नेरूळमधील फ्लेमिंगो अभयारण्यालगत गृहनिर्माण प्रकल्पाला विरोध

नवी मुंबई : नेरूळ सेक्टर-६० येथील फ्लेमिंगो अभयारण्यालगत प्रस्तावित गृहनिर्माण प्रकल्पाला पर्यावरणप्रेमींनी तीव्र विरोध दर्शवला असून संबंधित प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणात हस्तक्षेप करण्यासाठी पर्यावरणप्रेमींनी सिडको, नगरविकास विभाग, सीआरझेड प्राधिकरण, रेरा आणि राज्य पर्यावरण प्रभाव मूल्यांकन प्राधिकरण यांना पत्रे पाठवून दाद मागितली आहे. प्रकल्पामुळे पर्यावरणीय समतोल बिघडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.


मिस्त्री कन्स्ट्रक्शन कंपनीने महाराष्ट्र सागर किनारा प्राधिकरणासमोर सादर केलेला प्रस्ताव ‘प्रकल्पाच्या नियोजनात बदल’ झाल्याचे कारण देत मागे घेतला आहे. दरम्यान, प्रकल्पाच्या जागेवर नैसर्गिक जलसाठा असल्याचे समोर आले असून, अशा संवेदनशील क्षेत्रात बांधकामास परवानगी देऊ नये, असा ठाम पवित्रा पर्यावरणप्रेमींनी घेतला आहे. भविष्यात कोणत्याही बदलासह हा प्रकल्प पुन्हा राबवू नये, अशी मागणीही करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

खासदार नारायण राणे यांना वाढदिवशी मुख्यमंत्र्यांनी अशा दिल्या शुभेच्छा

कणकवली : नारायण राणे यांनी विधानसभेत विरोधी पक्षनेता म्हणून केलेली भाषणे ऐकण्याची बघण्याची संधी मला प्राप्त

Ashok Kharat : भोंदू अशोक खरात प्रकरणात १६० जीबी डिजिटल डेटा जप्त

नाशिक : नाशिकमध्ये चर्चेत असलेल्या स्वयंघोषित कॅप्टन भोंदू अशोक खरात प्रकरणात नवे धक्कादायक प्रकरणे समोर येत

West Asia War : पश्चिम आशियातले युद्ध सुरूच राहणार ? शस्त्रसंधीची शक्यता मावळली ?

इस्लामाबाद : इस्रायल,अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध २८ एप्रिल २०२६ रोजी पश्चिम आशियात सुरू झाले. या

attack on Lebanon : ट्रम्पच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच

जेरुसलेम : इराण आणि अमेरिका यांच्यात सध्या युद्धविराम सुरू आहे आणि तो पुढे वाढवण्यासाठी चर्चा होणार आहे. दरम्यान,

russia vs ukraine : रशिया आणि युक्रेन दरम्यान ३२ तासांची शस्त्रसंधी

मॉस्को : ऑर्थोडॉक्स इस्टरनिमित्त रशियाने युक्रेनमध्ये ३२ तासांचा तात्पुरता युद्धविराम जाहीर केला. शनिवारी

BMC : महापालिका आयुक्त तपासणार आता प्रत्येक अधिकाऱ्यांचे प्रगतीपुस्तक

मुंबई (सचिन धानजी) : मुंबई महापालिका आयुक्तपदाचा भार स्वीकारल्यानंतर महापालिकेच्या कारभाराला गती देतानाच