Navi Mumbai : पोलीस भरतीदरम्यान नवी मुंबई घडला खळबळजनक प्रकार; चार उमेदवारांनी...

नवी मुंबई: नवी मुंबईतील कळंबोली येथे पोलीस भरती दरम्यान एक धक्कादायक घटना घडली. पोलीस भरतीची प्रक्रिया सुरु असताना रविवारी उमेदवारांची शाररिक चाचणी सुरु होती. त्यावेळी चार उमेदवारांच्या हालचालीवर संशय आल्याने त्यांची झडती घेण्यात आली.यामध्ये काही उमेदवारांनी त्यांच्या अंतर्वस्त्रात इंजेक्शन लपवल्याचं पोलिसांना आढळलं. त्यानंतर पोलिसांनी त्या चार उमेदवारांवर गुन्हा दाखल केला.चाचणी वेळी उत्तेजकता वाढवण्यासाठी या इंजेक्शनचा वापर केला जाणार होता. त्यापूर्वीच पोलिसांनी या उमेदवाऱ्यांच्या बेकायदेशीर कृत्याचा पर्दाफाश केला. आकाश पानसरे, सुयोग् होले , सुनील कडुसकर व संकेत डोंगरे अशी गुन्हा दाखल झालेल्या उमेदवारांची नावं आहेत.



सहाय्यक पोलीस आयुक्त काय म्हणाले?



"महाराष्ट्रात सर्व ठिकाणी पोलीस भरती प्रक्रिया सुर आहे. त्यानुसार नवी मुंबईत सुद्धा कळंबोली हेड क्वार्टर या ठिकाणी पोलीस भरती प्रक्रिया सुरु आहे. रोज दीड ते दोन हजार उमेदवारांची शारीरिक चाचणी घेतली जाते. ९ मार्चला उमेदवारांना बोलावण्यात आलं होतं. त्याप्रमाणे हजार दीड हजार उमेदवार आले होते. त्यानंतर त्यांचं रजिस्ट्रेशन करून त्यांना प्रवेश दिलं जातं. त्यानंतर त्यांची छाती, उंचीचं मोजमाप घेतलं जातं. जे पात्र होतात त्यांना चेस्ट नंबर दिला जातो. त्यांनतर त्यांना त्यांची शारीरिक चाचणी घेतली जाते. यामध्ये रनिंग, गोळाफेक असतं.


रनिंगमध्ये १६०० आणि ८०० मीटर असतं. त्याप्रमाणे बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा मोजमाप चालू होतो.त्यामधील चार विद्यार्थी निवार हॉलमध्ये बसलेले होते. ज्यामध्ये छाती उंची मोजली जाते. त्याठिकाणी ते बसल्यावर थोड्या वेळाने उठून बाहेर निघून गेले. त्यानंतर ते बऱ्याच वेळाने आले.त्याठिकाणी गोविंद झालटे नावाचा एक शिपाई होता. त्याच्यासोबत इतर दोन अमलदार होते. त्यांना संशय आल्यावर त्यांच्या पँटमध्ये इंजेक्शन असल्याचं त्यांना आढळलं. ते इंजेक्शन त्यांच्या सोबत ठेवायचं काही कारणच नव्हतं. त्यांना विचारलं असतं ते उडवाउडवीची उत्तरे दिली. पण ते आमच्या लक्षात आलं. त्यांनी गैरप्रकार केला होता. नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे",अशी माहिती नवी मुंबईचे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रदीप लोंढे यांनी दिली आहे.

Comments
Add Comment

चित्र साकारताना कल्पनाशक्तीची ज्योत सतत तेवत ठेवा; शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांचा संदेश

मुंबई: चित्रकला म्हणजे मनातील विचारांना कागदावर उतरविण्याचे साधन असते. यात निसर्गातील विविध रंगांसह आपल्या

मुंबई महापालिका रुग्णालयांमधील मिळणार खाटांची माहिती; डॅशबोर्डची सेवा उपलब्ध करून देणार

मुंबई: नागरिकांना महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपलब्ध रुग्णशया व अतिदक्षता विभागातील रुग्णाशय्या इत्यादी

घाटकोपरवासियांचा १० एप्रिल २०२६ पासून पाणीपुरवठा पूर्ववत; पुढील काही दिवस उकळून प्यावे लागणार पाणी

मुंबई: घाटकोपर (पश्चिम) येथील घाटकोपर निम्नस्तरीय जलाशयातील दोन कप्प्याच्या दुरुस्तीचे काम महानगरपालिकेच्या

MLA Amit Satam सीसी रस्त्यांमुळे खड्डे दुरुस्तीवरील खर्चात जवळपास ७० टक्क्याहून अधिक घट — भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम

आमदार अमीत साटम यांनी घेतला सीसी रस्त्यांच्या कामांचा आढावा मुंबई : भाजप-नेतृत्वाखालील महायुती सरकारकडून

Matunga Fire : माटुंगा वर्कशॉपमध्ये ट्रेनच्या डब्यांना भीषण आग; धुरामुळे परिसरात भीतीचे वातावरण

मुंबई : मुंबईतील माटुंगा रेल्वे वर्कशॉप येथे आज म्हणजेच मंगळवार ७ एप्रिल रोजी दुपारी उभ्या असलेल्या ट्रेनच्या

रंगांमधून उमलणारी स्वप्नं : जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये

दिव्यांग कलाकारांसाठी ‘विविधतेचा उत्सव’ मुंबई : कॅनव्हासवर रंग उमटत होते, पण ते केवळ चित्र