एचडीएफसी बँकेत चाललंय काय ? अर्धवेळ अध्यक्षांच्या राजीनाम्यानंतर तीन उच्चाधिकाऱ्यांना राजीनामा देण्याचे आदेश

मुंबई : क्रेडिट सुईस दिवाळखोरीत निघाली. नंतर यूबीएस या बँकिंग कंपनीने क्रेडिट सुईस विलीन करून घेतली. ही प्रक्रिया झाल्यानंतर 'क्रेडिट सुईस'चे बाँड रद्द करण्यात आले. पण याच बाँड्सच्या खरेदी - विक्रीवरून एचडीएफसी बँकेत गदारोळ माजला आहे.


एचडीएफसी बँकेचे अर्धवेळ अध्यक्ष अतनु चक्रवर्ती यांनी “मूल्ये आणि नैतिकते”वरून झालेल्या मतभेदांचे कारण देत राजीनामा दिला. या नंतर एचडीएफसी बँकेच्या व्यवस्थापनाने तडकाफडकी तीन उच्चाधिकाऱ्यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले आहेत. वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या बाँड्सच्या खरेदी - विक्रीची अंतर्गत चौकशी सुरू आहे. एचडीएफसी बँकेने बँकिंगचे समूह प्रमुख संपत कुमार, मध्य पूर्व, आफ्रिका आणि एनआरआय ऑनशोर व्यवसायाचे कार्यकारी उपाध्यक्ष हर्ष गुप्ता आणि वरिष्ठ उपाध्यक्ष पायल मनध्यान यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले आहेत.


बाँड्सच्या खरेदी - विक्री घोटाळ्याप्रकरणी दुबई वित्तीय सेवा प्राधिकरणाने एचडीएफसी बँकेला नवीन ग्राहक जोडण्यास बंदी घातली आहे. ही बंदी असतानाच एचडीएफसी बँकेने तीन उच्चाधिकाऱ्यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच बाँड्सच्या खरेदी - विक्रीची अंतर्गत चौकशी सुरू केली आहे. या सर्व घडामोडींचा परिणाम 'एचडीएफसी बँक लिमिटेड' या शेअरवर झाला आहे. आज (शुक्रवार २० मार्च २०२६) हा शेअर २.१५ टक्के घसरून अर्थात १७.२० अंकांनी घसरून ७८१ रुपयांवर बंद झाला आहे.


एचडीएफसी बँकेत गदारोळ माजला असला आणि पश्चिम आशियात युद्ध सुरू असले तरी बीएसई सेन्सेक्स आज (शुक्रवार २० मार्च २०२६) संध्याकाळी ०.४४ टक्क्यांनी (३२५.७२ अंकांनी) वधारला आणि ७४,५३२.९६ वर बंद झाला. निफ्टी फिफ्टी आज (शुक्रवार २० मार्च २०२६) संध्याकाळी ०.४९ टक्क्यांनी (११२.३५ अंकांनी) वधारला आणि २३,११४.५० वर बंद झाला.




  1. १ अमेरिकन डॉलर - ९३.५७ रुपये

  2. २४ कॅरेट शुद्ध १० ग्रॅम (१ तोळा) सोने - १,५०,९३० रुपये (गुरुवारच्या तुलनेत ६५० रुपयांची वाढ)

  3. २२ कॅरेट शुद्ध १० ग्रॅम (१ तोळा) सोने - १,३८,३५० रुपये (गुरुवारच्या तुलनेत सहाशे रुपयांची वाढ)

  4. १ किलो चांदी - २,५५,००० रुपये (गुरुवारच्या तुलनेत पाच हजार रुपयांची घट)

Comments
Add Comment

Palghar Crime : पहाटे घराबाहेर पडली, प्रियकराच्या घरी गेली अन्...१७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; कुटुंबीयांचा घातपाताचा संशय

पालघर : पालघर जिल्ह्यातील (Palghar) डहाणू तालुक्यात (Dahanu News) एक अत्यंत धक्कादायक आणि गूढ घटना उघडकीस आली असून, १७ वर्षीय

Nashik : पेठ तालुक्यातील ११ पर्यटक काठमांडूत अडकले, सुरक्षित परतीसाठी आवश्यक कार्यवाही सुरु

Nashik : नेपाळमध्ये भीषण महापुराने सर्वत्र हाहाकार माजवला आहे. नेपाळमध्ये भारतातील अनेक नागरिक अडकल्याची माहिती

Nashik Crime : तरुणाचा गळा आवळून खून, परिसरात खळबळ

Nashik Crime News : नाशिक जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ओझर शहरातील मध्यवर्ती असलेल्या संभाजी चौक परिसरात

Simhastha Kumbh Mela : सिंहस्थात महिलांना रोजगाराची मोठी संधी ! ९ हजारांहून अधिक बचत गटांचा सहभाग

Simhastha Kumbh Mela : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील महिला बचत गट आणि एकल महिलांसाठी

Devendra Fadnavis : तिबेटमध्ये अडकलेल्या ३७ महाराष्ट्रातील नागरिकांची मुख्यमंत्री फडणवीसांमुळे सुटका

- सागाहून काठमांडूकडे सुरक्षित प्रवास सुरू; ठाणे, पुणे, अलिबाग, रायगड आणि डोंबिवली परिसरातील भाविकांचा

Nashik : सिंहस्थाच्या स्वागतासाठी नाशिक सज्ज ! ‘कुंभ भक्ती संगम’चे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

Nashik : नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची (Simhastha Kumbh Mela) सांस्कृतिक नांदी आजपासून होत