Nashik : सिंहस्थाच्या स्वागतासाठी नाशिक सज्ज ! ‘कुंभ भक्ती संगम’चे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

Nashik : नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची (Simhastha Kumbh Mela) सांस्कृतिक नांदी आजपासून होत आहे. २८ ते ३० ऑगस्टदरम्यान नाशिकमध्ये ‘सिंहस्थ महाकुंभ भक्ती संगम’ या विशेष महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन आज, शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) यांच्या हस्ते होणार आहे.



तीन दिवसीय महोत्सव कुठे रंगणार ?


त्र्यंबक रस्त्यालगतच्या ठक्कर डोम येथे हा तीन दिवसीय महोत्सव रंगणार असून, देशाच्या विविध भागांतील भक्तिपरंपरा, संस्कृती आणि कलाप्रकार एकाच व्यासपीठावर पाहायला मिळणार आहेत. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या (Simhastha Kumbh Mela) पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेला हा पहिलाच मोठा सांस्कृतिक कार्यक्रम असल्याने त्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. या महोत्सवात महाराष्ट्राची समृद्ध कीर्तन परंपरा, पंजाबची गुरबाणी शबद कीर्तन परंपरा आणि मणिपूरचे वैशिष्ट्यपूर्ण नट संकीर्तन यांचा संगम पाहायला मिळणार आहे. विविध प्रदेशांच्या भक्तिपरंपरांमधील वैविध्य दाखवतानाच, या सर्व परंपरांना जोडणारा भक्तीचा समान धागा अधोरेखित करणे हा महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे.



नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावण्याचे आवाहन


महोत्सवाच्या पहिल्या दिवशी अमृताश्रम स्वामी महाराज यांच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. त्यानंतर प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांच्या ‘अभंगवारी’चे सादरीकरण होणार आहे. तर ३० ऑगस्ट रोजी महोत्सवाच्या अंतिम दिवशी देशाच्या विविध भागांतील भक्तिपरंपरांचा विशेष अनुभव घेता येणार आहे. दुपारी अमृतसर येथील श्री दरबार साहिबचे भाई मनिंदर सिंह हजुरी रागी यांचे गुरबाणी शबद कीर्तन होईल. त्यानंतर मणिपूरच्या नट संकीर्तन महाजेग्याचे सादरीकरण करण्यात येणार आहे.सायंकाळी निवृत्ती महाराज इंदुरीकर (Nivrutti Maharaj Indurikar) यांच्या कीर्तनाने या तीन दिवसीय महोत्सवाची सांगता होणार आहे. या अनोख्या भक्ती संगमाचा नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री गिरीश महाजन (Guardian Minister Girish Mahajan) यांनी केले आहे.



विकासकामांचे उद्घाटन अन् लोकार्पण


दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाशिक दौऱ्यात विविध विकासकामांचे उद्घाटन आणि लोकार्पणही होणार आहे. दिंडोरी तालुक्यातील शिवनई येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक कॅम्पसचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच दिंडोरी तालुक्यातील चाचडगाव येथे मविप्र शिक्षण संस्थेच्या कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटनही मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे

Comments
Add Comment

Simhastha Kumbh Mela : सिंहस्थात महिलांना रोजगाराची मोठी संधी ! ९ हजारांहून अधिक बचत गटांचा सहभाग

Simhastha Kumbh Mela : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील महिला बचत गट आणि एकल महिलांसाठी

Devendra Fadnavis : तिबेटमध्ये अडकलेल्या ३७ महाराष्ट्रातील नागरिकांची मुख्यमंत्री फडणवीसांमुळे सुटका

- सागाहून काठमांडूकडे सुरक्षित प्रवास सुरू; ठाणे, पुणे, अलिबाग, रायगड आणि डोंबिवली परिसरातील भाविकांचा

Keshav Srushti : केशवसृष्टीत सहल नेण्याचा काँग्रेस, सपाचा विरोध मोडून काढला

महापालिका सातवीच्या मुलांची सहल केशवसृष्टीत जाणारच, स्थायी समितीत प्रस्तावाला मंजुरी मुंबई (विशेष प्रतिनिधी)

Mumbai Mayor : मुंबईचा पुढील महापौर शिवसेनेचाच! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा दावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : सध्या मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर असला तरी येणारा पुढील महापौर हा शिवसेनेचाच असेल

Kanjurmarg Station Footpath : कांजूरमार्ग रेल्वे स्थानक परिसरासह एलबीएसचा मार्गाच्या पदपथ होणार मोकळ्या

तब्बल या परिसरातील १००हून अधिक गाळ्यांवर होणार कारवाई मुंबई विशेष प्रतिनिधी : कांजूरमार्ग रेल्वेथ स्थानक

Cooper Hospital Mumbai : कुपर रुग्णालयात येत्या मार्च पर्यंत मिळणार एमआयसीयू सुविधा

स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर मुंबई (विशेष प्रतिनिधी) : विलेपार्ले येथील कुपर रुग्णालयात सध्या १०