महाविद्यालयांमध्ये तब्ब्ल ५०१२ प्राध्यापकांची भरती; उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांची मोठी घोषणा!

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण विभागातर्फे मोठी घोषणा करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला प्राध्यापक भरतीचा मार्ग आता मोकळा झाला असून, अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५०१२ सहाय्यक प्राध्यापकांची (Assistant Professor) पदे भरली जाणार आहेत. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत या मेगाभरतीला राज्य सरकारने मंजुरी दिल्याची अधिकृत माहिती दिली. या निर्णयामुळे राज्यातील हजारो पात्र उमेदवारांना मोठा दिलासा मिळणार आहे.


उच्च शिक्षण क्षेत्रात तब्बल ५०१२ पदं भरणार


राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्राचा दर्जा उंचावण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. २०२६-२७ च्या अर्थसंकल्पीय चर्चेदरम्यान उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोठी घोषणा केली. राज्याची आर्थिक स्थिती पाहता सध्या नवीन अनुदानित महाविद्यालयांना परवानगी देणे शक्य नसले, तरी विद्यमान महाविद्यालयांमधील रिक्त पदे प्राधान्याने भरली जाणार आहेत. यानुसार, राज्यातील सुमारे १२०० अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५४०० प्राध्यापक आणि विविध विद्यापीठांमध्ये ७०० प्राध्यापक अशा एकूण ६१०० पेक्षा जास्त पदांची भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.


राज्याचे अनुदान धोरण आणि विद्यार्थ्यांसाठी भरघोस शुल्क सवलती


राज्यातील महाविद्यालयीन अनुदानाबाबत बोलताना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी सांगितले की, २००१ पासून नवीन महाविद्यालयांना 'विना-अनुदानित' तत्त्वावर परवानगी देण्याचे धोरण राज्यात लागू आहे. जरी ही महाविद्यालये विना-अनुदानित असली, तरी सरकार विविध प्रवर्गांतील विद्यार्थ्यांच्या शुल्काचा भार स्वतः उचलते, ज्यामुळे शैक्षणिक संस्थांवरील आर्थिक ताण कमी होण्यास मदत होते. याअंतर्गत अनुसूचित जाती-जमातीच्या (SC/ST) विद्यार्थ्यांना १००% शुल्क माफी, तर ओबीसी (OBC) विद्यार्थ्यांना ५०% शुल्क सवलत दिली जाते. विशेष म्हणजे, मुलींना पूर्ण शिक्षण मोफत मिळावे यासाठी त्यांना १००% शुल्क सवलत लागू करण्यात आली आहे. दरम्यान, २००१ पूर्वी स्थापन झालेल्या ७८ महाविद्यालयांना अनुदान देण्याबाबतचा प्रस्ताव सध्या वित्त विभागाकडे पाठवण्यात आला असून, त्यावर अद्याप अंतिम निर्णय होणे बाकी आहे.


NEP अंमलबजावणी आणि प्राध्यापक भरतीचा मेगा प्लॅन


राज्यात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची (NEP) प्रभावी अंमलबजावणी आणि प्राध्यापक भरतीबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत महत्त्वाची माहिती दिली. २०२२ पासून महाराष्ट्रात NEP लागू करण्यासाठी वेगाने पावले उचलली जात असून, विद्यार्थ्यांमध्ये या धोरणाबद्दल जनजागृती करण्यासाठी जाहिरातींवर खर्च करणे आवश्यक होते, असे त्यांनी स्पष्ट केले. याचवेळी राज्यातील उमेदवारांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे, अनुदानित महाविद्यालयांमधील रिक्त असलेल्या एकूण ११,९१८ सहाय्यक प्राध्यापक पदांपैकी ५,०१२ पदांच्या भरतीला सरकारने अधिकृत मंजुरी दिली आहे. यामुळे राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रातील रिक्त जागांचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असून पात्र उमेदवारांसाठी रोजगाराची मोठी संधी निर्माण झाली आहे.

Comments
Add Comment

चित्र साकारताना कल्पनाशक्तीची ज्योत सतत तेवत ठेवा; शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांचा संदेश

मुंबई: चित्रकला म्हणजे मनातील विचारांना कागदावर उतरविण्याचे साधन असते. यात निसर्गातील विविध रंगांसह आपल्या

मुंबई महापालिका रुग्णालयांमधील मिळणार खाटांची माहिती; डॅशबोर्डची सेवा उपलब्ध करून देणार

मुंबई: नागरिकांना महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपलब्ध रुग्णशया व अतिदक्षता विभागातील रुग्णाशय्या इत्यादी

घाटकोपरवासियांचा १० एप्रिल २०२६ पासून पाणीपुरवठा पूर्ववत; पुढील काही दिवस उकळून प्यावे लागणार पाणी

मुंबई: घाटकोपर (पश्चिम) येथील घाटकोपर निम्नस्तरीय जलाशयातील दोन कप्प्याच्या दुरुस्तीचे काम महानगरपालिकेच्या

MLA Amit Satam सीसी रस्त्यांमुळे खड्डे दुरुस्तीवरील खर्चात जवळपास ७० टक्क्याहून अधिक घट — भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम

आमदार अमीत साटम यांनी घेतला सीसी रस्त्यांच्या कामांचा आढावा मुंबई : भाजप-नेतृत्वाखालील महायुती सरकारकडून

Matunga Fire : माटुंगा वर्कशॉपमध्ये ट्रेनच्या डब्यांना भीषण आग; धुरामुळे परिसरात भीतीचे वातावरण

मुंबई : मुंबईतील माटुंगा रेल्वे वर्कशॉप येथे आज म्हणजेच मंगळवार ७ एप्रिल रोजी दुपारी उभ्या असलेल्या ट्रेनच्या

रंगांमधून उमलणारी स्वप्नं : जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये

दिव्यांग कलाकारांसाठी ‘विविधतेचा उत्सव’ मुंबई : कॅनव्हासवर रंग उमटत होते, पण ते केवळ चित्र