मध्य रेल्वेचा ट्रान्स हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वेचा मुंबई विभाग विविध अभियांत्रिकी आणि देखभाल-दुरुस्तीची कामं करण्यासाठी रविवार २२ मार्च २०२६ रोजी ठाणे आणि वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ‘ट्रान्स हार्बर’ मार्गावर 'मेगा ब्लॉक' घेणार आहे. ट्रान्स-हार्बर मार्गावरील ठाणे आणि वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान 'अप' आणि 'डाऊन' मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीत वाशी/नेरुळ आणि ठाणे स्थानकांदरम्यान 'अप' आणि 'डाऊन' ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.


ठाणे येथून सकाळी १०.३५ ते दुपारी ०४.०७ वाजेपर्यंत वाशी / नेरुळ / पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या 'डाऊन' मार्गावरील सेवा, तसेच पनवेल / नेरुळ / वाशी येथून सकाळी १०.२५ ते दुपारी ०४.०९ वाजेपर्यंत ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या 'अप' मार्गावरील सेवा रद्द राहतील.


पायाभूत सुविधांची देखभाल आणि सुरक्षिततेसाठी हा 'मेगाब्लॉक' अत्यंत आवश्यक आहेत. यामुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.

Comments
Add Comment

Kalyan Crime : कल्याणमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या दोन धक्कादायक घटना; आरोपी पती अटकेत

कल्याण: शहरात महिलांवरील अत्याचाराच्या दोन धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. एका घटनेत कौटुंबिक वादातून पतीने

Weather Update : जुलैमध्ये पाऊस येणार ? अरबी समुद्रावरील मान्सूनचे ढग गायब

महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात उष्णतेमुळे नागरिक हैराण झालेत त्यात आता अरबी समुद्रामुळे मान्सूनचे ढग गायब झाले

Minister Adv. Shelar : कातळशिल्पांच्या वैज्ञानिक संवर्धनाला नवीन गती देण्यासाठी सामंजस्य करार

मुंबई: कोकणातील जागतिक महत्त्वाच्या कातळशिल्पांच्या वैज्ञानिक अभ्यास, डिजिटल दस्तऐवजीकरण आणि संवर्धनासाठी

Devendra Fadnavis : मुंबई मेट्रोमुळे दुग्धजन्य पदार्थांना मिळणार मोठी बाजारपेठ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; वारणा सहकारी दूध उत्पादक संघाच्या स्टॉलचे उद्घाटन मुंबई : ग्रामीण भागातील

Ashish Shelar : मुंबईत मीडिया हब उभारणार, डिजिटल कंटेंट क्षेत्राला नवी दिशा मिळणार

मुंबई: भारतातील माहितीपट, लघुपट, ॲनिमेशन आणि एआय-निर्मित (AI-generated) चित्रपटांसाठीचा प्रतिष्ठेचा १९ वा मुंबई

Mumbai News: सरकारी अधिकारी असल्याची बतावणी करत व्यापाऱ्यांना ब्लॅकमेल; रिलस्टार रणदीप गुजराल अटकेत

मुंबई : मुलुंड (Mulund) परिसरातील एका व्यावसायिकाला धमकावून खंडणी उकळणाऱ्या रणदीप हरबिंदरसिंग गुजराल (वय 40) या