गुढीपाडव्याच्या दिवशी बीकेसी पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मुंबई: मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत बीकेसीच्या पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. ईमेलद्वारे ही धमकी देण्यात आली आहे आणि विशेष म्हणजे सायनाइड गॅसद्वारे स्फोट घडवण्याचा उल्लेख मेलमध्ये करण्यात आला आहे. या धमकीची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच बॉम्ब शोधक व नाशक पथक आणि डॉग स्क्वॉडद्वारे सखोल तपासणी करण्यात येत आहे. गुडीपाडवा सण देखील आहे, त्यामुळे या घटनेने आणखीणच खळबळ वाढली आहे. तसेच यामुळे मुंबई अलर्टवर असणार आहेत.


मुंबईतील बीकेसी पासपोर्ट कार्यालयाला ईमेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली आहे. सायनाइड गॅसद्वारे स्फोट घडवण्याचा उल्लेख या मेलमध्ये करण्यात आला आहे. ही धमकी मिळताच पोलिसांचा तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच पोलिसांपाठोपाठ बॉम्ब शोधक व नाशक पथक आणि डॉग स्क्वॉड घटनास्थळी दाखल झाली असून सखोल तपासणी सुरू आहे.


दरम्यान क्राईम ब्रांचची टीमही तपासात सहभागी झाली आहे. या तपासादरम्यान कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. तसेच परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे आणि पोलिसांचा सतत बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान गुढीपाडवा सणाच्या निमित्ताने परिसरात अलर्ट असणार आहे.


या घटनेत नेमका धमकीचा हा ईमेल कुणी पाठवला याचा शोध घेतला जात आहे. तसेच तपास यंत्रणा देखील सतर्क झाल्या आहेत. त्यामुळे आता पोलिसांना ईमेल पाठवणाऱ्याचा शोध लागतो का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Comments
Add Comment

Reduce Plastic : तुमचा पहिला टूथब्रश आजही पृथ्वीवर कोठेतरी पडून आहे

प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी प्रत्येक घटकाला योगदान द्यावे लागेल: राज्यपाल जिष्णु देव वर्मा देशात दरवर्षी

Green Asha Indian Ship : इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जहाज ‘ग्रीन आशा’ मुंबईत दाखल

- होर्मुझ पार करत १५ हजार टन एलपीजीचा पुरवठा मुंबई : इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या ऊर्

Mumbai Local : आता बिनधास्त प्रवास करा, महिलांच्या सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा दलानं सुरू केला 'हा' नवा उपक्रम

मुंबई : लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांना आता घाबरण्याची गरज नाही कारण चर्चगेट ते डहाणू दरम्यान लोकलनं प्रवास

Smruti Mandhana And Palash muchhal : स्मृती मानधना–पलाश मुच्छल पुन्हा एकत्र? बांद्र्यातील 'त्या' व्हिडिओने चर्चांना उधाण

मुंबई : भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांच्या नात्याबाबत पुन्हा एकदा चर्चांना

Ramdas Athawale : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची भेट

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल महामहीम जिष्णू देव वर्मा यांची रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय

Bhondubaba Ashok Kharat : भोंदू खरातविरोधात तक्रारींचा महापूर, लैंगिक शोषणाचे आणखी ११ आरोप

मुंबई : वासनांध अशोक खरात प्रकरण दिवसेंदिवस अधिक गंभीर होत असून, तक्रारींची संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे.