खेड ग्रामपंचायत गैरव्यवहार प्रकरण; सरपंचांच्या खुर्चीला हादरा, विभागीय आयुक्तांकडे सुनावणी सुरू

- मंत्री जयकुमार गोरे यांची विधानपरिषदेत माहिती


मुंबई : सातारा जिल्ह्यातील खेड ग्रामपंचायतीमध्ये विकासकामांच्या नावाखाली झालेल्या मोठ्या आर्थिक अनियमिततेचे पडसाद आता थेट परिषदेत उमटले आहेत. या प्रकरणी दोषी आढळलेल्या सरपंचांविरोधात कडक कारवाईची प्रक्रिया प्रशासकीय पातळीवर सुरू करण्यात आली असून, लवकरच याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विधान परिषदेत दिली.



नेमके प्रकरण काय?


खेड ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराबाबत आमदार शशिकांत शिंदे यांनी नियम ९२ अन्वये अर्धा तास चर्चा उपस्थित केली होती. या चर्चेला उत्तर देताना मंत्री गोरे यांनी संपूर्ण चौकशीचा पाढा वाचला. २८ जानेवारी २०२३ रोजी करण्यात आलेल्या प्राथमिक तपासणीत ग्रामपंचायतीच्या कामकाजात गंभीर त्रुटी आढळून आल्या होत्या. त्यानंतर गट विकास अधिकाऱ्यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले. उपअभियंत्यांच्या समितीने ५ मे २०२३ रोजी सादर केलेल्या अहवालात धक्कादायक वास्तव समोर आले. ग्रामपंचायतीने तब्बल १२ विकासकामे करताना कोणतेही अंदाजपत्रक तयार केले नव्हते, तांत्रिक मान्यता घेतली नव्हती आणि निविदा प्रक्रियेलाही हरताळ फासल्याचे निष्पन्न झाले. या गैरव्यवहाराची व्याप्ती लक्षात घेऊन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी संबंधित ग्रामविकास अधिकाऱ्याला तातडीने निलंबित केले आहे. केवळ कर्मचाऱ्यांवर कारवाई करून न थांबता, याला जबाबदार असणाऱ्या सरपंचांवरही महाराष्ट्र ग्रामपंचायत कायद्यानुसार कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. सरपंचांना पदावरून हटवण्याबाबतचा प्रस्ताव आता विभागीय आयुक्तांकडे पाठवण्यात आला असून, या प्रकरणाची पहिली सुनावणी पार पडली आहे.


या प्रकरणात फेरचौकशीचे आदेश देण्यात आले होते, ज्यामध्ये अनियमिततेवर शिक्कामोर्तब झाले आहे. "विभागीय आयुक्तांनी या प्रकरणाचा निकाल एका निश्चित मुदतीत लावावा, अशा स्पष्ट सूचना शासन स्तरावरून देण्यात येतील," असे आश्वासन मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले. यामुळे खेड ग्रामपंचायतीच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, भ्रष्टाचाराला पाठीशी घालणाऱ्या संबंधितांवर कठोर कारवाई होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Comments
Add Comment

पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या ब्रिटीशकालिन पर्जन्य जलवाहिन्यांचे ५० वर्षांनी वाढणार आयुष्य

मुंबई: मुंबई महानगरपालिकेकडून मुंबई शहर विभागातील १०० वर्षे जुन्या भूमिगत कमानी पर्जन्य जलवाहिन्यांचे

Kishori Pednekar: विरोधी पक्षात बसताच उबाठाच्या पेडणेकर आधीच पोहोचल्या नाल्याच्या काठावर

मुंबई: मुंबई महापालिकेत मागील २५ वर्षांत सत्तेवर असताना मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नाही तर जुनच्या

प्रकल्पबाधितांच्या सदनिका वाटपाची प्रक्रिया सुलभ करा; महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी दिले मालमत्ता विभागाला निर्देश

मुंबई: मुंबईतील सदनिकांची वाढती मागणी लक्षात घेता, प्रकल्पबाधित व्यक्तींसाठी (पी ए पी) सदनिका उपलब्ध करून

Ashwini Bhide: गारगाईसह समुद्राचे पाणी गोडे करण्याच्या प्रकल्पाला गती द्या; महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांचे जलखात्याला आदेश

मुंबई: समुद्राचे पाणी गोडे करण्यासाठी महानगरपालिकेने हाती घेतलेल्या २०० दशलक्ष लीटर प्रतिदिन क्षमतेच्या ४००

पश्चिम आशियातले युद्ध आणखी पेटणार, अमेरिकेचे दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडल्याचा इराणचा दावा

अमेरिकेच्या हल्ल्यात इराणमधील सर्वात मोठा उंच पूल नष्ट; ८ मृत्यू, ९५ जखमी तेहरान  - आखाती देशात अमेरिका इस्रायल

मध्य रेल्वेचा शनिवार, रविवार मेगा ब्लॉक; उपनगरीय व मेल-एक्स्प्रेस सेवांवर मोठा परिणाम

मुंबई : मध्य रेल्वेतर्फे ४ एप्रिल २०२६ रोजी ठाणे व डोंबिवली स्थानकांवरील प्लॅटफॉर्म विस्तार तसेच परळ आणि करी रोड