मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेची रत्नागिरी जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई : मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा मिळाल्यानंतर त्याचा लाभ प्रत्यक्षात मिळवताना रत्नागिरी जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायिकांना येणाऱ्या अडचणींचा आढावा घेण्यासाठी आज मंत्रालयात मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस लांजा-राजापूरचे आमदार किरण सामंत, मत्स्यव्यवसाय सचिव एन.रामास्वामी, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत तसेच सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्हाधिकारी (दूरदृष्य प्रणालीद्वारे) उपस्थित होते.


मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेची माहिती मच्छिमारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवून याची अंमलबजावणी गतीने करण्याचे निर्देश मंत्री नितेश राणे यांनी यावेळी दिले. तसेच मिरकरवाडा टप्पा ३ च्या कामासाठी सविस्तर आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मरीन क्लस्टर प्लॅन तयार करून मत्स्य व्यवसायाचा सर्वांगीण विकास साधण्यावर भर देण्याचेही निर्देशही यावेळी मंत्री राणे यांनी दिले. यासोबतच मिरकरवाडा बंदरातील जुन्या बोटी हटवण्याचे निर्देशही यावेळी मंत्री नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी रत्नागिरी जिल्ह्यातील बंदरे विभागाच्या विविध कामांचा आढावा घेऊन जिल्ह्यातील नद्यांमधील गाळ उपसा करण्यासंदर्भात देखील यावेळी सविस्तर चर्चा झाली.

Comments
Add Comment

Mumbai News : 'आमचे मृतदेह घेऊन जा', कुलाबा सामूहिक मृत्यू प्रकरणात नवे खुलासे

मुंबई : मुंबईतील कुलाबा येथील नेव्ही नगरमधील सामूहिक मृत्यू प्रकरणाच्या तपासात नवनवीन माहिती समोर येत आहे. या

BEST Employees Strike : बेस्ट कर्मचाऱ्यांचा आजपासून बेमुदत संप; सकाळी ११.३० वाजल्यापासून आंदोलनाला सुरुवात

मुंबई : मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासाचा महत्त्वाचा आधार असलेल्या बेस्ट सेवेवर आजपासून संपाचे सावट आले आहे.

Gwalior Accident : मध्य प्रदेशात भीषण अपघात; मजुरांच्या वाहनाला ट्रकची धडक, 8 जणांचा मृत्यू

Maharashtra Weather Alert : ऐन पावसाळ्यात महाराष्ट्राच्या हवामानात मोठा बदल; पुढील काही दिवस पावसाला ब्रेक?

मुंबई : ऐन पावसाळ्यात महाराष्ट्राच्या हवामानात पुन्हा मोठा बदल पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांत राज्यातील

Pritesh Walia : भारतीय वंशाचे जॅझ संगीतकार प्रितेश वालिया अमेरिकेत ICEच्या ताब्यातून जामिनावर मुक्त

नवी दिल्ली :  भारतीय वंशाचे जॅझ संगीतकार प्रितेश वालिया यांची अमेरिकेत ICEच्या ताब्यात तब्बल 14 दिवस राहिल्यानंतर

Jharkhand Students Protest : 24 दिवसांच्या आंदोलनानंतर झारखंड सरकारचा मोठा निर्णय; JSSC-CGL परीक्षा रद्द

झारखंड : झारखंडमध्ये तब्बल 24 दिवसांपासून सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. मुख्यमंत्री