ठाणे आणि डोंबिवली स्थानकाच्या विस्तारासाठी विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वेचा मुंबई विभाग हा १५ डब्यांच्या गाड्या सामावून घेण्यासाठी ठाणे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ३ व ४ आणि डोंबिवली स्थानकावरील प्लॅटफॉर्म १ए, १ व २ यांच्या विस्तारासाठी शनिवार २१ मार्च २०२६ रोजी (शनिवार/रविवारच्या मध्यरात्रीपासून ते रविवारच्या सकाळपर्यंत) एक विशेष 'ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक' घेणार आहे.




  1. ब्लॉकचा दिनांक: २१/२२.०३.२०२६ (शनिवार/रविवार मध्यरात्रीपासून ते रविवार सकाळपर्यंत)

  2. ब्लॉकचा कालावधी: दिनांक २२.०३.२०२६ रोजी ००.०० वाजल्यापासून १०.०० वाजेपर्यंत

  3. ब्लॉकचा विभाग: मुलुंड ते ठाणे आणि दिवा ते डोंबिवली (अप व डाऊन धीम्या मार्गांवर) — (क्रॉस ओव्हर्स वगळून).


परिणाम


ब्लॉकच्या कालावधीत काही उपनगरीय सेवा रद्द राहतील. तसेच २१ मार्च रोजी १०.४९ वाजता परळ येथून सुटणाऱ्या ट्रेन पासून २२ मार्च रोजी रात्री १२.१२ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या 'डाऊन धीम्या' सेवा; तसेच २२ मार्च रोजी विद्याविहार येथून ०४.४५ वाजता सुटणाऱ्या ते ०९.०५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या सेवा मुलुंड स्थानकावर 'डाऊन जलद' मार्गावर वळवण्यात येतील आणि पुढे ठाणे स्थानकावर पुन्हा 'डाऊन धीम्या' मार्गावर वळवण्यात येतील. काही 'डाऊन धीम्या' सेवा दिवा स्थानकावर 'डाऊन जलद' मार्गावर वळवण्यात येतील आणि त्या कोपर व ठाकुर्ली स्थानकांवर थांबणार नाहीत.


नियोजनानुसार २१ मार्च रोजी ११.२६ ते ११.५२ या वेळेत आणि २२ मार्च रोजी पहाटे ०३.२३ ते सकाळी ०९.५५ या वेळेत कल्याण येथून सुटणाऱ्या 'अप धीम्या' मार्गावरील गाड्यांना कल्याण येथे 'अप जलद' मार्गावर वळवण्यात येतील; त्यामुळे या गाड्या ठाकुर्ली आणि कोपर स्थानकांवर थांबणार नाहीत. पुढे दिवा आणि ठाणे स्थानकांदरम्यान या गाड्यांना पुन्हा 'अप धीम्या' मार्गावर वळवण्यात येईल. तसेच, ठाणे आणि मुलुंड स्थानकांदरम्यान 'अप धीम्या' मार्गावरील पुढील गाड्यांना 'अप जलद' मार्गावर वळवण्यात येईल.


* ब्लॉक कालावधीत, 'अप' आणि 'डाऊन' जलद गाड्या त्यांच्या नियोजित थांब्यांव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा आणि दिवा या स्थानकांवरही थांबतील.
* रविवार २२ मार्च रोजी डोंबिवली येथे समाप्त होणाऱ्या किंवा तिथूनच सुरू होणाऱ्या सर्व गाड्या रद्द राहतील.
* ब्लॉक कालावधीत, मुलुंड-ठाणे आणि दिवा-कल्याण या स्थानकांदरम्यानच्या 'अप' आणि 'डाऊन' दिशेकडील सर्व उपनगरीय गाड्या रद्द राहतील.
* ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/दादर येथून सुटणाऱ्या 'डाऊन' मेल आणि एक्सप्रेस गाड्यांना विद्याविहार/ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यानच्या ५ व्या मार्गावरून वळवण्यात येईल.
* ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/दादर येथे येणाऱ्या 'अप' मेल आणि एक्सप्रेस गाड्यांना कल्याण आणि ठाणे/विद्याविहार स्थानकांदरम्यानच्या ६ व्या मार्गावरून वळवण्यात येईल.


पायाभूत सुविधांची देखभाल आणि सुरक्षिततेसाठी हा 'मेगाब्लॉक' अत्यंत आवश्यक आहेत. यामुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.

Comments
Add Comment

विक्रोळी पूर्व - पश्चिम उड्डाणपुलावर तेल गळती, दुचाकीस्वार घसरून पडले; महापौरांनी केली मदत

महापौरांनी ताफा थांबवून यंत्रणांना केल्या सूचना मुंबई (विशेष प्रतिनिधी) : विक्रोळी पूर्व - पश्चिम जोडणाऱ्या

मध्य रेल्वेचा ट्रान्स हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वेचा मुंबई विभाग विविध अभियांत्रिकी आणि देखभाल-दुरुस्तीची कामं करण्यासाठी रविवार २२ मार्च २०२६

मुंबईतील १३ नवीन मराठी शाळांना अनुदान मंजूर

प्रथमच अनुदान मंजूर झालेल्या २२ शाळांमध्ये १३ मराठी माध्यमांच्या शाळांचा समावेश मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई

बोरिवलीत तीन दिवसांचा मिलेट महोत्सव

मुंबई : राज्यात ज्वारी, बाजरी, नाचणी ही प्रमुख तृणधान्ये (मिलेट्स) आहेत. कमी पाण्यावर येणारी तसेच पर्यावरणपूरक

बाजार समित्यांचे आधुनिकीकरण व ‘मॅग्नेट’ प्रकल्पासाठी एडीबी सहकार्य करणार

मुंबई : महाराष्ट्रातील कृषी बाजार व्यवस्थेच्या आधुनिकीकरणाला गती देण्यासाठी आशियाई विकास बँकेचे (एडीबी)

उपराष्ट्रपतींच्या उपस्थितीत रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा पहिला दीक्षांत सोहळा

मुंबई : रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा पहिला दीक्षांत सोहळा शनिवार, २१ मार्च २०२६ रोजी दुपारी २