मुंबईतील १३ नवीन मराठी शाळांना अनुदान मंजूर

प्रथमच अनुदान मंजूर झालेल्या २२ शाळांमध्ये १३ मराठी माध्यमांच्या शाळांचा समावेश


मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका शिक्षण समितीच्या माध्यमातून मनपा शाळांच्या अनुदान प्रक्रियेला गती देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आणि सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षण समितीच्या अध्यक्षा राजश्री राजेश शिरवडकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर २२ शाळांना प्रथमच अनुदान मंजूर करण्यात आले, त्यात १३ मराठी माध्यमाच्या शाळांचा समावेश आहे. या माध्यमातून एकप्रकारे मराठी माध्यमाच्या शाळांना आधार देत प्रकारे मराठी शाळांची संख्या अधिकाधिक वाढवण्यासाठी पुढाकार घेतला जात आहे.


मुंबई महापालिकेच्या वतीने प्राथमिक शाळांना अनुदान देण्याच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी शिक्षण समितीमार्फत टप्प्याटप्प्याने कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. या प्रक्रियेअंतर्गत पहिल्या टप्प्यात ७ शाळांना अनुदान मंजूर करण्यात आले, त्यापैकी ३ शाळा या मराठी माध्यमाच्या आहेत. महापालिका अस्तित्वात आल्यानंतर आणि शिक्षण समिती अध्यक्षांची निवड झाल्यानंतर पहिल्या शिक्षण समितीच्या बैठकीत २२ शाळांना प्रथमच अनुदान मंजूर करण्यात आले, यामध्ये १३ शाळा मराठी माध्यमाच्या असल्याने मराठी माध्यमाच्या शिक्षणाला मोठा आधार मिळाला आहे.


तसेच १२ शाळांच्या मान्यता मुदतवाढ प्रस्तावांना शिक्षण समितीने मंजुरी दिली असून, त्यामध्ये ५ शाळा मराठी माध्यमाच्या आहेत. यामुळे या शाळांच्या शैक्षणिक कामकाजाला आवश्यक स्थैर्य आणि पाठबळ मिळणार आहे.याशिवाय सध्या ४५ शाळांचे प्रस्ताव प्रशासकीय तसेच शिक्षण समितीच्या मंजुरीसाठी प्रक्रियेत असून, ते लवकरच मंजुरीसाठी ठेवले जाणार आहेत.


महापालिका शिक्षण विभागाकडून ही संपूर्ण प्रक्रिया नियमांनुसार आणि पारदर्शक पद्धतीने राबवली जात असून, पात्र शाळांना टप्प्याटप्प्याने अनुदान देण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आणि महापालिका शाळांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षण समिती सातत्याने प्रयत्नशील असल्याची माहिती शिक्षण समितीच्या अध्यक्ष राजेश्री शिरवडकर यांनी दिली.

Comments
Add Comment

Weather changes in Maharashtra : महाराष्ट्रात पुन्हा बदलले हवामान; शनिवारी अनेक भागांत पावसाचा अंदाज, ७ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी!

मुंबई : महाराष्ट्रामध्ये मान्सूनचे वारे पुन्हा एकदा सक्रिय झाले असून, राज्याच्या विविध भागांत पावसाचा जोर

Devendra Fadnavis : भारतीय ज्ञानपरंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम घडविणारे राष्ट्रीय शैक्षणिक केंद्र नाशिकमध्ये उभारणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

केंद्रीय संस्कृत विद्यापीठासाठी १६.८० हेक्टर जमिनीचा ७/१२ उतारा विद्यापीठाला

Ganpati Special Trains : कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी, पश्चिम रेल्वेच्या गणपती स्पेशल ट्रेनची घोषणा

मुंबई : दरवर्षी प्रमाणे यंदाही पश्चिम रेल्वेने कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या सोयीसाठी निवडक गणपती स्पेशल

Megablock : मध्य,पश्चिम रेल्वेचा रविवारी मेगाब्लॉक; अनेक लोकल सेवा रद्द, काहींच्या मार्गात बदल

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून रविवारी विविध अभियांत्रिकी, संकेत व्यवस्था आणि पायाभूत सुविधांच्या

Pratik Karpe : भविष्यातील ग्लोबल वॉर्मिंगचा धोका लक्षात घेता मुंबईतील नैसर्गिक जलस्रोतांचे एआय व सॅटेलाईट मॅपिंग द्वारे सर्वेक्षण करा; नगरसेवक प्रतीक कर्पे यांची मागणी

मुंबई : भविष्यात उद्भवणाऱ्या ग्लोबल वॉर्मिंगच्या (जागतिक तापमानवाढ) गंभीर धोक्याचा आणि वातावरणीय बदलांचा सामना

Jumbo Block : पश्चिम रेल्वेचा हार्बर मार्गावर जम्बो ब्लॉक

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या हार्बर मार्गावर रविवार ९ ऑगस्ट २०२६ रोजी जम्बो ब्लॉक आहे. प्रवाशांनी या जम्बो ब्लॉकची