दिल्लीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या खासदारांची बैठक

नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या खासदारांची एक महत्त्वपूर्ण बैठक दिल्लीत पार पडली. ही बैठक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी घेण्यात आली. यात अधिवेशनातील विविध कामकाज आणि पक्षाच्या भूमिकेवर सविस्तर चर्चा झाली.



शिवसेनेच्या खासदारांनी अर्थसंकल्पीय चर्चेत पक्षाची भूमिका कशी मांडायची यावर विचारविनिमय केला. विशेषतः, सध्या सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे देशासमोर येणाऱ्या संभाव्य अडचणींवर चर्चा झाली. यात आर्थिक प्रभाव, पुरवठा साखळीतील व्यत्यय आणि इतर आव्हानांवर केंद्र सरकारच्या माध्यमातून काढण्यात येणाऱ्या उपाययोजनांवर सखोल विचारमंथन झाले.


एकनाथ शिंदे यांनी बैठकीत पक्षाच्या खासदारांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, “अर्थसंकल्पीय अधिवेशन हे देशाच्या विकासासाठी महत्त्वाचे आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या धोरणांना पाठिंबा देताना शिवसेनेची भूमिका जनतेच्या हिताचीच राहील.”


विरोधी पक्षाकडून विविध मुद्दे उपस्थित केले जात आहेत. केंद्र सरकारच्या विरोधात फेक नॅरेटिव्ह उभे केले जात आहे. शिवसेना एनडीएचा महत्त्वाचा घटकपक्ष असून, विरोधकांच्या खोट्या प्रचाराचा पर्दाफाश करण्यासाठी शिवसेना आक्रमक आणि रचनात्मक भूमिका घेणार असल्याचे या बैठकीतून स्पष्ट झाले आहे.

Comments
Add Comment

Cbse Starts Digital Answer Sheet : उत्तरपत्रिका तपासणीत AI ची दणक्यात एंट्री! आता तुमची उत्तरं 'मशीन' वाचणार; CBSE चा नवा बदल वाचा

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) यंदाच्या १२वीच्या परीक्षांच्या मूल्यांकन प्रक्रियेत एक

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुची चेन्नई सुपर किंग्सवर 43 धावांनी मात

बंगळूरु : रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (आरसीबी) संघाने चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) संघाचा ४३ धावांनी पराभव केला. आयपीएल

Middle East War : मध्यपूर्व युद्ध पुन्हा पेटलं! इराणचा भारताला संपर्क, उच्चस्तरीय चर्चा सुरु

मुंबई : इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष शांत होण्याचे नाव घेत नाहीये. मध्य पूर्वेत सुरू असलेल्या संघर्षामुळे

Baramati By Election : सुनेत्रा ताईंचा फोन आला अन्...बारामती पोटनिवडणुकीबाबत लक्ष्मण हाकेंचा मोठा निर्णय

बारामती : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरणार की नाही, याबाबत गेल्या काही दिवसांपासून सुरू

Iran Israel War, Tehran : तेहरानजवळील निवासी इमारतीवर बॉम्ब हल्ला, १३ जणांचा मृत्यू

तेहरान : सोमवारी पहाटे इराणची राजधानी तेहरानच्या दक्षिण-पश्चिम भागातील इस्लामशहरजवळ एका निवासी इमारतीवर

Akola Crime News : अकोल्यात ‘धुरंधर’ (Dhurandhar 2 ) स्टाईल गुंडगिरी; एकेमकांवर सपासप वार; पोलिसांनी काढली धिंड

अकोला ( Akola Crime News ) : अकोला शहरातील कौलखेड परिसरात ‘धुरंधर’ ( Dhurandhar 2 ) चित्रपट बघून गुंडगिरी करणाऱ्या पाच तरुणांना