पुरावे द्या, गैरकारभार करणाऱ्या मासेमारी संस्थांवर कारवाई करू

मुंबई : "मत्स्यव्यवसाय करणाऱ्या संस्थांमध्ये गैरप्रकार होत असल्याची तक्रार असेल, तर पुरावे द्या, संबंधित संस्थांवर कारवाई केली जाईल," असे आश्वासन मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी शुक्रवारी विधानसभेत दिले. नांदेड जिल्ह्यातील मत्स्य संस्थांमधील कथित गैरव्यवहाराबाबत उपस्थित करण्यात आलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ते बोलत होते.


लोहा तालुक्यातील 'जय मल्हार', 'मल्हारी मार्तंड', 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' आणि 'राजमाता अहिल्यादेवी' या चार मत्स्य संस्थांची नोंदणी एकाच व्यक्तीने केल्याचा आणि त्यात कोणतेही क्रियाशील सभासद नसल्याचा आरोप आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी लक्षवेधीद्वारे केला होता. बनावट कागदपत्रांच्या आधारे शासनाचे लाखो रुपये उकळले जात असल्याकडे त्यांनी म्हटले होते.


या प्रकरणावर बोलताना मंत्री नितेश राणे म्हणाले की, केवळ आरोपांच्या आधारे कोणत्याही संस्थेवर थेट कारवाई करता येत नाही. आमच्याकडे पुरावे न देता एखाद्या संस्थेविरुद्ध कारवाई करण्याची अपेक्षा ठेवणेही योग्य नाही. पुरावे नसताना कोणत्या आधारावर कारवाई करायची? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० च्या कलम १२० अंतर्गत अपील करण्याची तसेच तक्रार दाखल करण्याची तरतूद आहे. सदस्यांना त्या तरतुदीचा वापर करून संस्थेविरोधात चौकशीची मागणी करता येते. त्या अनुषंगाने आवश्यक पुरावे, कागदपत्रे आणि पत्रव्यवहार शासनाकडे सादर केल्यास त्या आधारे चौकशी सुरू करता येईल, असे मंत्री राणे यांनी सांगितले.


परस्पर विरोधी भूमिका


एका बाजूला मत्स्य उत्पादन वाढले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली जाते; तर दुसऱ्या बाजूला मत्स्य उत्पादनाशी संबंधित संस्था बंद करण्याची मागणी केली जाते. या दोन भूमिका परस्परविरोधी असल्याचेही मंत्री नितेश राणे यांनी नमूद केले. त्यामुळे आमदार चिखलीकर यांनी या संस्थांच्या गैरव्यवहाराचे ठोस पुरावे असतील, तर ते शासनाला सादर करावेत. योग्य पुरावे मिळाल्यास आम्ही निश्चितपणे सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करू, असे आश्वासन मंत्री राणे यांनी दिले.

Comments
Add Comment

Ashok Kharat Case : नाशिक खरात प्रकरण: मंदिरातील देणग्या ते परदेशी दुव्यांपर्यंत SIT ची चौकशी

मुंबई : नाशिकमधील अशोक खरात प्रकरणात तपास दिवसेंदिवस अधिक व्यापक होत असून, विशेष तपास पथक (SIT) विविध अंगांनी चौकशी

रस्ते विकासाच्या कामांबाबत मनसेच्या किल्लेदारांचा स्थायी समिती अध्यक्षांना सवाल

अर्थसंकल्पावरील भाषणात घेतला समाचार मुंबई : मुंबईतील अनेक रस्त्यांच्या कामांच्या विकासाची कामे

प्रत्येक उद्यानांमध्ये बोअरवेल खोदण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

मुंबई : मुंबईमधील महानगरपालिकेच्या सर्व विद्यमान उद्यानांमध्ये व उद्यानांचा विकास करुन नव्याने तयार करण्यात

गोरेगाव संतोषनगरमध्ये दोन गटात हाणामारी,महापालिकेकडून अनधिकृत बांधकामांवर चालवला गेला 'बुलडोझर'

मुंबई : गोरेगाव पूर्व येथील संतोषनगर परिसरात रविवारी घडलेल्या हिंदू आणि मुस्लिम गटांतील हाणामारीच्या घटनेनंतर

महापालिका शाळांमधील वाचन कौशल्य पाहून आयुक्तही भारावले, मुलांच्या पाठीवर मारली कौतुकाची थाप

मुंबई: दादर येथील येथील भवानी शंकर मार्ग शाळेत महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी पूर्व प्राथमिकसह

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ८०० कोटी रुपयांच्या अंतर्गत फेरफारीसह स्थायी समितीत मंजुर

मुंबई: मुंबई महापालिकेचा सन २०२६-२७च्या अर्थसंकल्पाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. तब्बल ८०० कोटी रुपयांच्या