रस्ते बांधण्याचे काम ९० टक्के भूसंपादन झाल्यानंतरच सुरू होणार

मुंबई : भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होऊन ९० टक्के जमीन प्रत्यक्ष ताब्यात आल्याशिवाय रस्त्याच्या कामाला सुरूवात करू नये, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आल्याची माहिती मंत्री शिवेंद्रराजे यांनी गुरुवारी विधानसभेत दिली


बीड, शिरूर, कासार तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१च्या रखडलेल्या कामाबाबत संदीप क्षीरसागर आणि मोनिका राजळे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेच्या उत्तरावेळी मंत्री शिवेंद्रराजे बोलत होते. अनेक वेळा भूसंपादन आणि वनजमिनीच्या अडचणींमुळे प्रकल्पांना विलंब होतो. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मान्यतेने विभागाकडून एक महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. यानुसार, आतापासून ९० टक्के भू-संपादन पूर्ण होऊन संबंधित जमीन प्रत्यक्ष ताब्यात आल्याशिवाय कोणत्याही रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात येणार नाही. यापूर्वी अनेक ठिकाणी असे झाले की रस्त्याचे काम सुरू झाले, पण भू-संपादन पूर्ण न झाल्यामुळे रस्ते अर्धवट राहिले. काही ठिकाणी खराब झाले आणि त्यामुळे अपघातांचाही धोका वाढला. त्यानंतर भूसंपादनासाठी द्यावी लागणारी भरपाईची रक्कमही वाढत गेली. लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांकडून वारंवार तक्रारी येऊ लागल्या. याच कारणामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने ९० टक्के भू-संपादन पूर्ण होऊन जमीन ताब्यात आल्याशिवाय प्रकल्पाचे काम सुरू करायचे नाही अशा सूचना दिल्याचे मंत्री शिवेंद्रराजे यांनी गुरुवारी विधानसभेत सांगितले.

Comments
Add Comment

Dharavi Development Project : धारावी विकास प्रकल्पांत तब्बल ८ हजार झाडे होणार बाधित

- पालघरमध्ये २३ हजार तर धारावीतच लावली जाणार ३० हजार झाडे मुंबई (सचिन धानजी) धारावीचा विकास करण्यासाठी

Byculla Police Station Fire: भायखळा पोलीस ठाण्याच्या पहिल्या मजल्यावर आग; अग्निशमन दलाकडून तातडीने नियंत्रण

मुंबई: मुंबईतील भायखळा पोलीस ठाण्यात रविवारी रात्री आग (Fire) लागल्याची घटना घडली. ही आग पोलीस ठाण्याच्या पहिल्या

Eknath Shinde : ठाणे शहरातील सर्वात मोठ्या वाहतूक सुधारणा प्रकल्पाला प्रारंभ; तीन हात नाका वाहतूक सुधारणा प्रकल्पाचे भूमिपूजन

ठाणेकरांच्या स्वप्नपूर्तीकडे एकनाथ शिंदेंचे आणखी एक मोठे पाऊल २०० कोटींच्या महत्त्वाकांक्षी कामामुळे दीड

Ashadhi Wari : आषाढी वारीत ७.४७ लाखांहून अधिक वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा; मधुमेह, ताप, उच्च रक्तदाबासह विविध आजारांवर प्रभावी उपचार

मुंबई  : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार तसेच

Mumbai Crime News : मुंबई विमानतळ परिसरातील हॉटेलमध्ये महिलेवर लैंगिक अत्याचार; अहमदाबादच्या व्यावसायिकाला अटक

मुंबई : मुंबई शहरातील विमानतळ परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका नामांकित हॉटेलमध्ये महिलेवर

Mumbai News : मुंबईकरांना मोठा दिलासा! घाटकोपरमध्ये उभारला जाणार नवा केबल-स्टेड पूल, 2027 पर्यंत काम पूर्ण होण्याचे लक्ष्य