आता X वर २८० कॅरेक्टरपलीकडे लिहता येणार; X च नवीन फीचर लाँच

- X वर मिळणार लांबलचक पोस्ट लिहिण्याची संधी


सॅन फ्रान्सिस्को : मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म X (Twitter) ने आता वापरकर्त्यांना २८० कॅरेक्टरच्या मर्यादेपलीकडे जाऊन सविस्तर लेख लिहिण्याची संधी दिली आहे. कंपनीने “Articles” नावाचे नवे फीचर सुरू केले असून यामुळे वापरकर्ते थेट प्लॅटफॉर्मवर लांब स्वरूपातील (Long-form) कंटेंट लिहू व शेअर करता येणार आहेत.


या नव्या फीचरची घोषणा एलॉन मस्क (Elon Musk) यांनी त्यांच्या X अकाउंटवरून केली. त्यांनी म्हटले की, “आज आम्ही Articles नावाचा नवीन पर्याय सादर करत आहोत. याच्या मदतीने वापरकर्ते त्यांच्या फॉलोअर्ससोबत लांबलचक कंटेंट लिहू आणि शेअर करू शकतात.”



कसे काम करणार ‘Articles’ फीचर?


वेब व्हर्जनवर साइडबारमधील Articles पर्याय निवडून वापरकर्ते Article composer उघडू शकतात. येथे कंटेंट लिहिताना विविध फॉरमॅटिंग पर्याय उपलब्ध असतील. यात bold, italic, strikethrough टेक्स्ट, तसेच bullet points आणि numbered lists वापरण्याची सुविधा मिळणार आहे.


याशिवाय लेख अधिक आकर्षक बनवण्यासाठी फोटो आणि व्हिडिओही एम्बेड करता येणार आहेत. त्यामुळे कथा, विश्लेषण किंवा रिपोर्ट अधिक प्रभावीपणे मांडता येईल.



२८० कॅरेक्टरची मर्यादा संपली?


आजवर X वर पोस्ट करण्यासाठी 280 कॅरेक्टरची मर्यादा होती. मात्र Articles फीचरमुळे सविस्तर विश्लेषण, चालू घडामोडींवरील लेख, किंवा सर्जनशील कथा लिहिणे आता शक्य होणार आहे.



मात्र सर्वांसाठी नाही :


सध्या हे फीचर सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध नाही. केवळ Premium+ सब्स्क्राइबर्स आणि व्हेरिफाइड संस्थांना Articles प्रकाशित करण्याची परवानगी देण्यात आली आहे.



X वर Article कसा लिहाल?


X Premium+ सब्स्क्रिप्शन घ्या किंवा व्हेरिफाइड संस्था बना


x.com वर Articles टॅब उघडा


Write वर क्लिक करून लेख लिहा


Publish करून लेख फॉलोअर्ससोबत शेअर करा

Comments
Add Comment

US Iran War : अमेरिका-इराण संघर्ष पेटला: अमेरिकेचा जोरदार हवाई हल्ला, तर इराणचे अमेरिकन तळांवर प्रतिहल्ले!

इंधनाचे दर गगनाला भिडण्याची शक्यता मध्यपूर्वेत पुन्हा एकदा युद्धाचे ढग गडद झाले आहेत. अमेरिका आणि इराण

Ukraine - Russia War : युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यांनी रशियाची सागरी वाहतूक विस्कळीत; अझोव समुद्रात तणाव वाढला

काळ्या समुद्रात रशिया आणि युक्रेनमधील सागरी संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. १४-१५ जुलैच्या रात्री युक्रेनने

Iran - America War : इराणकडे जाणारे तेलवाहू जहाज अमेरिकेने अडवले; नौदल नाकेबंदीनंतरची पहिली मोठी कारवाई

वॉशिंग्टन : अमेरिकेने गुरुवारी पहाटे (स्थानिक वेळेनुसार बुधवारी) इराणमधील एका बंदराकडे जाण्याचा प्रयत्न

PoK : पाकिस्तानी सैनिकांच्या गोळीबारात PoK मध्ये 12 नागरिकांचा मृत्यू

मुझफ्फराबाद : पाकिस्तानव्याप्त काश्मीर (POK)मध्ये सरकारविरोधी आंदोलन अधिक तीव्र झाले असून, मंगळवारी आंदोलक आणि

Iran - America War : इराणच्या तेल नेटवर्कवर अमेरिकेचा मोठा प्रहार; ५० हून अधिक व्यक्ती, कंपन्या ब्लॅकलिस्ट

वॉशिंग्टन : जागतिक भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने इराणविरोधातील आर्थिक कारवाई आणखी तीव्र केली

Russia Ukraine War : इराण-अमेरिका संघर्षाच्या छायेत रशियाचा महाविनाशक प्रहार, युक्रेनवर ३ टनांच्या FAB-३००० ग्लाईड बॉम्बचा हल्ला

रशिया : रशिया-युक्रेन युद्धाने आता अधिक भीषण आणि रक्तरंजित वळण घेतले आहे. युक्रेनकडून होणाऱ्या ड्रोन हल्ल्यांना