लवकरच केदार शिंदेंचा 'हा' स्त्रीप्रधान सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार

मराठी सिनेविश्वात स्त्रीप्रधान आणि कुटुंबप्रधान विषयांना वेगळीच ओळख मिळवून देणारे दिग्दर्शक केदार यशोधरा शिंदे लवकरच आणखी एक हटके सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहेत.
'अगंबाई…अरेच्चा!', 'बाईपण भारी देवा' आणि 'अगं अगं सुनबाई! काय म्हणताय सासूबाई?' या यशस्वी  सिनेमानंतर आता 'आई भाड्याने हवी?' या नव्या सिनेमाची दिग्दर्शक केदार शिंदेंनी घोषणा केली आहे.






सनफ्लॉवर स्टुडिओ निर्मित या सिनेमाची कथा आणि लेखन वैशाली शशी नाईक आणि ओंकार वसुंधरा दत्त यांनी केलं असून या सिनेमाचे छायांकन व संकलनाची जबाबदारी मयुर संजिवनी हरदास यांनी सांभाळली आहे. विशेष म्हणजे 'अगं अगं सुनबाई! काय म्हणताय सासूबाई?' नंतर निर्माती सना शिंदे, दिग्दर्शक केदार शिंदे, लेखिका वैशाली शशी नाईक, लेखक ओंकार वसुंधरा दत्त हे पुन्हा एकदा एकत्र येत असल्यानं सिनेमाबद्दलची उत्सुकता मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

'आई भाड्याने हवी?' या वेगळ्या शीर्षकातूनच प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण होत असून आजच्या बदलत्या कुटुंबव्यवस्थेत 'आई' या नात्याची गरज, उणीव आणि त्यामागची भावनिक पोकळी यावर हा सिनेमा परिणामकारक पद्धतीनं भाष्य करणार असल्याचं दिसून येत आहे. 'अगं अगं सुनबाई! काय म्हणताय सासूबाई?' या सिनेमानंतर आता 'आई भाड्याने हवी?' या सिनेमाची कथा नेमकी काय असणार हे पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.

Comments
Add Comment

Actor Satendra Soni : 'लापता लेडीज' फेम सत्येंद्र सोनीचा धक्कादायक आरोप! मानधन मागितल्यावर मारहाण, हॉटेलमधून...

मुंबई : 'लापता लेडीज' चित्रपटातील 'छोटू' या भूमिकेमुळे चर्चेत आलेला अभिनेता सत्येंद्र सोनी (Actor Satendra Soni) सध्या एका

'Mirzapur: The Movie' : ‘मिर्झापूर: द मूव्ही’चा टीझर इंटरनेटवर सुपरहिट! रिलीज होताच YouTube ट्रेंडिंगमध्ये #1

मुंबई : अखेर चाहत्यांची बहुप्रतीक्षित प्रतीक्षा संपली आहे. ‘मिर्झापूर: द मूव्ही’चा दमदार टीझर प्रदर्शित होताच

Rohit Shetty : रोहित शेट्टींना पुन्हा जीवे मारण्याची धमकी! २० कोटींच्या खंडणीची मागणी; बिश्नोई गँगचं कनेक्शन तपासात

मुंबई : बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit Shetty) यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

Nivedita & Ashok Saraf : अशोक सराफांना लग्न करायचंच नव्हतं; सचिन पिळगांवकरांनी जमवली जोडी; सराफ जोडीच्या लग्नाची ही कहाणी अनेकांना माहिती नाही

Ashok Saraf & Nivedita Saraf Anniversary : मराठी कलाविश्वात अशोक सराफ आणि निवेदिता सराफ ही लोकप्रिय जोडी आहे. या दोघांच्या लग्नाला आज ३७

Vithabai Narayangaonkar : जाणून घ्या तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्याविषयी काही रंजक गोष्टी

मुंबई : तमाशा विश्वातील अजरामर नाव : विठाबाई नारायणगावकर (Vithabai Narayangaonkar) यांना महाराष्ट्राच्या 'तमाशा सम्राज्ञी'

Lock Upp 2 : 'लॉकअप २'मध्ये रंगणार सेलिब्रिटींचा थरार! १५ स्पर्धकांची संपूर्ण यादी आली समोर

'Lock Upp 2' : लोकप्रिय रिअॅलिटी शो 'लॉकअप २ (Lock Upp) पुन्हा एकदा नव्या सीझनसह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पहिल्या पर्वाला