‘अलबत्या गलबत्या’ टीमच्या गाडीचा अपघात; दोन जखमी

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात मंगळवारी सकाळी ‘अलबत्या गलबत्या’ नाट्यसंघाच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात गाडीत असलेल्या दोघांना दुखापत झाली असून त्यांच्यावर कळंबनी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बसमधील इतर सर्व जण सुरक्षित आहेत.


‘अलबत्या गलबत्या’ नाटकाचा गोव्यातील प्रयोग आटपून संपूर्ण टीम मुंबईच्या दिशेने परतत होती. यावेळी भोस्ते घाट उतरत असताना त्यांच्या बसने समोर चाललेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. प्राथमिक माहितीनुसार, घाट उतरताना अचानक बसच्या ब्रेकमध्ये बिघाड झाल्याने हा अपघात घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे.


अपघातात नाटकाचे साउंड आर्टिस्ट विलास दाते आणि बस चालक प्रकाश आव्हाड हे जखमी झाले आहेत. विलास दाते यांच्या डोक्याला मार लागून त्यांना तीन टाके घालावे लागले आहेत. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य हाती घेत जखमींना रिक्षामधून कळंबनी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

Comments
Add Comment

Nashik : 'मिशन ग्रीन मान्सून' चा रविवारी ८ वा टप्पा, ऑनलाइन नोंदणी केलेल्या नाशिककरांना होणार थेट देशी रोपांचे वाटप

Nashik : मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून आणि 'उन्नत नाशिक अभियान' अंतर्गत नाशिक शहर हरित व समृद्ध बनवण्यासाठी

Nashik : नाशिक महापालिकेत महापौर हिमगौरी आडकेंच्या हस्ते ध्वजारोहण

Nashik : भारताच्या 80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त नाशिक महानगरपालिकेच्या (Nashik NMC) राजीव गांधी भवन येथे महापौर हिमगौरी

FDA Raid : ब्लिंकिट, झेप्टो, इन्स्टामार्ट 'एफडीए'च्या रडारवर

- १४ आस्थापनांचे परवाने निलंबित; 'फिल्म सिटी'तील बॉलीवूड कॅफेलाही दंड मुंबई : झेप्टो, ब्लिंकिट आणि स्विगी

Nashik : नाशिकमध्ये वीर सैनिकांच्या स्मृतीसाठी ‘वीर प्रेरणास्थळ’ उभारणार, वीरनारी यांचा मंत्री महाजन यांच्या हस्ते धनादेश देऊन सन्मान

Nashik : देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी भारतीय सशस्त्र सेनेतील नाशिक

Nashik : मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते अनुकंपाधारकांना नियुक्तीपत्र प्रदान

Nashik : जिल्ह्यातील ३९ अनुकंपा धारकांना आज स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमानंतर येथील

Dwidha Movie : 'द्विधा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाची हृदयस्पर्शी झलक

मुंबई : मानवी नात्यांतील भावनिक गुंतागुंत, प्रेम, कर्तव्य आणि त्याग यांचा संवेदनशील वेध घेणाऱ्या ‘द्विधा’ या