'टेक्नोक्राफ्ट कंपनीच्या संपावर तोडगा काढून कामगारांना त्वरित कामावर घ्या'

कामगार मंत्री आकाश फुंडकर यांचे निर्देश


मुंबई : टेक्नोक्राफ्ट इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड (धानिवली, ता. मुरबाड, जि. ठाणे) या कंपनीच्या गारमेंट विभागातील कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. कंपनी व्यवस्थापनाने संपावर तोडगा काढून निलंबित कामगारांना कामावर घ्यावे. तसेच या परिसरात औद्योगिक शांतता कायम ठेवावी, असे निर्देश कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी गुरुवारी दिले. या कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत कामगार मंत्री फुंडकर बोलत होते. बैठकीला मुरबाडचे आमदार किसन कथोरे, कामगार विभागाच्या अपर मुख्य सचिव आय. ए. कुंदन, कामगार आयुक्त एच. पी तुम्मोड, उप कामगार आयुक्त संभाजी वन्हाळकर अप्पर कामगार आयुक्त भगवान आंधळे, सहाय्यक कामगार आयुक्त अनघा क्षीरसागर, कंपनीचे संचालक सुदर्शन सराफ आदी उपस्थित होते.


टेक्नोक्राफ्ट कंपनीच्या गारमेंट विभागातील कर्मचारी १ डिसेंबर २०२५ पासून संपावर आहेत. याबाबत तोडगा काढणे आवश्यक आहे. संप करण्यामागे कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या मागण्या लक्षात घेता मागण्या पूर्ण करण्यासाठी मानवीयदृष्टीने कार्यवाही करण्याची गरज आहे. अशा परिस्थितीत कामगार व कंपनी हिताचा सुवर्णमध्य साधत कंपनी संचालक मंडळाने सकारात्मक निर्णय घ्यावेत. कायम व कंत्राटी कामगारांच्या अडचणी समजून घेत, त्यांना यशस्वीपणे सोडविण्यात यावे. निलंबित केलेल्या कामगारांना सेवेत घेतल्यानंतर कामगारांनी संप मागे घ्यावा. याबाबत करण्यात येणारे आंदोलनही स्थगित करावे, असे आवाहन यावेळी कामगार मंत्री फुंडकर यांनी केले.

Comments
Add Comment

कांदळवन क्षेत्रात अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, झेप्टोची बेकायदा गोदामे

आमदार संजय उपाध्याय यांचा गंभीर आरोप; पाहणीसाठी गेलेल्या लोकप्रतिनिधींना बाऊन्सर्सकडून दमदाटी मुंबई : मुंबईची

मानखुर्दचा SMS एन्व्होक्लीनचा भस्मीकरण प्रकल्प २१ महिन्यांत हलविणार

मुंबई : मानखुर्द व शिवाजीनगर भागातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेऊन मानखुर्द शिवाजी विधानसभा क्षेत्रातील

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी कॅनडाचे तंत्रज्ञान महाराष्ट्रात वापरणार

मुंबई : महाराष्ट्रातील शेतीला आधुनिकतेची जोड देण्यासाठी राज्य सरकारने आता जागतिक स्तरावर पावले उचलली आहेत. कृषी

भूमि अभिलेख विभागाचा सुधारित आकृतीबंध मंजूर, नव्या ९९४ पदांची भर पडणार

मुंबई : जमिनीच्या कायदेशीर नोंदी वेगवान होऊन जनतेला दिलासा देण्यासाठी राज्याच्या भूमिअभिलेख विभागाचा

अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांवर सरकारचा बडगा

३१ मार्चपर्यंत दंडवसुलीचे आदेश; सुनावणीनंतर १५ दिवसांच्या आत वसुलीची प्रक्रिया मुंबई : राज्यातील अवैध गौण खनिज

रस्ते बांधण्याचे काम ९० टक्के भूसंपादन झाल्यानंतरच सुरू होणार

मुंबई : भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होऊन ९० टक्के जमीन प्रत्यक्ष ताब्यात आल्याशिवाय रस्त्याच्या कामाला सुरूवात