Samarjeetsinh Ghatge : समरजितसिंह घाटगे पुन्हा भाजपमध्ये

रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हाती घेतले कमळ; हसन मुश्रीफ यांच्यासोबतचे वैर संपल्याची दिली माहिती


मुंबई : कोल्हापूरच्या राजकारणातील महत्त्वाचे नाव आणि कागलचे मातब्बर नेते समरजितसिंह घाटगे पुन्हा भाजपमध्ये दाखल झाले आहेत. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला सोडचिठ्ठी देऊन शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत गेलेल्या घाटगे यांनी बुधवारी अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला. विशेष म्हणजे, वर्षानुवर्षांचे पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्धी हसन मुश्रीफ यांच्यासोबतचे टोकाचे वैर आता संपले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने आम्ही आता एकत्र काम करणार असल्याचे घाटगे यांनी यावेळी स्पष्ट केले.


नरिमन पॉईंट येथील भाजप प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी भाजपचे कोल्हापूरमधील पदाधिकारी आणि घाटगे यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पक्षप्रवेशानंतर माध्यमांशी संवाद साधताना समरजितसिंह घाटगे म्हणाले, "कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आतापर्यंत अनेक राजकीय प्रयोग झाले, पण आता प्रयोगांना स्कोप नाही. आपण आपल्या मूळ पक्षात परतलो आहोत. आता चंद्रकांत पाटील आणि रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात जोमाने काम करायचे आहे. पक्षात सन्मानाने पुन्हा संधी दिल्याबद्दल भाजप नेतृत्वाचे आभार".



मुश्रीफ-घाटगे संघर्ष मिटला


कागलमध्ये गेली अनेक वर्षे हसन मुश्रीफ आणि समरजितसिंह घाटगे यांच्यात तीव्र राजकीय संघर्ष पाहायला मिळाला होता. मात्र, पक्षप्रवेशापूर्वी माध्यमांशी बोलताना घाटगे यांनी महत्त्वपूर्ण विधान केले. "हसन मुश्रीफ आणि माझ्यातील वैर आता संपले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ते सर्वांनी पाहिलेच आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेऊन हा संघर्ष संपवला असून, आगामी काळात आमचे उत्तम समन्वय जिल्ह्यात दिसेल," असे त्यांनी स्पष्ट केले.



शरद पवारांना कल्पना देऊनच निर्णय


राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष सोडण्यापूर्वी आपण ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतल्याचे घाटगे यांनी सांगितले. महापालिका निवडणुकीनंतर डिसेंबर महिन्यातच मी शरद पवार यांची भेट घेऊन माझी भूमिका स्पष्ट केली होती. त्यांना कल्पना देऊनच मी हा पुढचा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी नमूद केले.



घाटगे यांचा राजकीय प्रवास


२०१५ : भाजपमधून सक्रिय राजकारणात प्रवेश.
२०१८ : भाजपचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी.
२०१९ :उमेदवारी न मिळाल्याने मुश्रीफांविरोधात अपक्ष निवडणूक लढवली, मात्र पराभव.
२०२४ : महायुतीत कागलची जागा मुश्रीफांकडे गेल्याने शरद पवारांच्या पक्षात प्रवेश; विधानसभा निवडणुकीत निसटता पराभव.
२०२५ : स्थानिक निवडणुकांमध्ये मुश्रीफांशी जुळवून घेत युती.
८ एप्रिल २०२६ : पुन्हा अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश.

Comments
Add Comment

MPSC कडून राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2026 साठी अर्ज भरण्यास मुदतवाढ; उमेदवारांना मोठा दिलासा

अर्ज आणि शुल्क भरण्यासाठी मिळाली नवी मुदत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व

Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या;सर्वसामान्यांसाठी मोठी घरांची लॉटरी लवकर जाहीर करा - उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

म्हाडाच्या लॉटरीत प्रतिसाद न मिळणाऱ्या घरांची 'फर्स्ट कम, फर्स्ट सर्व्ह' तत्त्वावर विक्री करा;पुणे, शिरूर,

Shetkari Karjmafi update : कर्जमाफी योजनेत १ लाख ४० हजार शेतकरी अपात्र; प्राप्तिकर आणि अन्य कारणांनी वगळल्याची सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

१६ लाख ९६ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात दोन दिवसांत निधी जमा होणार मुंबई : राज्य सरकारने घोषित केलेल्या 'पुण्यश्लोक

Tuljabhavani Temple Land Case : तुळजाभवानीच्या १,६६८ हेक्टर जमिनींच्या कथित घोटाळ्यावर समिती आक्रमक; 'तातडीने ताबा घ्या, नाहीतर कोर्टात भेटू!'

पुणे : श्री तुळजाभवानी देवस्थानच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील

Devendra Fadnavis : गतिमान भूसंपादन करून औद्योगिक विकासाला चालना द्यावी

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; मुख्यमंत्र्यांनी घेतला एमआयडीसीअंतर्गत प्रकल्पांच्या भूसंपादनाचा आढावा मुंबई

Road Accident : घाटात मोठा अपघात, ब्रेक फेल झाला आणि ट्रकने SUV चिरडली; तीन वाहनांचे प्रचंड नुकसान

गडचिरोली : कोरची - कुरखेडा राष्ट्रीय महामार्गावर बेडगाव घाटात बुधवारी (५ ऑगस्ट २०२६) सकाळी साडेअकराच्या सुमारास