बोरीवली स्थानकाला जोडणाऱ्या स्कायवॉकवर बसवणार सरकता जिना

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : बोरीवली रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला असलेल्या स्कायवॉकला आता सरकता जिना जोडला जाणार आहे. बोरीवली रेल्वे स्थानकासमोर गोरा गांधी हॉटेल समोरील स्कायवॉकला जोडण्यासाठी हा सरकता जिना बसविण्यात येणार आहे.


सध्या बोरीवली रेल्वे स्थानकाला जोडलेल्या स्कायवॉकवर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वर्दळ असते. मात्र, या ठिकाणी सरकता जिना नसल्याने विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांगांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही समस्या लक्षात घेऊन महानगरपालिकेने आता या स्कायवॉकला जोडणारा सरकता जिना बसण्याचा निर्णय घेतला आहे. या कामांतर्गत सुमारे ८ मीटर उंचीचा उच्च क्षमतेचा सरकता जिना बसविण्यात येणार असून त्यावर संरक्षक छप्परही उभारण्यात येईल. गोरा गांधी हॉटेल समोरील पुलाला जोडण्यासाठी प्रवाशांच्या सोयीसाठी उच्च क्षमतेचा हा सरकता जिना उभारण्यात येणार आहे. या पुलाच्या कामासाठी विविध करांसह सव्वा तीन कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. यासाठी कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली आहे.


सरकत्या जिन्यामुळे बोरीवली परिसरातील रेल्वे प्रवासी आणि स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून, सार्वजनिक वाहतुकीच्या सुविधांमध्येही लक्षणीय सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या स्कायवॉकला गोरागांधी हॉटेल जवळ, तसेच पोलिस स्टेशन तर इतर दोन ठिकाणी अशाप्रकारे चार ठिकाणी चढण्या आणि उतरण्यासाठी जिन्याची व्यवस्था आहे. या स्कायवॉकवरील जिन्याच्या लाद्या काही महिन्यांपूर्वी तुटल्या होत्या, त्यांची दुरुस्ती करण्यात आली होती. तसेच यावरील फेरीवाल्यांना तसेच भिकारी, गर्दुल्ले यांनाही स्थानिक आमदार संजय उपाध्याय यांनी पुढाकार घेत हटवले. त्यामुळे या स्कायवॉकवर चालताना आता विना अडथळा चालता येत आहे.

Comments
Add Comment

विस्तारीत कोस्टल रोड प्रकल्पाच्या आड येणाऱ्या वर्सोव्यातील बांधकामांवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई किनारी रस्ता (उत्तर) प्रकल्पात अडथळा ठरणाऱ्या वर्सोवा आराम नगर येथील ३३

नालेसफाई कंत्राटदारांची थकीत रक्कम देण्यास प्रशासन तयार, कंत्राटदार कामाला करणार सुरुवात

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या वतीने छोट्या आणि मोठ्या नाल्यांच्या सफाईसाठी नियुक्त करण्यात

मुंबईत अत्यंत जबाबदारीने आणि प्रभावीपणे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन कार्यक्रम राबवावा; मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

मुंबई: महाराष्ट्रात लवकरच विशेष सखोल पुनरीक्षण (स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन) कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

वांद्रे पश्चिम भागांत शनिवारी, रविवारी पाणीकपात

मुंबई: पाली हिल जलाशयाच्‍या पाणी पातळीत सुधारणा करण्‍यासाठी वांद्रे पश्चिम येथील रामदास नायक मार्ग, स्‍वामी

मुंबईत वर्षभरात ५५ हजार ३९० क्षयरोग रुग्णांची नोंद

मुंबई: मुंबईत महापालिका सार्वजनिक आरोग्य विभागाकडून क्षय रूग्णांसाठी उच्च दर्जाच्या निदान सेवा, नवीन औषधोपचार

मुंबई महापालिका सभागृहात दिवंगत अलका केरकर यांना वाहिली श्रध्दांजली

मुंबई: मुंबई महापालिकेच्या माजी उपमहापौर आणि प्रभाग क्रमांक ९८च्या भाजप नगरसेविका अलका केरकर यांचे अल्पशा