ने घेतली; व्हीआयपी नंबरसाठी पुणेकरांची तुफान गर्दी  

पुणे: पुणेकरांच्या अस्मितेचा आणि जिव्हाळ्याचा विषय असलेली 'MH 12' वाहन नोंदणी मालिका संपल्यानंतर पुणे प्रादेशिक

Shilpa Gavare death case : शिल्पा गवारे मृत्यू प्रकरणाचा मुळापर्यंत तपास करा; डॉ. नीलम गोऱ्हेंची मागणी

पिंपरी-चिंचवड :  वाकडमधील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरणाचा मुळापर्यंत जाऊन निष्पक्ष तपास करावा, अशी मागणी विधान

Raksha Bandhan 2026 : रक्षाबंधनाला ग्रहणाचा सावट नाही, पण सकाळचा मुहूर्त चुकला ? जाणून घ्या दुपारी राखी कधी बांधायची!

आज २८ ऑगस्ट रोजी देशभरात भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा आणि पवित्र नात्याचा 'रक्षाबंधन' हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला

Maharashtra Weather Update: हवामानात मोठा बदल! उकाडा वाढला, पाऊस गायब; आज तुमच्या भागात सरी कोसळणार की नाही?

मुंबई :  महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने उघडीप घेतल्याचे चित्र आहे. राज्यातील बहुतांश भागात सध्या हलका ते मध्यम

Pro Govinda Season 4 : प्रो गोविंदा सीझन ४ चा थरार रंगला; विजेत्यांवर बक्षिसांची लयलूट, दहीहंडी ऑलिम्पिकपर्यंत नेण्याचा निर्धार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव यांच्या हस्ते