राज्यातील कापूस खरेदीला मुदतवाढ मिळावी यासाठी केंद्राकडे मागणी; मंत्री जयकुमार रावल यांची विधान परिषदेत माहिती

मुंबई : राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि जास्तीत जास्त कापूस सरकारी दराने खरेदी केला जावा, यासाठी कापूस खरेदी प्रक्रियेला मुदतवाढ देण्याची मागणी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे केली आहे. विधान परिषदेत आमदार संजय खोडके यांनी उपस्थित केलेल्या अल्प सूचना प्रश्नाला उत्तर देताना मंत्री जयकुमार रावल यांनी ही महत्त्वाची माहिती दिली.


यंदाच्या हंगामात कापूस खरेदीसाठी राज्य सरकार आणि भारतीय कापूस महामंडळ (CCI) यांनी युद्धपातळीवर प्रयत्न केले आहेत. मंत्री रावल यांनी सांगितले की, यंदा राज्यात आतापर्यंत सुमारे १०,८८३ कोटी रुपयांच्या कापसाची खरेदी करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या १२८ केंद्रांच्या तुलनेत यंदा १६८ केंद्रांना मंजुरी देण्यात आली होती, त्यापैकी १६२ केंद्रे प्रत्यक्ष कार्यरत होती. या केंद्रांच्या माध्यमातून आतापर्यंत १३७ लाख क्विंटल कापूस खरेदी करण्यात यश आले आहे.


कापूस खरेदीची मूळ मुदत २७ फेब्रुवारीपर्यंत होती, मात्र राज्याची विनंती लक्षात घेऊन केंद्राने ती १५ मार्चपर्यंत वाढवली होती. या वाढीव १५ दिवसांच्या कालावधीतही शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून, सुमारे ९.९० लाख क्विंटल अतिरिक्त कापसाची खरेदी करण्यात आली आहे. आता उर्वरित शेतकऱ्यांचा कापूसही खरेदी व्हावा, यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला आहे.

Comments
Add Comment

Makarand Jadhav-Patil : नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना ८६.६५ कोटींची मदत; मंत्री मकरंद जाधव-पाटील

नाशिक विभागातील नाशिक, अहिल्यानगर व जळगाव जिल्ह्यांसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : “खरीप २०२५ मध्ये

Hasan Mushrif : किडनी, यकृत प्रत्यारोपणाच्या सुविधा शासकीय रुग्णालयांत वाढविण्यावर भर द्या; वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई : राज्यातील गरजू रुग्णांना किडनी व यकृत प्रत्यारोपणाची सुविधा शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून

Bharat Gogawale : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कामांना गती द्या; मंत्री भरत गोगावले

मुंबई : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरजू नागरिकांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून

Arrested for throwing eggs : माझगावच्या मोरया गणपतीच्या मिरवणुकीवर अंडी फेकल्याप्रकरणी दानिश शेर खानला अटक, भायखळा पोलिसांची कारवाई

Mumbai : २३ ऑगस्ट रोजी माझगावच्या मोरया गणपती मंडळाच्या मिरवणुकीत अंडी फेकल्याच्या आरोपानंतर मुंबईच्या भायखळा

Mantralay : मंत्री कार्यालयातील ‘उसनवारी’ आणि ‘मौखिक’ नेमणुका रद्द, १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात परतावे लागणार; मुख्य सचिवांचे आदेश

मुंबई : विहित नियम आणि कायदेशीर प्रक्रिया डावलून मंत्रालयीन विभागांत तसेच मंत्र्यांच्या कार्यालयांत बाह्य

Basic Marathi : रिक्षा-टॅक्सी चालकांना जुजबी मराठी शिकण्यासाठी आणखी कालावधी मिळणार

मुंबई : महाराष्ट्रात रिक्षा-टॅक्सी चालविणाऱ्या अमराठी चालकांना प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी व्यावहारिक मराठी