Saturday, March 14, 2026

पश्चिम रेल्वेवर आज - उद्या 'मेजर ब्लॉक'

पश्चिम रेल्वेवर आज - उद्या 'मेजर ब्लॉक'

लोकलसह एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

मुंबई  : पश्चिम रेल्वेवर परिचालन कार्य आणि प्रभादेवी रोड ओव्हर ब्रिजच्या गर्डर डी-लॉन्चिंग कामासाठी शनिवार, रविवारच्या मध्यरात्री जम्बो आणि मेजर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कामामुळे मुंबई उपनगरीय लोकल सेवांसह अनेक मेल/एक्स्प्रेस गाड्यांवर परिणाम होणार असून, प्रवाशांनी आपले नियोजन त्यानुसार करावे, असे आवाहन पश्चिम रेल्वेने केले आहे.

लोकलसह एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

ब्लॉकची वेळ आणि ठिकाण :

१. बोरिवली ते भाईंदर (जम्बो ब्लॉक): मध्यरात्री १२.१५ ते पहाटे ३.४५ वाजेपर्यंत (अप आणि डाऊन फास्ट लाईन्स). २. प्रभादेवी स्टेशन (मेजर ब्लॉक) : मध्यरात्री १.३० ते पहाटे ६ वाजेपर्यंत (सर्व लाईन्सवर ब्लॉक).

लोकल प्रवाशांवर होणारा परिणाम :

  1. मार्ग बदल : बोरिवली-भाईंदर ब्लॉक दरम्यान सर्व जलद लोकल विरार/वसई रोड आणि बोरिवली दरम्यान धीम्या मार्गावर चालवण्यात येतील.
  2. लोकल रद्द : प्रभादेवी येथील ब्लॉकमुळे काही उपनगरीय लोकल सेवा रद्द राहतील.
  3. शॉर्ट टर्मिनेशन : काही लोकल दादर आणि वांद्रे येथूनच परत फिरवण्यात येतील.
  4. सेवा खंडित : ब्लॉकच्या कालावधीत चर्चगेट आणि प्रभादेवी दरम्यान, तसेच माटुंगा रोड आणि माहिम स्थानकांदरम्यान एकही लोकल चालवली जाणार नाही.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >