बिग बॉसच्या घरातून वाईल्ड कार्ड स्पर्धक घेणार एक्झिट, 'या' नावाची चर्चा

बिग बॉसच्या घरातील सदस्य उत्तम खेळ खेळत असून बिग बॉस मराठीच्या 6 व्या सिझननं प्रेक्षकांमध्ये चांगलीच खळबळ उडवून दिली आहे. बिग बॉसच्या घरात अनेक दमदार स्पर्धकांची एक्झिट झालीअसून ड्रामा क्विन राखी सावंतनंतर ३ स्पर्धकांची वाईल्ड कार्ड एन्ट्रीही झाली. बिग बॉसच्या घरातील हे तिन्ही स्पर्धक घरातील इतर स्पर्धकांना तोडीस तोड उत्तर देताना दिसत आहे. तसेच, गेल्या आठवड्यात सिंगर प्राजक्ता शुक्रे ही बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली होती. दरम्यान, या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून कोण एक्झिट घेणार? याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.


बिग बॉसच्या घरातील ट्विस्ट आणि टर्न्समुळे सध्या बिग बॉस ६ चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी बिग बॉसच्या घरात संकेत पाठक, रेवा कौरासे आणि संस्कृती साळुंके यांची एन्ट्री होताच घरातील समीकरणं बदलली होती. या आठवड्यात एकूण सात सदस्य नॉमिनेट झाले असल्याची माहिती असून यामध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री घेणाऱ्या स्पर्धकांचाही समावेश आहे. रेवा कौरासे, दीपाली सय्यद, विशाल कोटियन, सागर कारंडे, प्रभू शेळके, संस्कृती साळुंके हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत.


दरम्यान, कोण घरातून बाहेर पडणार? हे लवकरच उघड होईल. पण,एलिमिनेशनपूर्वीच सात नावांपैकी एका नावाची जोरदार चर्चा
रंगली आहे.


या घरातून जी व्यक्ती बाहेर पडणार आहे. तिच्याबद्दल प्रेक्षकांना दु:ख होण्याऐवजी आनंद होत असल्याचे पाहायला मिळत आहे.






बिग बॉस मराठीशी संबंधित काही पेज, सोशल मीडियावरील चर्चांनुसार, बिग बॉसच्या घरातून संस्कृती साळुंके बाहेर पडणार असल्याची माहिती समोर आली असून संस्कृतीनं बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतली होती. अवघ्या काही दिवसांत तिचा बिग बॉसच्या घरातील प्रवास हा संपला आहे. यानंतर तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. दरम्यान, याबाबतची अधिकृत माहिती बिग बॉसच्या रविवारच्या भागात उघड होणार आहे.
Comments
Add Comment

Asha, Lata : आशाताई आणि लतादीदींच्या निधनाशी संबंधित योगायोग

मुंबई : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. त्या ९२ वर्षांच्या होत्या. आशा

Asha Bhosle : आशा भोसले यांची संगीत क्षेत्रातील कारर्कीद, पद्मविभूषण ते महाराष्ट्र भूषण पुरस्कारांनी गौरव

मुंबई : भारतीय संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध पार्श्वगायिका गायिका आशा भोसले यांचं निधन झालं आहे. वयाच्या ९२ व्या

Asha Bhosle : ज्या गाण्याला बॅन करण्यात आलं त्याच गाण्यानं मिळवून दिला पुरस्कार

मुंबई : संगीत विश्वातील प्रसिद्ध नाव, आशा भोसले (Asha Bhosle) आज काळाच्या पडद्याआड गेलंय. पण, त्यांच्या अजरामर

Asha Bhosle : सूरसम्राज्ञी 'आशा भोसले' यांचा संघर्षमय जीवनप्रवास

मुंबई : भारतीय संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध पार्श्वगायिका गायिका आशा भोसले यांचं निधन झालं आहे. वयाच्या ९२ व्या

Asha Bhosle : जेष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन

मुंबई : प्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले यांचे मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. त्या ९२ वर्षांच्या

Jana Nayagan Leaked online : थलपथी विजयचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'जना नायकन' ऑनलाइन लीक; दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत संताप

दाक्षिणात्य सुपरस्टार थलपथी विजयचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'जना नायकन' ऑनलाइन लीक झाल्याने चित्रपटसृष्टीत खळबळ