अभिनेत्री अनुष्का शर्मा ८ वर्षांनी पुन्हा मोठ्या पडद्यावर झळकणार ?

अभिनेत्री अनुष्का शर्मानं बॉलिवूडच्या अनेक मोठ्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. तसेच, बॉलिवूडच्या तिन्ही खान्ससोबत अनुष्कानं सुपरहिट सिनेमे केले आहेत. फार कमी वेळातच अनुष्का शर्मानं बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीत स्थान मिळवलं. बॉलिवूडमध्ये आपलं वेगळ स्थान निर्माण केल्यानंतर अनुष्कानं प्रसिद्ध क्रिकेटर विराट कोहलीसोबत लग्न केलं आणि आपला संसार थाटला.



विराटसोबत लग्न केल्यानंतर अनुष्कानं स्वतःला मोठ्या पडद्यापासून दूर नेलं आणि आपल्या कुटुंबाला प्राधान्य दिलं. अनुष्का दोन मुलांची आई असून आता तब्बल 8 वर्षांनी अनुष्का शर्मा पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अनुष्का शर्मा 1800 कोटींच्या सिनेमातून कमबॅक करणार असल्याची माहिती आहे.


लवकरच अभिनेत्री अनुष्का शर्मा तेलुगू सिनेसृष्टीतून कमबॅक करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा होत असून अल्लू अर्जुनचा आगामी सिनेमा ज्याचं टायटल तात्पुरतं 'AA22xA6' असं ठेवण्यात आलेलं आहे. अल्लू अर्जुनच्या या सिनेमात अनुष्का शर्मा भूमिका साकारू शकते, अशी जोरदार चर्चा सध्या सुरू असून या सिनेमाचं दिग्दर्शन ॲटली करत आहे. मात्र, या वृत्तांना अद्याप कोणताही अधिकृत दुजोरा मिळाला नसला तरी, जर हे वृत्त खरं ठरलं तर,अनुष्काचा तेलुगू सिनेसृष्टीतील पदार्पणासोबतच तिचा कमबॅक ठरणार आहे.


या सिनेमाचं अधिकृत टायटल 8 एप्रिल 2026 रोजी, म्हणजेच अल्लू अर्जुनच्या वाढदिवसाच्या मुहूर्तावर जाहीर केलं जाण्याची शक्यता आहे. हे अनावरण एका विशेष व्हिडीओमार्फत केलं जाणार असून यामध्ये सिनेमाची पहिली झलक पाहायला मिळणार आहे. तसेच, अनुष्काच्या कमबॅकबाबात होत असल्येल्या या चर्चानंतर अनुष्काला पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.

Comments
Add Comment

लवकरच केदार शिंदेंचा 'हा' स्त्रीप्रधान सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार

मराठी सिनेविश्वात स्त्रीप्रधान आणि कुटुंबप्रधान विषयांना वेगळीच ओळख मिळवून देणारे दिग्दर्शक केदार यशोधरा

नवऱ्याचं कौतुकचं नाही, अभिनेत्री दीपिका पदुकोण सोशल मिडियावर ट्रोल

अभिनेता रणवीर सिंहच्या धुरंधर 2 सिनेमानं जगभरात धूमाकूळ घातली आहे. धुरंधरनं बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करत

The 50 शो जिंकूनही शिव ठाकरेनं गमावलं ५० लाखाचं बक्षिस

शिव ठाकरेची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा होतेयं. बिग बॉस मराठी गाजवल्यानंतर आता शिव ‘The 50’ या प्रसिद्ध शोचा विजेता

अखेर आलियानं सोडलं धुरंधरबद्दल मौन , कौतक करत चाहत्यांसोबत शेअर केला 'हा' इमोशनल सीन

अभिनेता रणवीर सिंहच्या धुरंधर सिनेमाचं वेडं जगभरात सर्वत्र पाहायला मिळत आहे. धुरंधर २ सिनेमानं

अभिनेता सनी देओलच्या पोस्टवर चक्क पाकिस्तानी चाहत्याची कमेन्ट; म्हणाला...

अभिनेता सनी देओल सध्या बॉर्डर २ मुळे चांगलाच चर्चेत असून नुकताच नेटफ्लिक्सवर बॉर्डर २ सिनेमा रिलीज झाला. तसेच,

मराठमोळा शिव ठाकरे ठरला 'द ५० इंडिया' शोचा विजेता

मुंबई: मराठी अभिनेता शिव ठाकरे याने 'द ५० इंडिया' शोच्या विजेतेपदाचा मान मिळवला आहे. त्याने 'द ५० इंडिया' ट्रॉफी आणि