मुंबई असुरक्षित असल्याच्या अफवा संजय राऊत पसरवतात, नवनाथ बन यांचा हल्लाबोल

मुंबई : मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये मुंबई, महाराष्ट्र सुरक्षित आहे. संजय राऊतांना त्याची काळजी करण्याची गरज नाही. विधानभवनाबद्दल धमकी आणि ज्या कोणी अफवा पसरवण्याचे काम केले त्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल. मात्र ‘मुंबई सुरक्षित नाही’ अशा पद्धतीच्या अफवा पसरवण्याचे काम नियोजनबद्ध रीतीने राऊत यांच्यामार्फत केले जात आहे असा हल्लाबोल भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी गुरुवारी केला. जेव्हापासून केंद्रामध्ये पंतप्रधान मोदी आहेत, तेव्हापासून मुंबईकडे कोणी वाकड्या नजरेने बघू शकले नाही. तत्कालिन मविआ सरकारचे गृहमंत्री शंभर कोटींची वसुली कशी करत होते हे राऊतांनी आठवावे आणि मग इतरांवर टीका करावी असे टीकास्त्रही त्यांनी सोडले.


स्वतः सालगडी असणा-या राऊतांनी साला या शब्दावर आक्षेप घेणे म्हणजे विनोद आहे असा टोमणा बन यांनी लगावला. काँग्रेसला देशाची आणि भारतीयांची काळजी नाही. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसची कॉमेडी सर्कस सुरू असून या सर्कसमध्ये मनोरंजनासाठी विदूषक म्हणून संजय राऊतांना चाकरीला ठेवले आहे असे शरसंधान त्यांनी साधले.


इराण इस्राएल युद्धाच्या परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमके काय करतात या भानगडीत राऊतांनी पडू नये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश प्रगतीपथावर असून आखाती देशांतील युद्धाच्या स्थितीतही सुरक्षित आहे. पंतप्रधान काय करतात हे आत्ता युद्धजन्य स्थितीत दिसून आले पण हे समजण्याएवढी राऊतांची बौद्धीक कुवत नाही. जगातील भल्या भल्या देशांना युद्धाची झळ बसली असताना भारत देश आणि भारतीय निश्चिंत आणि सुरक्षित रहावेत यासाठी पंतप्रधान मोदी आणि त्यांचे मंत्रिमंडळ सातत्याने बैठका घेतात, युद्धस्थितीत भारताला कमीतकमी झळ बसावी यासाठी उपाययोजना करत आहेत. घरात बसून फेसबुक लाईव्ह करणा-यांना याचे मोल कळणार नाही असा टोला नवनाथ बन यांनी लगावला.


अफजलखान, औरंगजेबाचा उदो उदो करण्यात धन्यता मानणा-या राऊतांना, उबाठा गटाला ‘जय श्री राम’ घोषणेचे महत्व कळणार नाही अशी बोचरी टीका बन यांनी केली. ‘जय श्री राम’ चे नामस्मरण करण्यास तुम्हाला लाज वाटत असेल आम्हाला मन:शांती आणि आनंद मिळतो. ‘जय श्री राम’ चा संबंध गॅस सिलेंडर पुरवठा करण्याशी जोडून राऊतांनी वैचारिक आणि बौद्धीक पातळी किती खालावली आहे हे दाखवून दिले आहे. देशाचे संरक्षण करण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी सक्षम आहेत त्याची चिंता राऊतांनी करूच नये असेही बन यांनी खडसावले.

Comments
Add Comment

BWF world rankings : बीडब्ल्यूएफ जागतिक क्रमवारीत त्रिशा आणि गायत्रीची मोठी झेप

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या बॅडमिंटन विश्वचॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर, भारतीय महिला दुहेरी

Arun Datte : गुरुत्वाकर्षणालाही चकवणारी कला!

मूर्तिकार अरुण दत्ते या वर्षी काय नवा 'बॅलन्स' साधणार ? मुंबई : गणेशोत्सवाचे वेध सर्वत्र लागले असून यंदाच्या

Rahul Dravid : टीम इंडियाला डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी, पण मार्ग खडतर - राहुल द्रविड

नवी दिल्ली : भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे मत आहे की, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी)

Xi Jinping : ब्रिक्स परिषदेसाठी शी जिनपिंग भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता; ४०० लोकांचे शिष्टमंडळही येणार

बीजिंग : पुढील महिन्यात दिल्लीत होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी

PA's daughter : रोहित पवारांच्या PAच्या मुलीचा मृत्यू; पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक अजित दशावतारे

Donald Trump : ट्रम्प प्रशासनाकडून इराणला मदत करणाऱ्या भारतीय कंपन्यांवर निर्बंध

वॉशिंग्टन डीसी : अमेरिका आणि इराणमधील वाढत्या राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प