Palghar Crime : पहाटे घराबाहेर पडली, प्रियकराच्या घरी गेली अन्...१७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; कुटुंबीयांचा घातपाताचा संशय

पालघर : पालघर जिल्ह्यातील (Palghar) डहाणू तालुक्यात (Dahanu News) एक अत्यंत धक्कादायक आणि गूढ घटना उघडकीस आली असून, १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे. कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र खळबळ उडाली आहे. प्राप्त माहितीनुसार, ही मुलगी तिच्या पालघरमधील प्रियकराच्या घरी गेली होती. तिथे असताना अचानक तिची तब्येत बिघडली. त्यानंतर पहाटेच्या सुमारास घराबाहेर पडताना पाय घसरून ती खाली पडली आणि तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, असा दावा केला जात आहे. स्थानिक नागरिकांनी तिला तातडीने उपचारासाठी कासा येथील रुग्णालयात नेले; मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले.



या घटनेमुळे मुलीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांनी या मृत्यूबाबत तीव्र संशय व्यक्त केला आहे. केवळ पाय घसरून पडल्याने एवढी गंभीर दुखापत होऊन मृत्यू कसा होऊ शकतो, असा प्रश्न उपस्थित करत कुटुंबीयांनी घातपाताची शक्यता वर्तवली आहे. मुलगी प्रियकराच्या घरी का गेली होती, तिची प्रकृती अचानक कशी बिघडली, ती पहाटेच्या वेळी एकटीच बाहेर का पडली आणि डोक्यावरील दुखापत नेमकी कशामुळे झाली, या सर्व बाबींची सखोल चौकशी करण्याची मागणी आता जोर धरत आहे.


याप्रकरणी कासा पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या लोकांचे तसेच प्रियकराचे जबाब नोंदवले जात असून प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी केली जात आहे. मुलीचा मृत्यू नेमका अपघाताने झाला की यामागे काही मोठे कारस्थान आहे, याचे सत्य शवविच्छेदन अहवाल (Post-Mortem Report) आणि पोलीस तपासानंतरच समोर येईल. सध्या या घटनेने संपूर्ण तालुक्याचे लक्ष पोलीस तपासाकडे वेधले गेले आहे.

Comments
Add Comment

Sunetra Pawar : बारामतीत 34 कोटींच्या क्रीडा संकुलाची पाहणी; युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय संधी मिळणार, सुनेत्रा पवारांचा विश्वास

बारामती: बारामती येथील जिल्हा क्रीडा संकुलामुळे युवा खेळाडूंना अत्याधुनिक सुविधा मिळून त्यांना आंतरराष्ट्रीय

Disha Salian case : दिशा सालियन प्रकरणात मुंबई हायकोर्टाचे सरकारला सवाल; ‘वडिलांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळायलाच हवीत’

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी व्यवस्थापक दिशा सालियन यांच्या मृत्यू

Nashik Crime News : गणेशोत्सवाच्या वर्गणीवरून वाद टोकाला ! सुरगाण्याच्या युवकाची सापुताऱ्यात हत्या

Nashik Crime News : गुजरातमधील सापुतारा येथे गणपती वर्गणीच्या जुन्या वादातून हेमंत सूर्यवंशी (२९, रा. होळी चौक, सुरगाणा) या

Tibet dam failure alert : चिखलात बेपत्तांचा शोध अन् मदतकार्य सुरु असतानाच पुन्हा धडकी भरवणारा इशारा; तिबेटमध्ये पाण्याचा बांध फुटल्याची भीती

नेपाळ : नेपाळमध्ये तिबेटच्या हिमकडा कोसळण्याने आलेल्या भीषण फ्लॅश फ्लडच्या विनाशातून सावरण्याचा प्रयत्न सुरू

Nashik : पेठ तालुक्यातील ११ पर्यटक काठमांडूत अडकले, सुरक्षित परतीसाठी आवश्यक कार्यवाही सुरु

Nashik : नेपाळमध्ये भीषण महापुराने सर्वत्र हाहाकार माजवला आहे. नेपाळमध्ये भारतातील अनेक नागरिक अडकल्याची माहिती

Nashik Crime : तरुणाचा गळा आवळून खून, परिसरात खळबळ

Nashik Crime News : नाशिक जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ओझर शहरातील मध्यवर्ती असलेल्या संभाजी चौक परिसरात