मुंबई मनपा मुख्यालयासह कार्यालये, रुग्णालयांच्या सुरक्षेत वाढ

मुंबई : महापालिका मुख्यालयासह इतर इमारतींमध्ये सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आता अत्याधुनिक स्वरुपाच्या डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर बसवण्यात येणार आहे. मुंबई महापालिका इमारती, विभाग कार्यालये आणि शीव रुग्णालयासह इतर रुग्णालये आदींसाठी ९७ नवीन अत्याधुनिक पद्धतीचे डोअर फ्रेम खरेदी करण्यात येणार आहे. या अत्याधुनिक डोअर मेटलद्वारे सिग्नल तयार होतो. आधुनिक डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर सिस्टीममध्ये मल्टी झोन तंत्रज्ञान असून जे शरीर स्कॅन करताना धातू नक्की कोणत्या ठिकाणी आहे, हे अचूकपणे दर्शवते. ही उपकरण प्रणाली सीसीटीव्ही आणि बॅगेज स्कॅनरप्रमाणेच सुरक्षेसाठी अत्यंत प्रभावी असल्याचे अधिकाऱ्यांचे मत आहे.


मुंबई महानगरपालिकेच्या वर्दळीच्या व संवेदनशील विभागांमध्ये समाजकंटकांकडून होणाऱ्या संभाव्य धोक्याचा विचार करता मुंबई शहरात मजबूत सुरक्षा व्यवस्था असण्याची आवश्यकता आहे. तसेच मुंबई महानगररपालिकेच्या मुख्यालयात तसेच विविध रुग्णालयांमधील नागरिकांची वाढती गर्दी लक्षात घेता, महानगरपालिकेच्या अखत्यारीतील विविध रुग्णालये, विभाग कार्यालये आणि केंद्रीय एजन्सी कार्यालये इत्यादी ठिकाणी कोणतीही अनुचित किंवा अप्रिय घटना घडू नये म्हणून सुरक्षा उपकरणे अद्ययावत स्वरुपात कार्यरत केली जात आहेत. या अंतर्गत डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर सिस्टीम ही एक अद्ययावत सुरक्षा प्रणाली असून एक महत्वाचे सुरक्षा उपकरण आहे. मुंबई महापालिका मुख्यालयासह अनेक महापालिका विभाग कार्यालये तसेच रुग्णालयांमध्ये डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर या कालबाह्य झाल्या आहेत, तर काही ठिकाणी नव्याने बसवण्यात येणार आहे. महापालिका मुख्यालयातील डोअर फ्रेम या ८ ते १० वर्षे जुन्या झाल्या आहेत. त्यानुसार मुंबई महापालिका मुख्यालय,इमारती आणि रुग्णालयांमध्ये एकूण ९७ अशाप्रकार डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी विविध करांसह दीड कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. याकरता समर्थ सिक्युरिटी सिस्टीम या कंपनीची निवड करण्यात आली आहे.


ही सुरक्षा प्रणाली प्रामुख्याने शासकीय इमारती, रुग्णायले, विमानतळ, शाळा, मॉल्स सारख्या वर्दळीच्या ठिकाणी आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सुरक्षा वाढविण्याकरिता वापरली जाते. ही सुरक्षा प्रणाली व्यक्तीच्या शरीरावर लपवलेले शस्त्र, स्फोटके किंवा इतर धातूच्या वस्तूंचा शोध लावण्यासाठी वापरली जाते. या प्रणालीमुळे गर्दीचा प्रवाह सुरळीत करण्याची आणि संवेदनशीलता आणि अलार्म सेटिंग्जमध्ये सानुकुलन करण्याकरिताच्या सुविधेचा वापर होतो. यातून जाताना व्यक्तीच्या अंगावर असलेल्या धातूच्या वस्तूंची तात्काळ तपासणी होते. हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड तयार करते. जेव्हा एखादी धातूची वस्तू या क्षेत्रात येते, तेव्हा फील्डमध्ये बदल होतो. ज्यामुळे उपकरणातून सिग्नल (अलार्म) तयार होतो. अनेक आधुनिक डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर सिस्टीम मध्ये मल्टी झोन तंत्रज्ञान असते. जे शरीर स्कॅन करताना धातू नक्की कोणत्या ठिकाणी आहे, हे अचूकपणे दर्शवते. ही उपकरण प्रणाली सीसीटीव्ही आणि बॅगेज स्कॅनरप्रमाणेच सुरक्षेसाठी अत्यंत प्रभावी मानले जाते. त्यामुळे अत्याधुनिक पध्दतीच्या डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर बसवण्याचे प्रस्तावित असल्याचे यांत्रिक व विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

Stray Dogs Sterilized : मुंबईत वर्षाला करणार सुमारे ४५ हजार भटक्या श्वानांचे निर्बिजीकरण

- पुढील तीन वर्षांसाठी संस्थांची नेमणूक मुंबई (सचिन धानजी) मुंबईतील वाढत्या भटक्या श्वानांची संख्या नियंत्रणात

Megablock : विविध अभियांत्रिकी व देखभाल कामांसाठी मुंबईत आज तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

मुंबई : रेल्वेने मुंबई विभागातील तिन्ही उपनगरीय मार्गांवर रविवारी १२ एप्रिल रोजी विविध अभियांत्रिकी व देखभाल

Maharashtra : अवजड वाहनांमध्ये क्लीनर बंधनकारक नाही, महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय

मुंबई : अवजड मोटार वाहन (एचएमव्ही) चालकांना मोठा दिलासा देत महाराष्ट्र सरकारने क्लिनर ठेवण्याची अट रद्द केली आहे.

RTE साठी महाराष्ट्रातील १ लाख ५ हजार ८११ विद्यार्थ्यांची निवड

मुंबई : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार, दरवर्षीप्रमाणे २५ टक्के प्रवेश प्रक्रिया

परिणामकारक महसूल सेवेसाठी राज्यातील राजपत्रित अधिकाऱ्यांच्या प्रतिनियुक्तीवर बंधने

मुंबई : महसूल विभागातील राजपत्रित अधिकारी वारंवार आणि दीर्घकाळ इतर विभाग किंवा महामंडळांमध्ये प्रतिनियुक्तीवर

BMC : स्वच्छतेबाबत अधिकाऱ्यांनी स्वयंशिस्त मोडमध्ये यावे!

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : नागरी स्वच्छता ही अत्यंत महत्वाची बाब असल्याचे नमुद केले. स्वच्छतेकडे एखाद्या