प्रकल्पबाधितांच्या सदनिका वाटपाची प्रक्रिया सुलभ करा; महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी दिले मालमत्ता विभागाला निर्देश

मुंबई: मुंबईतील सदनिकांची वाढती मागणी लक्षात घेता, प्रकल्पबाधित व्यक्तींसाठी (पी ए पी) सदनिका उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देण्यात यावा. प्रकल्पबाधितांच्या सदनिका वाटपाची प्रक्रिया अधिक सुलभ, कार्यक्षम आणि पात्र लाभार्थ्यांसाठी सुटसुटीत करण्याचे निर्देश मुंबई महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी संबंधित खात्याच्या आढावा बैठकीत दिले.


मुंबई महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी शुक्रवारी ३ एप्रिल २०२६ रोजी विविध विभागांचा आढावा घेतला. यामध्ये मालमत्ता व वित्त विभागांची सविस्तर माहिती त्यांनी जाणून घेतली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, सह आयुक्त (सुधार) संजोग कबरे, उप आयुक्त (आयुक्त कार्यालय) प्रशांत गायकवाड, सहायक आयुक्त (मालमत्ता) पृथ्वीराज चव्हाण, प्रमुख लेखापाल (वित्त) अरूण जाधव यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.



भाडेतत्वावरील मालमत्तांच्या पुनर्विकासाला गती


भाडेतत्वांवरील (लिज प्लॉट) मालमत्तांबाबत महानगरपालिकेची प्रचलित धोरणे आणि आगामी प्रस्तावांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. यामध्ये कायदेशीर अडथळे दूर करणे आणि पुनर्विकास प्रक्रिया सुलभ करण्यावर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करण्यात आले. भाडेपट्ट्यावरील भूखंडांबाबत माननीय उच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा तातडीने पाठपुरावा करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्तांनी दिले.


महानगरपालिकेच्या भाडेतत्वांवरील मालमत्तांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी एकात्मिक दृष्टिकोन स्वीकारण्याचे निर्देश त्यांनी दिले. मुंबईतील सदनिकांची वाढती मागणी लक्षात घेता, प्रकल्पबाधित व्यक्तींसाठी (पी ए पी) सदनिका उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देण्यात आला. प्रकल्पबाधितांच्या सदनिका वाटपाची प्रक्रिया अधिक सुलभ, कार्यक्षम आणि पात्र लाभार्थ्यांसाठी सुटसुटीत करण्याचे निर्देश देण्यात आले.


मुंबईची झपाट्याने होणारी वाढ लक्षात घेता, गृहनिर्माण आणि जमिनीचा सुयोग्य वापर यांसारख्या दीर्घकालीन समस्या सोडवण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या 'नागरी पुनरुज्जीवन' उपक्रमाचा हा एक भाग आहे.


याचबरोबर वित्त विभागाचा आढावा घेताना महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पीय अंदाजाचा तसेच महानगरपालिकेचे उत्पन्न आणि खर्चाचा, सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांच्या दायित्वांचा आढावा घेतला. महानगरपालिकेच्या ठेवी आणि वित्त परिस्थिती याबाबत सविस्तर चर्चा केली.

Comments
Add Comment

Holiday : मुंबईत दहीहंडी ऐवजी रक्षाबंधनला मिळणार शासकीय सुट्टी

मुंबई : यंदा मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात दहीहंडी ऐवजी रक्षाबंधनच्या दिवशी शासकीय सुट्टी मिळणार आहे. या

National Highway : राष्ट्रीय महामार्गालगत नवीन ढाबे, हॉटेल्स आणि व्यावसायिक बांधकामांना बंदी

राज्य सरकारचा निर्णय; अनधिकृत बांधकामे ६० दिवसांच्या आत पाडण्याचे निर्देश मुंबई : राष्ट्रीय महामार्गांवर

Mumbai Cyber Security : मुंबईची सायबर सुरक्षितता राष्ट्रीय आर्थिक सुरक्षेची प्राथमिकता; भारत-इस्रायल सहकार्य वाढवण्याचे आवाहन

मुंबई: मुंबईची सायबर सुरक्षितता ही केवळ माहिती तंत्रज्ञानापुरती मर्यादित बाब नसून देशाच्या आर्थिक सुरक्षेची

Charging Stations : ई-वाहनांसाठी चार्जिंग स्टेशनचे जाळे विस्तारते; आरटीओ, एसटी आणि बेस्टचा पुढाकार

मुंबई : राज्यात ई-वाहनांची संख्या सातत्याने वाढत असताना त्यांना आवश्यक असलेल्या चार्जिंग पायाभूत सुविधांच्या

Devendra Fadnavis : 'एफसीआरए' विधेयकामुळे अमेरिकेतील काहींना मिरची का लागली?

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; हे विधेयक कोणत्याही धर्माच्या किंवा समुदायाच्या विरोधात नाही मुंबई : केंद्र

BMC News : एच पूर्व विभागात पदपथ अतिक्रमण मुक्त मोहीम जोरात; नेहरू रोडवरील अतिक्रमणांवर संयुक्त कारवाई

- अनधिकृत बांधकामांसह फेरीवाल्यांचे साहित्य जागच्या जागीच केले जाते नष्ट मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : सांताक्रूझ