Gudi Padwa 2026 : नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी दिल्या गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी गुढीपाडवा व मराठी नवीन वर्षा निमित्त राज्यातील जनतेला हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. देशाच्या विविध भागात हा सण चैत्र शुक्लादी, युगादि, संसर पाडवो आणि चेटी चंड म्हणून साजरा केला जातो.


गुढी पाडव्याचे मंगल पर्व तसेच आगामी वर्ष सर्वांच्या जीवनात उत्तम आरोग्य, सुख, समाधान व समृद्धी घेऊन येवो या शुभेच्छा देतो. युगादी, चेटी चाँद तसेच संसर पाडवो निमित्त देखील मी सर्वांना शुभेच्छा देतो, असे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.





हिंदू धर्मात गुढीपाडवा सणाला अतिशय महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो, जो मराठी नववर्षाचा प्रारंभ मानला जातो. पौराणिक कथेनुसार याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली, तर प्रभू श्रीराम वनवास संपवून अयोध्येत परतले. तसेच शालिवाहन राजाने शकांवर विजय मिळवून नवे युग सुरू केले. हा दिवस केवळ विजयाचे प्रतीक नसून चैतन्य आणि मांगल्याचा उत्सव आहे. घरोघरी उभारली जाणारी गुढी समृद्धीचे दर्शन घडवते. नव्या संकल्पांची सुरुवात करण्यासाठी आणि नकारात्मकता दूर करण्यासाठी गुढीपाडव्याचे महत्त्व अधोरेखित होते. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. हा दिवस शुभ म्हणून नवीन कामाचा, कार्याचा आरंभ या दिवशी केला जातो.



गुढीपाडवा का साजरा केला जातो? काय आहे या दिवसाचे महत्त्व? गुढीपाडव्याचा इतिहास काय आहे?


श्रीराम १४ वर्षे वनवास भोगून, रावणाचा वध करून, विजयी होऊन अयोध्या नगरीत आले, तो हाच वर्षप्रतिपदेचा दिवस होता.
ब्रह्मदेवाने ही सृष्टी निर्माण करण्यास सुरुवात केली, तो चैत्र होता. म्हणून त्या महिन्याची सुरुवात गुढी उभारून केली जाते, असे म्हणतात. शालिवाहनाने शकाचा पराभव करण्यासाठी मातीचे सहा हजार सैनिक तयार केले होते, त्यात प्राण निर्माण करुन फौज तयार केली आणि शकाचा पराभव केला, या पराक्रमाची आठवण म्हणून शालिवाहनाने चैत्र शुद्ध प्रतिपदेला आपला शक सुरू केला, असेही म्हणतात.

Comments
Add Comment

Ancient manuscripts : प्राचीन हस्तलिखिते मिळणार आता एका क्लिकवर

'ज्ञानभारतम्' मोहिमेला प्रारंभ; हस्तलिखितांच्या नोंदीसाठी पुणे-नागपूर मुख्य केंद्र मुंबई : भारताच्या प्राचीन

मित्रानं वाढदिवसाला न बोलावल्यानं २४ वर्षीय तरुणानं जीवन संपवलं अन्...

बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई तालुक्यातील कुंबफेळमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका २४ वर्षीय तरुणानं

Chief Minister Devendra Fadnavis : व्हिएतनामची महाराष्ट्रात ८.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती; उद्योग विभाग आणि ‘एमएमआरडीए’ यांच्यासोबत सामंजस्य करार मुंबई :

तब्बल १३ महिन्यांच्या प्रदीर्घ लढ्यानंतर साताऱ्याच्या नीलमचा अमेरिकेत अखेरचा श्वास!

सातारा : नियतीचा क्रूर खेळ आणि साताऱ्याच्या लेकीने दिलेला लढा, अखेर दुर्दैवाने संपला आहे. कराड तालुक्यातील

New structure of Shaktipeeth Highway : शक्तीपीठ महामार्गाच्या नव्या संरचनेत सिंधुदुर्गमधील १० गावांचा समावेश

मुंबई : प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला काही भागांतून होणारा शेतकऱ्यांचा तीव्र विरोध लक्षात घेता, राज्य

Samarjeetsinh Ghatge : समरजितसिंह घाटगे पुन्हा भाजपमध्ये

रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हाती घेतले कमळ; हसन मुश्रीफ यांच्यासोबतचे वैर संपल्याची दिली माहिती मुंबई :