नक्षलग्रस्त भागात सागवान तस्करांचा धुमाकूळ; वनमंत्र्यांकडून सखोल चौकशीचे आदेश

मुंबई : नक्षलग्रस्त भागातील मौल्यवान सागवान लाकडाची तस्करी करणार्‍या संघटित टोळ्यांना राजकीय पाठबळ मिळत आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी विधानसभेत केला. त्यावर वनमंत्री गणेश नाईक यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले.


चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी मतदारसंघात तस्करांना पकडणार्‍या वनविभागाच्या प्रामाणिक अधिकार्‍यांना एका स्थानिक नेत्याकडून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली जाते आणि तस्करांना सोडवण्यासाठी दबाव टाकला जातो, असा आरोप वडेट्टीवार यांनी प्रश्नोत्तराच्या तासात केला. याला उत्तर देतांना वनमंत्री गणेश नाईक म्हणाले की, ज्या अधिकार्‍यांनी राजकीय दबावाखाली येऊन तस्करांना सोडून दिले, त्यांची सखोल चौकशी करून त्यांना कठोर शासन केले जाईल.


या घटनेतील परिसरातील ‘सीसीटीव्ही’ फुटेज आणि संशयितांचे ‘सीडीआर’ पडताळून या संपूर्ण रॅकेटचा शोध घेतला जाईल. जर या तस्करीमागे एखादी टोळी किंवा गुंडांच्या फौजा असतील, तर त्यांचा कायमचा बंदोबस्त करून हे रॅकेट पूर्णपणे उद्ध्वस्त केले जाईल, असेही वनमंत्र्यांनी सांगितले.


 
Comments
Add Comment

चित्र साकारताना कल्पनाशक्तीची ज्योत सतत तेवत ठेवा; शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांचा संदेश

मुंबई: चित्रकला म्हणजे मनातील विचारांना कागदावर उतरविण्याचे साधन असते. यात निसर्गातील विविध रंगांसह आपल्या

मुंबई महापालिका रुग्णालयांमधील मिळणार खाटांची माहिती; डॅशबोर्डची सेवा उपलब्ध करून देणार

मुंबई: नागरिकांना महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपलब्ध रुग्णशया व अतिदक्षता विभागातील रुग्णाशय्या इत्यादी

घाटकोपरवासियांचा १० एप्रिल २०२६ पासून पाणीपुरवठा पूर्ववत; पुढील काही दिवस उकळून प्यावे लागणार पाणी

मुंबई: घाटकोपर (पश्चिम) येथील घाटकोपर निम्नस्तरीय जलाशयातील दोन कप्प्याच्या दुरुस्तीचे काम महानगरपालिकेच्या

MLA Amit Satam सीसी रस्त्यांमुळे खड्डे दुरुस्तीवरील खर्चात जवळपास ७० टक्क्याहून अधिक घट — भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम

आमदार अमीत साटम यांनी घेतला सीसी रस्त्यांच्या कामांचा आढावा मुंबई : भाजप-नेतृत्वाखालील महायुती सरकारकडून

Matunga Fire : माटुंगा वर्कशॉपमध्ये ट्रेनच्या डब्यांना भीषण आग; धुरामुळे परिसरात भीतीचे वातावरण

मुंबई : मुंबईतील माटुंगा रेल्वे वर्कशॉप येथे आज म्हणजेच मंगळवार ७ एप्रिल रोजी दुपारी उभ्या असलेल्या ट्रेनच्या

रंगांमधून उमलणारी स्वप्नं : जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये

दिव्यांग कलाकारांसाठी ‘विविधतेचा उत्सव’ मुंबई : कॅनव्हासवर रंग उमटत होते, पण ते केवळ चित्र