केंद्र सरकारचा बेटिंग आणि जुगाराच्या अ‍ॅप्सवर स्ट्राईक

नवी दिल्ली : देशातील वाढत्या बेकायदेशीर ऑनलाइन जुगार आणि सट्टेबाजीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने आता अत्यंत कठोर पाऊल उचलले आहे. माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने एका मोठ्या कारवाईत ३०० हून अधिक बेकायदेशीर बेटिंग वेबसाइट्स आणि मोबाइल अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. केंद्र सरकारच्या या धडक कारवाईमुळे ऑनलाइन जुगार चालवणाऱ्या जाळ्यांचे कंबरडे मोडले असून, डिजिटल माध्यमांतून होणाऱ्या आर्थिक फसवणुकीला लगाम बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


केंद्र सरकारकडून बेकायदेशीर सट्टेबाजींविरोधातील मोहीम गेल्या काही काळापासून सातत्याने राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत ८ हजार ४०० वेबसाइट्सवर कारवाई करण्यात आली आहे. विशेषतः सरकारने लागू केलेल्या नवीन 'ऑनलाइन गेमिंग' नियमानंतर ही प्रक्रिया अधिक गतिमान झाली आहे. या नव्या कायद्याचा आधार घेत प्रशासनाने तब्बल ४,९०० वेबसाइट्स आणि अ‍ॅप्स पूर्णपणे ब्लॉक केली आहेत. यामध्ये अनेक परदेशी अ‍ॅप्सचाही समावेश असून, जे भारतीय चलनामध्ये सट्टा लावण्यासाठी प्रवृत्त करत होते.


सरकारने केलेल्या या कारवाईची व्याप्ती मोठी आहे. यामध्ये प्रामुख्याने ऑनलाइन स्पोर्ट्स बेटिंग प्लॅटफॉर्म्सचा समावेश आहे, जे क्रिकेट, फुटबॉल आणि इतर मोठ्या क्रीडा स्पर्धांवर सट्टा लावण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देत होते. यासोबतच ऑनलाइन कॅसिनो, स्लॉट्स, रूलेट आणि लाईव्ह डीलर गेम्स चालवणाऱ्या वेबसाइट्सवरही बंदी घालण्यात आली आहे.

Comments
Add Comment

ऊर्जा क्षेत्रात गुंतवणुकीसाठी पंतप्रधान मोदींचे जागतिक गुंतवणूकदारांना आमंत्रण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक गुंतवणूकदारांना भारताच्या ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले

होर्मुझमध्ये अडकलेल्या भारतीय कॅप्टनचा मृत्यू; १८ दिवस समुद्रात अडकून वैद्यकीय मदतीअभावी दुर्दैवी अंत

पश्चिम आशियातील तणावाचा मानवी परिणाम समोर आला असून होर्मुझच्या सामुद्रधुनीत अडकलेल्या ‘अवाना’ जहाजाचे कॅप्टन

पश्चिम आशियात तणाव वाढला; पंतप्रधान मोदींनी केली आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा

- ऊर्जा प्रकल्पांवरील हल्ल्यांचा भारताकडून तीव्र निषेध पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर

गोव्याचे मुख्यमंत्री लेकीला भेटायला पुण्यात आले अन् रुग्णालयात अॅडमिट झाले, नेमकं झालं काय?

पुणे: गुढी पाडव्यानिमित्ताने आपल्या मुलीला भेटण्यासाठी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत पुण्यात आले होते.

Stormy weather : वादळी हवामानाचा अनेक उड्डाणांवर परिणाम; एअरलाइनकडून प्रवाशांसाठी ट्रॅव्हल ऍडव्हायझरी जारी

नवी दिल्ली : देशातील दोन प्रमुख शहरे दिल्ली आणि बंगळुरू येथे मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचा

Iran-US-Israel War : इराण - कतार तणावाचा थेट भारताला फटका; वीज उत्पादन धोक्यात

मध्य पूर्वात भडकलेल्या युद्धाची झळ आता भारताच्या स्वयंपाकघरांपासून ते कारखान्यांपर्यंत पोहोचली आहे. इराणने