अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांवर सरकारचा बडगा

३१ मार्चपर्यंत दंडवसुलीचे आदेश; सुनावणीनंतर १५ दिवसांच्या आत वसुलीची प्रक्रिया


मुंबई : राज्यातील अवैध गौण खनिज उत्खनन, वाहतूक आणि साठवणूक करणाऱ्यांविरुद्ध महाराष्ट्र शासनाने आता अधिक आक्रमक पाऊल उचलले आहे. महसूल व वन विभागाने गुरुवारी एक नवीन परिपत्रक काढून, प्रलंबित दंडात्मक रकमा ३१ मार्च २०२६ पर्यंत वसूल करण्याचे निर्देश सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.


महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ च्या कलम ४८ (७) आणि ४८ (८) अंतर्गत अवैध उत्खनन आणि वाहतुकीसाठी वापरलेली यंत्रसामुग्री व वाहने जप्त करून दंड आकारण्याची तरतूद आहे. अनेक प्रकरणांत सक्षम प्राधिकाऱ्यांनी दंडाचे आदेश देऊनही, वरिष्ठ स्तरावर स्थगिती नसतानाही वसुली झाली नसल्याचे शासनाच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे आता ही विशेष मोहीम राबवली जात आहे.


ज्या प्रकरणांत दंडाचे आदेश झाले आहेत आणि विहित मुदतीत अपील केलेले नाही, अशा ठिकाणी अपिलाची मुदत संपताच १५ दिवसांच्या आत वसुली सुरू केली जाईल. वरिष्ठ प्राधिकरणाकडे अपील केले असल्यास आणि त्यांनी स्थगिती दिली नसेल, तर पहिल्या सुनावणीनंतर १५ दिवसांच्या आत वसुलीची प्रक्रिया राबवली जाईल. अपिलीय किंवा पुनरीक्षण प्राधिकाऱ्याकडे दाद मागायची असल्यास, दंडाच्या एकूण रकमेपैकी २५ टक्के रक्कम जमा केल्याशिवाय मूळ दंडात्मक आदेशाला स्थगिती दिली जाणार नाही. जर न्यायालयाने स्थगिती आदेश दिले नसतील, तर केवळ याचिका दाखल केली आहे म्हणून वसुली थांबवता येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.


जिल्हाधिकाऱ्यांनी ३१ मार्च २०२६ पर्यंत ही सर्व वसुली पूर्ण करून त्याचा अहवाल संबंधित विभागीय आयुक्तांना सादर करायचा आहे. जर संबंधित व्यक्ती दंड भरण्यास टाळाटाळ करत असेल, तर महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या प्रकरण ११ नुसार जमिनीच्या महसुली थकबाकीप्रमाणे ही रक्कम वसूल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे अवैध गौण खनिज माफियांवर वचक बसणार असून शासकीय तिजोरीत मोठ्या प्रमाणात महसूल जमा होणार आहे.

Comments
Add Comment

Metro-9 from Dahisar to Mira Bhayandar दहिसर ते मीरा भाईंदर 'मेट्रो-९'ला मुख्यमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा

ठाणे जिल्ह्यातील पहिली मेट्रो सेवा सुरू; वाहतूक कोंडीतून होणार सुटका मुंबई :

Mumbai Metro 9 Inauguration : अखेर दहिसर-काशिगाव मेट्रो लाईन ९ चे होणार उद्घाटन; जाणून घ्या स्थानके, तिकीटाची किंमत

मुंबई : तारीख पे तारीख म्हणत आज अखेर मुंबई मेट्रो ९ ( दहिसर ते काशीगाव ) या मार्गिकेचे उदघाटन संपन्न होणार आहे.

रस्ते विकासाच्या कामांबाबत मनसेच्या किल्लेदारांचा स्थायी समिती अध्यक्षांना सवाल

अर्थसंकल्पावरील भाषणात घेतला समाचार मुंबई : मुंबईतील अनेक रस्त्यांच्या कामांच्या विकासाची कामे

प्रत्येक उद्यानांमध्ये बोअरवेल खोदण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

मुंबई : मुंबईमधील महानगरपालिकेच्या सर्व विद्यमान उद्यानांमध्ये व उद्यानांचा विकास करुन नव्याने तयार करण्यात

गोरेगाव संतोषनगरमध्ये दोन गटात हाणामारी,महापालिकेकडून अनधिकृत बांधकामांवर चालवला गेला 'बुलडोझर'

मुंबई : गोरेगाव पूर्व येथील संतोषनगर परिसरात रविवारी घडलेल्या हिंदू आणि मुस्लिम गटांतील हाणामारीच्या घटनेनंतर

महापालिका शाळांमधील वाचन कौशल्य पाहून आयुक्तही भारावल्या, मुलांच्या पाठीवर मारली कौतुकाची थाप

मुंबई: दादर येथील येथील भवानी शंकर मार्ग शाळेत महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी पूर्व प्राथमिकसह