एकेकाळी रणवीरवर नाराज असणाऱ्या 'या' दाक्षिणात्य अभिनेत्याने आता केले रणवीरचे तोंडभरून कौतुक; म्हणाला ....

काही दिवसांपूर्वी रणवीरने दाक्षिणात्य अभिनेता ऋषभ शेट्टीच्या कांतारा सिनेमातील भूमिकेची नक्कल केली होती. त्यानंतर ऋषभनेही रणवीरने आपल्या देवाचा अपमान केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्यांचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. मात्र, आता त्याच ऋषभ शेट्टीने रणवीरचे तोंड भरून कौतुक केले आहे.


ऋषभने रणवीरबद्दलचा सगळा राग विसरून त्याच्या ‘धुरंधर 2’ या सिनेमाचं भरभरून कौतुक केलं आहे. रणवीर सिंहबद्दलचा सगळा राग विसरून ऋषभने एक्स (ट्विटर) अकाऊंटवर ‘धुरंधर 2’च्या संपूर्ण टीमसाठी खास पोस्ट लिहिली आहे.


ऋषभ शेट्टीने असे केले धुरंधरचे कौतुक :


‘धुरंधर: द रिव्हेंज’चा पहिला सीन तुम्हाला अशा पद्धतीने कथेत खेचतो की तुम्ही त्यातून बाहेर पडूच शकत नाही. सिनेमातील प्रत्येक फ्रेम ही जणू युद्धाच्या नगाऱ्यासारखी वाटते. हा फक्त सीक्वेल नाही, तर हे एक विधान आहे. अप्रतिम कथाकथन, आदित्य भावा.. खरंच त्यातील बारकावे खूप आवडले. आर. माधवन सर, अर्जुन रामपाल, रणवीर सिंह, राकेश बेदी, सारा अर्जुन आणि संजय सर... प्रत्येक कलाकाराने सर्वोत्कृष्ट परफॉर्म केलं आहे, मान झुकवून मी त्यांचा सन्मान करतो. विकाश नवलखा यांनी नेत्रदीपक दृश्ये टिपली आहेत आणि संगीताच्या माध्यमातून चित्रपटाला इतक्या प्रभावीपणे एका वेगळ्याच उंचीवर नेणाऱ्या तंत्रज्ञांचं विशेष कौतुक,’ अशा शब्दांत ऋषभने संपूर्ण टीमची पाठ थोपटली आहे.






ऋषभच्या या पोस्टवर आदित्य धरने प्रतिक्रिया देत ‘तुझ्याकडून हे शब्द ऐकणं म्हणजे माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे भावा. कांताराचा मी खूप मोठा चाहता असून तुझे शब्द माझ्यासाठी आणखी खास ठरले आहेत. मी कृतज्ञ आहे’, असं आदित्यने लिहिलं आहे.
Comments
Add Comment

Ranveer Singh : रणवीर सिंगच्या ‘प्रलय’चे शूटिंग ऑस्ट्रेलियाऐवजी मुंबईत? दीपिकामुळे बदलल्याची चर्चा

मुंबई : अभिनेता रणवीर सिंगच्या आगामी ‘प्रलय’ या महत्त्वाकांक्षी चित्रपटाबाबत नवी माहिती समोर आली आहे. जय मेहता

Instagramचा १० वर्षांनंतर वर्डमार्क बदलला; ‘Instagzam’ म्हणत युजर्सची खिल्ली, तुम्हाला नवीन डिझाइन कसं वाटलं?

मुंबई : जगभरातील लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Instagram ने जवळपास १० वर्षांनंतर आपल्या ब्रँडच्या लिखित ओळखीत

सिगारेटच्या पाकिटावर लिहिलं देशभक्तीचं अमर गीत! लतादीदींनी सुरुवातीला दिला होता नकार; ‘ऐ मेरे वतन के लोगों’ची कहाणी थक्क करणारी

मुंबई : स्वातंत्र्यदिन जवळ आला की देशभक्तीच्या गाण्यांनी संपूर्ण देशाचं वातावरण भारून जातं. मात्र, ‘ऐ मेरे वतन के

Madhuri Dixit : कोण होणार करोडपतीच्या एका सीझनसाठी माधुरी घेणार इतके मानधन...

मुंबई : टेलिव्हिजनवरील सर्वाधिक लोकप्रिय आणि रंजक मनाला जाणारा क्विज शो म्हणजे 'कौन बनेगा करोडपती' नेहमीच

Dilip Kumar : ७८ वर्षांपूर्वी गाजलेलं बॉलिवूडचं देशभक्तीपर गाणं! मोहम्मद रफींचा आवाज, दिलीप कुमार यांच्यामुळे अजरामर झालेला इतिहास

मुंबई : स्वातंत्र्यदिन जवळ आला की देशभक्तीपर गाण्यांनी वातावरण भारून जातं. ‘ऐ मेरे वतन के लोगों’, ‘मेरे देश की

Swara Bhasker News : स्वरा भास्करचा ट्रोलर्सवर जोरदार हल्लाबोल! 'त्या' एका वाक्याने बंद केली नेटकऱ्यांची बोलती

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. फहाद अहमद यांच्याशी