Mumbai: पोलिसांच्या छापेमारीत धक्कादायक प्रकार उघड; श्रीमंत पुरुषांना जाळ्यात अडकवून ...

मुंबई: सध्या बाजारात विविध प्रकारचे डेटिंग अॅप सुरू आहेत. मोठ्या संख्येने तरुण-तरुणी या डेटिंग अॅपवर सक्रिय असतात. या अॅपच्या माध्यमातून नवे नातेसंबंध जोडले जात असतात. मात्र यादरम्यान या अॅपच्या माध्यमातून श्रीमंत पुरुषांना जाळ्यात अडकवून पैसे उकळण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. मुंबईतील साकीनाका-पवई जवळील एका हॉटेलमधील मोठं रॅकेट पोलिसांनी उद्ध्वस्त केलं आहे.
.
मिळालेल्या माहितीनुसार, २५ ते ३० तरुणी दिल्लीतून मुंबईला आणण्यात आल्या होत्या. या तरुणी एका प्रसिद्ध डेटिंग अॅपच्या माध्यमातून श्रीमंत पुरुषांना जाळ्यात ओढायच्या. डेटिंग अॅपवर लाइक करुन ते चॅटिंगची सुरुवात करायच्या. चॅट केल्यानंतर या तरुणी पुरुषांना भेटायला बोलवित होत्या. घाटकोपरच्या साकीनाका येथील कॅफे क्लब कॅफेत हा सर्व प्रकार सुरू होता. धक्कादायक बाब म्हणजे कॅफेचा मालकही या रॅकेटमध्ये सक्रिय होता. तरुणाला कॅफेत आणल्यानंतर मुली त्यांना धमकी द्यायच्या. त्यांना लैंगिक अत्याचाराची तक्रार करण्याची भीती दाखवली जात होती. तर अनेकदा मुली ऑर्डर करत त्याचे अव्वाच्या सव्वा बिल व्हायचे. अनेकदा हे बिल २५ ते ५० हजारांहून अधिक होत असे.


पोलिसांनी जेव्हा कॅफेवर छापा टाकला तेव्हा एका पीडित तरुणाला खाली बसवत त्याच्यावर बाऊंसर्सकडून धाक दाखवत पैसे वसुली सुरू होती. याप्रकरणी साकीनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. याशिवाय पोलिसांनी हा कॅफे सील केला आहे. सध्या ३ मुलींना अटक करण्यात आली असून त्यांना खास या रॅकेटसाठी दिल्लीहून आणण्यात आलं होतं.

Comments
Add Comment

Metro-3 'Aqua Line' : मेट्रो-३ ‘अॅक्वा लाईन’चा प्रवाशांना मोठा दिलासा; विद्यार्थी आणि पर्यकांसाठी सवलतीच्या दरात पास मिळणार

मुंबई : मुंबईची नवी जीवनवाहिनी ठरणाऱ्या मेट्रो-३ म्हणजेच ‘अॅक्वा लाईन’ने मुंबईकर विद्यार्थी आणि पर्यटकांना एक

Reduce Plastic : तुमचा पहिला टूथब्रश आजही पृथ्वीवर कोठेतरी पडून आहे

प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी प्रत्येक घटकाला योगदान द्यावे लागेल: राज्यपाल जिष्णु देव वर्मा देशात दरवर्षी

Green Asha Indian Ship : इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जहाज ‘ग्रीन आशा’ मुंबईत दाखल

- होर्मुझ पार करत १५ हजार टन एलपीजीचा पुरवठा मुंबई : इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या ऊर्

Mumbai Local : आता बिनधास्त प्रवास करा, महिलांच्या सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा दलानं सुरू केला 'हा' नवा उपक्रम

मुंबई : लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांना आता घाबरण्याची गरज नाही कारण चर्चगेट ते डहाणू दरम्यान लोकलनं प्रवास

Smruti Mandhana And Palash muchhal : स्मृती मानधना–पलाश मुच्छल पुन्हा एकत्र? बांद्र्यातील 'त्या' व्हिडिओने चर्चांना उधाण

मुंबई : भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांच्या नात्याबाबत पुन्हा एकदा चर्चांना

Ramdas Athawale : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची भेट

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल महामहीम जिष्णू देव वर्मा यांची रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय