Simhastha Kumbh Mela : सिंहस्थात महिलांना रोजगाराची मोठी संधी ! ९ हजारांहून अधिक बचत गटांचा सहभाग

Simhastha Kumbh Mela : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील महिला बचत गट आणि एकल महिलांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. कुंभमेळ्यादरम्यान लागणारे पूजा साहित्य, भेटवस्तू, शोभेच्या वस्तू तसेच विविध उपयोगी साहित्य तयार करण्याची जबाबदारी महिला बचत गटांकडे सोपविण्यात येत आहे. (Nashik Simhastha Kumbh Mela)



सिंहस्थात महिलांना रोजगाराची मोठी संधी


सिंहस्थ कुंभमेळ्यात तीनपेक्षा अधिक पर्वण्या होणार असून, या काळात देश-विदेशातून मोठ्या संख्येने भाविक आणि पर्यटक नाशिकमध्ये दाखल होणार आहेत. गोदावरीत अमृतस्नान केल्यानंतर दीपदानासह विविध धार्मिक विधी करण्याची भाविकांची परंपरा आहे. याशिवाय नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे गोदा आरतीचे आयोजनही करण्यात येणार आहे. या धार्मिक कार्यक्रमांसाठी आवश्यक असलेल्या पूजेच्या थाळ्या आकर्षक पद्धतीने तयार करण्याचे काम पेठ, हरसूल आणि त्र्यंबकेश्वर परिसरातील बचत गटांना देण्यात आले आहे. या थाळ्यांमध्ये कुंकू, हळद, कापूर, पंचगव्य आणि कापसाच्या वाती यांसारखे पूजासाहित्य महिलांकडून तयार केले जाणार आहे. भाविकांच्या गरजेनुसार या थाळ्या लहान आणि मोठ्या अशा दोन्ही आकारांत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. (Nashik Simhastha Kumbh Mela)



बांबूपासून आकर्षक भेटववस्तूंचे नियोजन


कुंभमेळ्यासाठी मंत्री, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी तसेच अतिमहत्त्वाच्या व्यक्ती मोठ्या संख्येने नाशिकमध्ये येणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी प्रशासनाकडून बांबूपासून तयार केलेल्या आकर्षक भेटवस्तू देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी हरसूल परिसरात क्लस्टर उभारण्यात येत असून, बचत गटातील महिलांना बांबूपासून विविध शोभेच्या वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. कुंभपर्व पावसाळ्यात होत असल्याने भाविक आणि पर्यटकांच्या गरजा लक्षात घेऊन छत्री, रेनकोट यांसह विविध वस्तू तयार करण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे. पर्यावरणाचे संरक्षण आणि प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी कापडी पिशव्या तयार करण्यावरही भर दिला जात आहे. (Nashik Simhastha Kumbh Mela)



१० हजारांहून अधिक महिलांना रोजगार


कुंभमेळ्याच्या काळात नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे महिला बचत गटांनी तयार केलेल्या शोभेच्या वस्तू, खाद्यपदार्थ आणि नैसर्गिक उत्पादनांचे प्रदर्शनही भरविण्यात येणार आहे. त्यामुळे विशेषतः आदिवासी महिलांना स्थानिक पातळीवर रोजगार आणि त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळण्याची संधी उपलब्ध होणार आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील तब्बल नऊ हजारांहून अधिक बचत गट सहभागी होत असून, त्यातून दहा हजारांपेक्षा अधिक महिलांना रोजगाराच्या संधी मिळण्याची अपेक्षा आहे. सिंहस्थ कुंभमेळा हा जगभरातील भाविकांसाठी मोठा धार्मिक उत्सव असला, तरी त्यासोबतच स्थानिक महिलांसाठी आर्थिक सक्षमीकरणाची संधीही ठरणार आहे.

Comments
Add Comment

Nashik Crime : तरुणाचा गळा आवळून खून, परिसरात खळबळ

Nashik Crime News : नाशिक जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ओझर शहरातील मध्यवर्ती असलेल्या संभाजी चौक परिसरात

Devendra Fadnavis : तिबेटमध्ये अडकलेल्या ३७ महाराष्ट्रातील नागरिकांची मुख्यमंत्री फडणवीसांमुळे सुटका

- सागाहून काठमांडूकडे सुरक्षित प्रवास सुरू; ठाणे, पुणे, अलिबाग, रायगड आणि डोंबिवली परिसरातील भाविकांचा

Nashik : सिंहस्थाच्या स्वागतासाठी नाशिक सज्ज ! ‘कुंभ भक्ती संगम’चे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

Nashik : नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची (Simhastha Kumbh Mela) सांस्कृतिक नांदी आजपासून होत

Keshav Srushti : केशवसृष्टीत सहल नेण्याचा काँग्रेस, सपाचा विरोध मोडून काढला

महापालिका सातवीच्या मुलांची सहल केशवसृष्टीत जाणारच, स्थायी समितीत प्रस्तावाला मंजुरी मुंबई (विशेष प्रतिनिधी)

Mumbai Mayor : मुंबईचा पुढील महापौर शिवसेनेचाच! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा दावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : सध्या मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर असला तरी येणारा पुढील महापौर हा शिवसेनेचाच असेल

Kanjurmarg Station Footpath : कांजूरमार्ग रेल्वे स्थानक परिसरासह एलबीएसचा मार्गाच्या पदपथ होणार मोकळ्या

तब्बल या परिसरातील १००हून अधिक गाळ्यांवर होणार कारवाई मुंबई विशेष प्रतिनिधी : कांजूरमार्ग रेल्वेथ स्थानक