मराठी टेलिव्हिजन विश्वात अनेक मालिकांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. यापैकीच एक असलेली कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका म्हणजे 'जय जय स्वामी समर्थ'. या मालिकेनं कमी वेळातचं प्रेक्षकांच्या मनात घर केलं असून ही मालिका महाराष्ट्रातील प्रत्येक घरात आवर्जून पाहिली जाते. मात्र, आता या मालिकेत एक मोठा ट्विस्ट आला आहे.
गेल्या ५ वर्षांपासून मालिकेत स्वामींची मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता अक्षय मुदावडकर याने या मालिकेचा निरोप घेतला आहे. सोशल मीडियावरून त्याने याची माहिती दिली आहे. त्यामुळे आता त्याच्या जागी कोण स्वामींच्या मुख्य भूमिकेत असणार असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.
सध्या मालिकेत महानिर्वाणाचा अध्याय सुरु असल्याने आता अभिनेता अक्षय मुदावडकर याच्या जागी ज्येष्ठ अभिनेते सुनील गोडसे स्वामींच्या मुख्य भूमिकेत दिसतील.