गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर मराठी अभिनेत्यानं केली नवीन सुरुवात, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

नवीन वर्षात अनेकजण नवीन सुरुवात करण्याासाठी सज्ज झालेले असतात. अशातच आता मराठी सिनेसृष्टीतील एका अभिनेत्यानं गुढी पाडव्याचं औचित्य साधत या शुभ मुहूर्तावर एक नवीन सुरुवात केली असून या अभिनेत्यानं सोशल मीडियाच्या माध्यमातून ही बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे.


अभिनेता अभिजीत केळकरनं गुढीपाडव्याला एक नवीन सुरुवात केली असून यंदा नवीन वर्षात काहीतरी हटके करण्याचा निर्णय अभिजतने घेतला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत अभिजीतने याबाबत माहिती दिली असून यानंतर चाहत्यांनी अभिजीतला शुभेच्छा दिल्या आहेत.





अभिजीतच्या या पोस्टवर मराठी कलाविश्वातून शुभेच्छांचा वर्षाव होत असून अनेक कलाकारांनी याबात अभिजितचं भरभरून कौतुक केलं आहे.


सध्या अनेकजण हॉटेल, कपड्यांचा ब्रँड किंवा ज्वेलरी यांसारखे व्यवसाय निवडताना पाहायला मिळते. मात्र, अभिजित केळकरने महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीचा महत्वाचा भाग असलेल्या मसाल्यांचा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला आहे.


अभिजितनं आपला 'अस्सल केळकर मसाले' नावाचा स्वतःचा नवा ब्रँड लाँच केला असून त्याने हा पारंपरिक बिझनेस सुरू केला आहे. अभिजितच्या या ब्रँडच्या टॅगलाइनमध्येच त्याने आपल्या ब्रँडचा उद्देश स्पष्ट केला आहे. अभिजितनं आपल्या टॅगलाइनमध्ये "प्रत्येक घासात अस्सल चव!" म्हटलं आहे.

Comments
Add Comment

Raja Shivaji : 'राजा शिवाजी' सिनेमातील अजय-अतुलच्या 'छत्रपती अँथम'चा 'हा' व्हिडिओ पाहिलात का ?

मुंबई : अभिनेता रितेश देशमुखच्या बहुप्रतिक्षित 'राजा शिवाजी' (Raja Shivaji ) सिनेमाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता

Bigg Boss Marathi 6 : रेस टू फिनालेसाठी लढत रंगली, भाऊचा धक्कामध्ये कोणाला धक्का मिळणार आणि कोणाची वर्णी लागणार ?

मुंबई : बिग बॉस मराठी सीझन ६ ( Bigg Boss Marathi 6 ) आता शेवटच्या टप्प्यात आहे. बिग बॉस मराठीला आता काही दिवसच शिल्लक राहिले आहेत

माध्यमांतराची गाथा...

कोणत्याही क्षेत्रातल्या कुणा व्यक्तीची जन्मशताब्दी असली की त्या व्यक्तीने त्या क्षेत्रात जे योगदान दिले आहे,

Ek Din : मोठ्या पडद्यावर ५० वर्षांनंतर पुन्हा खुलणार जपानी रोमांस, 'एक दिन' सिनेमातील 'कोनिचिवा' गाणं रिलीज

मुंबई : अभिनेता आमिर खान प्रोडक्शन्सची आगामी फिल्म ‘एक दिन’, ज्यामध्ये साई पल्लवी आणि जुनैद खान मुख्य भूमिकेत

Gayatri Datar : 'त्या' प्रकरणाबाबत गायत्री दातारची आणखी एक पोस्ट, म्हणाली...

मुंबई : 'तुला पाहते रे' मालिकेतून घराघरात पोहचलेली लोकप्रिय अभिनेत्री गायत्री दातार हिच्यासोबत एक धक्कादायक

Nick Jonas : बॉलिवूडच्या गाण्याची निक जोनसला भूरळ, पत्नी प्रियांका नव्हे तर माधुरीच्या 'या' प्रसिद्ध गाण्यावर थिरकला

मुंबई : भारतीय सिनेसृष्टी जगभरात प्रसिद्ध असून बॉलिवूडच्या सिनेमांसोबतच गाण्यांनाही जगभरात पंसती मिळते.