होर्मुझमध्ये अडकलेल्या भारतीय कॅप्टनचा मृत्यू; १८ दिवस समुद्रात अडकून वैद्यकीय मदतीअभावी दुर्दैवी अंत

पश्चिम आशियातील तणावाचा मानवी परिणाम समोर आला असून होर्मुझच्या सामुद्रधुनीत अडकलेल्या ‘अवाना’ जहाजाचे कॅप्टन राकेश रंजन सिंह (Rakesh Ranjan Singh) यांचे निधन झाले आहे. २८ फेब्रुवारीपासून जहाज समुद्रात अडकले होते आणि तब्बल १८ दिवस तेथेच थांबावे लागले.


मूळचे बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील रहिवासी असलेले सिंह यांचे कुटुंब सध्या रांची येथे राहते. त्यांच्या निधनाची बातमी समजताच कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.


माहितीनुसार, १८ मार्च रोजी त्यांची प्रकृती अचानक बिघडली. जहाजावरील अधिकाऱ्यांनी दुबई एटीसीकडे एअर अॅम्ब्युलन्सची मागणी केली, मात्र युद्धजन्य परिस्थितीमुळे परवानगी मिळू शकली नाही. त्यानंतर बोटीने किनाऱ्यावर आणण्याचा प्रयत्न झाला, पण तोपर्यंत उशीर झाला होता. अखेरीस हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.


‘अवाना’ जहाजावर कॅप्टन सिंह यांच्यासह सुमारे ३५ कर्मचारी अडकले होते. या काळात त्यांना आवश्यक वैद्यकीय सुविधा मिळू शकल्या नाहीत, ज्यामुळे ही दुर्दैवी घटना घडल्याचे बोलले जात आहे.

Comments
Add Comment

National Sports Awards 2025 : यंदाचा 'खेळरत्न' पुरस्कार हुकला! दिव्या देशमुख, तेजस्विन शंकरसह १७ खेळाडूंना 'अर्जुन पुरस्कार' घोषित

क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च आणि मानाच्या मानल्या जाणाऱ्या 'राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२५' National Sports Awards 2025) ची घोषणा

BSNL 5G Launch : BSNL ५जी कधी लाँच होणार ? सिम बदलावे लागणार की सॉफ्टवेअर अपग्रेड ? जाणून घ्या सर्व उत्तरे!

सरकारी टेलिकॉम कंपनी 'भारत संचार निगम लिमिटेड' (BSNL) आपल्या कोट्यवधी ग्राहकांसाठी ५जी (5G) सेवा सुरू करण्याच्या

Twisha Sharma Death Case : ट्विशा शर्मा प्रकरणात CBI चा मोठा खुलासा! वहिनीला शेवटचा मेसेज अन् अवघ्या काही मिनिटांत...

CBI कडून ६३६ पानांचे आरोपपत्र दाखल मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) प्रसिद्ध मॉडेल-अभिनेत्री ट्विशा शर्मा (Twisha

Chrome Security Alert : Google Chrome वापरताय? थांबा...पहिलं हे काम करा, केंद्र सरकारचा हाय-अलर्ट

मुंबई : तुम्हीही रोजच्या कामासाठी लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर 'गुगल क्रोम' (Google Chrome) ब्राउझर वापरत असाल, तर ही बातमी

Bhandup News : आधी बाबा गेले, आता आईची साथ सुटली; मुलीने मुखाग्नी देत निभावले अंतिम कर्तव्य, भांडुपवासीयांचे डोळे पाणावले

रत्नागिरी : नियतीचा खेळ अथांग आणि अतिशय निष्ठूर असतो, याचाच प्रत्यय आणून देणारी एक दुःखद घटना मुंबईतील भांडुप

12th BRICS Meeting : नवी दिल्लीत आज १२वी BRICS पर्यावरण मंत्रिस्तरीय बैठक; हवामान बदल आणि पर्यावरणीय सहकार्यावर होणार मंथन

नवी दिल्ली : भारताच्या BRICS अध्यक्षतेअंतर्गत १२वी BRICS पर्यावरण मंत्रिस्तरीय बैठक आज नवी दिल्लीत आयोजित करण्यात