Bomb Threat : मुंबई प्रेस क्लबला बॉम्बची धमकी; एका ईमेलमुळे खळबळ

- सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर


मुंबई : मुंबईत एक धक्कादायक प्रकार समोर आला असून मुंबई प्रेस क्लबला (Mumbai Press Club) धमकीचा ईमेल मिळाला आहे. या ईमेलमध्ये क्लबच्या आवारात गॅस बॉम्ब ठेवल्याचा दावा करण्यात आला असून दुपारी १ वाजता स्फोट घडवण्याची धमकी देण्यात आली होती.


घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. बॉम्ब शोध व नाशक पथक (BDDS) तसेच श्वान पथकांना तैनात करून संपूर्ण परिसरात सखोल तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे. सुरक्षेच्या दृष्टीने परिसरातील हालचालींवरही लक्ष ठेवण्यात येत आहे.


प्राथमिक तपासात हा ईमेल “नीरजा अजमल खान” या नावाने पाठवण्यात आल्याचे समोर आले आहे. संबंधित व्यक्तीने ईमेलमध्ये काही राजकीय दावेही केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.


दरम्यान, सायबर पथकांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून प्रोटॉन मेलद्वारे पाठवलेल्या ईमेलचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या कोणताही स्फोटक पदार्थ आढळून आलेला नसला तरी पोलीस अधिक सतर्कता बाळगत आहेत.

Comments
Add Comment

Mumbai Local : आता बिनधास्त प्रवास करा, महिलांच्या सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा दलानं सुरू केला 'हा' नवा उपक्रम

मुंबई : लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांना आता घाबरण्याची गरज नाही कारण चर्चगेट ते डहाणू दरम्यान लोकलनं प्रवास

Smruti Mandhana And Palash muchhal : स्मृती मानधना–पलाश मुच्छल पुन्हा एकत्र? बांद्र्यातील 'त्या' व्हिडिओने चर्चांना उधाण

मुंबई : भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांच्या नात्याबाबत पुन्हा एकदा चर्चांना

Ramdas Athawale : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची भेट

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल महामहीम जिष्णू देव वर्मा यांची रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय

Bhondubaba Ashok Kharat : भोंदू खरातविरोधात तक्रारींचा महापूर, लैंगिक शोषणाचे आणखी ११ आरोप

मुंबई : वासनांध अशोक खरात प्रकरण दिवसेंदिवस अधिक गंभीर होत असून, तक्रारींची संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे.

Bmc News, Andheri Subway : अंधेरी सब वे मधील पावसाचे तुंबणारे पाणी,  महापौरांनी  रेल्वेशी समन्वय राखून गती देण्याचे महापालिकेला दिले निर्देश

मुंबई : अंधेरी भूयारी मार्ग हा अतिसखल परिसर असल्याने पावसाळ्यात पाणी साचून वाहतुकीला अडथळा होतो. त्यावर

Bmc News : मुंबईत यापूर्वी खरेदी केलेल्या कचरा पेट्या गेल्या कुठे? महापालिका प्रशासनावर स्थायी समितीची प्रश्नांची सरबती

खासगी कंत्राटदार कचरा पेट्या देणार तर अधिक पेट्यांची खरेदी कशाला? पेट्या खरेदीचा प्रस्ताव अध्यक्षांनी ठेवला