भेंडीबाजारात पुन्हा फेरीवाल्यांवर होणार कारवाई

मुंबई : महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार मुंबईतील काही विभागांमध्ये महापालिकेच्या वतीने अनधिकृत फेरीवाले आणि पदपथांवर करण्यात आलेल्या वाढीव बांधकामांवर कारवाई होत आहे. त्यानुसार भेंडीबाजार, डोंगरी,मस्जिद बंदर, मोहम्मद अली रोड, जे जे रुग्णालय परिसरातही मोठ्याप्रमाणात कारवाईला सुरुवात झाली होती. मात्र,मुस्लिम समाजाच्या धार्मिक सणामुळे काही प्रमाणात संथ झालेली ही कारवाई आता रमझान ईदनंतर अधिक तीव्र केली जाणार आहे. येत्या मंगळवारपासून या भागातील कारवाई पुन्हा एकदा तीव्र करून अनधिकृत बांधकामांसह फेरीवाल्यांवर कारवाई करून त्यांना पळता भूई कमी करून सोडले जाणार आहे.


मुंबईतील फेरीवाल्यांसह अनधिकृत तसेच वाढीव बांधकामांविरोधातील कारवाईचे निर्देश प्राप्त झाल्यानंतर अनेक विभागांच्या सहायक आयुक्तांच्या नेतृत्वाखाली याबाबतची मोहीम तीव्र करण्यात आली. मात्र, यातील सर्वांत लक्षवेधी कारवाई ठरली ती बी विभागाची. विशेष म्हणजे इथे अनधिकृत तसेच वाढीव कामे झाली आहे. तसेच फेरीवाल्यांनीही मिळेल ते रस्ते,पदपथ अडवून नागरिकांचे चालणेही कठिण करून सोडले आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार तसेच अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली बी विभागाचे सहायक आयुक्त योगेश देसाई यांनी कशाचीही भिडभाड न बाळगता अत्यंत निडरपणे याठिकाणी कारवाईचा सपाटा लावला. सलग आठ ते दहा दिवस कारवाई करून इब्राहिम मोहम्मद अली रोड वरील नारायण धुरू स्ट्रीट, मांडवी, सरदार वल्लभ भाई पटेल रोड, इब्राहिम मोहम्मद मर्चंड रोड, संत तुकाराम रोड, युसूफ मेहरली रोड, लोकमान्य टिळक रस्ता आदी मार्गावरील आणि चौकांमधील रस्ते अडवून बसणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करतानाच वाढीव बांधकामे तसेच रस्ता अडवून ठेवलेले अनधिकृत स्टॉल्स हटवले. स्थानिक नागरिकांच्या धार्मिक भावना लक्षात घेवू्न ही कारवाई तुर्तास संथ केली होती, परंतु आता सणामुळे ही कारवाई हाती घेण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. याबाबत बी विभागाचे सहायक आयुक्त योगेश देसाई यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मागील काही दिवसांमध्ये ही कारवाई संथ झाल्याचे दिसून आले असले तरी पुढील आठवड्यात ही कारवाई तीव्र केली जाईल,असे म्हटले आहे.

Comments
Add Comment

Stray Dogs Sterilized : मुंबईत वर्षाला करणार सुमारे ४५ हजार भटक्या श्वानांचे निर्बिजीकरण

- पुढील तीन वर्षांसाठी संस्थांची नेमणूक मुंबई (सचिन धानजी) मुंबईतील वाढत्या भटक्या श्वानांची संख्या नियंत्रणात

Megablock : विविध अभियांत्रिकी व देखभाल कामांसाठी मुंबईत आज तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

मुंबई : रेल्वेने मुंबई विभागातील तिन्ही उपनगरीय मार्गांवर रविवारी १२ एप्रिल रोजी विविध अभियांत्रिकी व देखभाल

Maharashtra : अवजड वाहनांमध्ये क्लीनर बंधनकारक नाही, महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय

मुंबई : अवजड मोटार वाहन (एचएमव्ही) चालकांना मोठा दिलासा देत महाराष्ट्र सरकारने क्लिनर ठेवण्याची अट रद्द केली आहे.

RTE साठी महाराष्ट्रातील १ लाख ५ हजार ८११ विद्यार्थ्यांची निवड

मुंबई : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार, दरवर्षीप्रमाणे २५ टक्के प्रवेश प्रक्रिया

परिणामकारक महसूल सेवेसाठी राज्यातील राजपत्रित अधिकाऱ्यांच्या प्रतिनियुक्तीवर बंधने

मुंबई : महसूल विभागातील राजपत्रित अधिकारी वारंवार आणि दीर्घकाळ इतर विभाग किंवा महामंडळांमध्ये प्रतिनियुक्तीवर

BMC : स्वच्छतेबाबत अधिकाऱ्यांनी स्वयंशिस्त मोडमध्ये यावे!

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : नागरी स्वच्छता ही अत्यंत महत्वाची बाब असल्याचे नमुद केले. स्वच्छतेकडे एखाद्या