पुणेकरांसाठी मनपाचा उपक्रम; 'क्यूआर' स्कॅन करा अन विकासकामे सुचवा

पुणे :  पुणे महापालिकेच्या २०२६-२७ च्या वार्षिक अर्थसंकल्पात पुणेकरांना थेट सहभाग घेता येणार आहे. शहराच्या विकासात नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी महापालिकेने 'माझे पुणे, माझा अर्थसंकल्प’, हा उपक्रम राबविण्यात येत आहे.आपल्या भागात कोणती आवश्यक विकासकामे झाली पाहिजे याची सूचना नागरिकांना नोंदविता येणार आहेत, त्यासाठी क्युआर कोडची सुविधा उपलब्ध करून दिली आहे, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.

'नागरिकांच्या सहभागातून शहराची प्रगती' या संकल्पनेवर आधारित या उपक्रमात रस्ते, पाणीपुरवठा, वाहतूक, उद्याने आणि सार्वजनिक सुविधांबाबतच्या सूचना मागविण्यात आल्या आहेत.नागरिकांच्या गरजा आणि प्राधान्यक्रमाचे प्रतिबिंब महापालिकेच्या अर्थसंकल्पात उमटावे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. महापालिकेच्या संकेतस्थळासह समाजमाध्यमांवर क्यूआर कोड उपलब्ध आहे. हा क्युरआर कोड स्कॅन करून नागरिकांना सूचना नोंदविता येतील. नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन भिमाले यांनी केले आहे.

Comments
Add Comment

Jalgaon : स्मार्ट मीटरनंतरही वीज चोरी ? जळगावात महावितरणकडून दोघांविरोधात गुन्हे दाखल

Jalgaon : स्मार्ट मीटरमुळे थकबाकीपोटी वीजपुरवठा आपोआप खंडित होत असतानाही अनधिकृतपणे वीज जोडणी करून वीज वापर

Jalgaon : रेल्वे प्रवाशांना लुबाडणाऱ्या विक्रेत्यांना दणका ! भुसावळ विभागाची मोठी कारवाई

Jalgaon : रेल्वे स्थानकांवर (Railway Station) प्रवाशांकडून पाण्याच्या बाटल्या, खाद्यपदार्थ आणि पेयांसाठी निर्धारित दरापेक्षा

Sangli School Van Accident : धक्कादायक! स्कूल व्हॅनचा भीषण अपघात; पाच वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू

सांगली : सांगलीतील शिराळा तालुक्यातून आटूगडेवाडी येथे स्कूल व्हॅनचा भीषण अपघात होऊन पाच वर्षीय मुलीचा जागीच

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्राला ‘इनोव्हेशन हब’ बनविण्यासाठी युवा कल्पनांना व्यासपीठ देण्यात येणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

· ‘द गव्हर्नन्स चॅलेंज २०२६’चे चौथे पर्व घोषित · ३० नामांकित व्यवस्थापन व सार्वजनिक धोरण संस्थांमधील

Maharashtra News : राज्यातील प्रत्येक विभागात भव्य लोककला महोत्सव; आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई : महाराष्ट्रातील लोककला आणि लोककलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी आता राज्याच्या प्रत्येक विभागात भव्य

ST Employees Salary : एसटीच्या 86 हजार कर्मचाऱ्यांना दिलासा; 11 ऑगस्टला खात्यात जमा होणार जुलैचे वेतन

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुमारे 86 हजार कर्मचाऱ्यांचे जुलै महिन्याचे वेतन 11 ऑगस्ट रोजी