तळोजा-खांदेश्वर मेट्रोला मंजुरी

५ हजार ५७५ कोटींची तरतूद


तळोजा  : गेल्या १५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नवी मुंबईतील दुसऱ्या मेट्रो मार्गिकेला राज्य सरकारची मंजुरी मिळाली आहे. तळोजा ते खांदेश्वरदरम्यान उभारण्यात येणाऱ्या या मेट्रो प्रकल्पासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात सुमारे ५ हजार ५७५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सुमारे ८.१५ किमी लांबीची ही मार्गिका तळोजा, कामोठे आणि कळंबोली परिसरांना जोडणार आहे. या मार्गिकेमुळे पनवेल परिसरातील प्रवास सुलभ होण्याबरोबरच औद्योगिक क्षेत्रातील विकासालाही चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


या मार्गावर खांदेश्वर, कामोठे सेक्टर १०, कळंबोली सेक्टर २ ई, सेक्टर ७ ई, सेक्टर १३, कडाडी तसेच तळोजा एमआयडीसी परिसरातील दोन स्थानके अशी एकूण आठ स्थानके प्रस्तावित आहेत. ही मार्गिका पुढे बेलापूर–पेंढार मेट्रोशी जोडण्याचाही प्रस्ताव आहे. या प्रकल्पाचा प्रस्ताव सिडकोने २०११ मध्ये मांडला होता. त्या वेळी प्रकल्पाचा खर्च सुमारे १,६०५ कोटी रुपये अपेक्षित होता. मात्र कालांतराने खर्च वाढून तो ५,५७५ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. तळोजा एमआयडीसी परिसरात दररोज हजारो कर्मचारी प्रवास करत असल्याने मेट्रो सुरू झाल्यानंतर लोकलची गर्दी आणि वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशीही भविष्यात जोडणी करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.

Comments
Add Comment

Mumbai Goa Expressway : कोकणात विकेंड रश; मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

माणगाव : उन्हाळी सुट्ट्यांची सुरुवात आणि सलग तीन दिवसांचा विकेंड यामुळे कोकणाच्या दिशेने पर्यटकांचा ओघ प्रचंड

मुंबई-गोवा महामार्गावर बस उलटून भीषण अपघात; ३८ प्रवासी जखमी दोघांचा मृत्यू

नागोठणे : शुक्रवारी ( ३ एप्रिल ) मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एका खासगी बसचा मुंबई गोवा महामार्गावर अपघात झाला.

कोकणातील दुर्गम भागात ऊर्जेचे नवे पर्व

लघु जलविद्युत विकास योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी अलिबाग : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या

माथेरान पर्यटन स्थळावरील मूलभूत सुविधांचा बोजवारा

सुविधांची पूर्तता करण्यात प्रशासन हतबल माथेरान : पर्यटन नगरी माथेरान हे पर्यटनस्थळ म्हणून जगप्रसिद्ध असले तरी

उन्हाच्या तडाख्यात डोंगरदऱ्यातील रानमेव्याचा गारवा

करवंदे, कैरी, काजू, बोरांना वाढती मागणी खोपोली  : उन्हाळ्याचे आगमन होताच जंगलात तयार होणारा विविध प्रकारचा

विषय समित्या सभापती पदांसाठी इच्छुकांची ‘मोर्चेबांधणी’

२३ मार्चला निवडणूक अलिबाग : रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक बुधवारी अलिबाग येथे