Mumbai: भांडुप रेल्वे स्टेशनच्या परिसरात इमारतीचा भाग कोसळला

मुंबई: मुंबईतील भांडुप रेल्वे स्टेशनच्या परिसरात एका इमारतीचा भाग कोसळला आहे. अत्यंत रहदारीचा असलेल्या या परिसरात इमारतीचा भाग कोसळल्यामुळे खळबळ उडाली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीविताहानी झाली नाही. मात्र, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, भांडुप रेल्वे स्टेशन परिसर हा नेहमी गर्दीने गजबजलेला असतो. या भागामध्ये स्टेशनला लागून असलेल्या प्लाझा इमारतीचा भाग कोसळला. अचानक इमारतीचा भाग कोसळ्यामुळे मोठा आवाज झाला. मोठा आवाज झाल्यामुळे एकच खळबळ उडाली.


भांडुप पश्चिम येथील स्टेशनजवळ झालेल्या या घटनेमुळे परिसरात एकच धावपळ उडाली. इमारतीचा स्लॅब कोसळला असल्याचं निदर्शनास आलं आहे. इमारतीखाली उभी असलेली वाहनं ढिगाराखाली सापडली. सुदैवाने दुपारची वेळ असल्याने या ठिकाणी गर्दी कमी होती. त्यामुळे या दुर्घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही.


घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळीवर स्लॅबचा ढिगार बाजूला करण्याचं काम सुरू आहे. नेमकं दुपारीची वेळ होती. संध्याकाळी या भागामध्ये चाकरमान्यांची घराकडे जाण्यासाठी मोठी गर्दी असते. त्यामुळे ऐन गर्दीच्या आधी ही घटना घडली आहे.


प्लाझा इमारतीच्या कोसळलेला स्लॅब बाजूलाा करण्याचं काम सुरू आहे, मात्र स्लॅब का कोसळला, याचे कारण अद्याप समोर आले आहे. अग्निशमन दलाकडून सध्या बचावकार्य सुरू आहे.

Comments
Add Comment

चित्र साकारताना कल्पनाशक्तीची ज्योत सतत तेवत ठेवा; शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांचा संदेश

मुंबई: चित्रकला म्हणजे मनातील विचारांना कागदावर उतरविण्याचे साधन असते. यात निसर्गातील विविध रंगांसह आपल्या

मुंबई महापालिका रुग्णालयांमधील मिळणार खाटांची माहिती; डॅशबोर्डची सेवा उपलब्ध करून देणार

मुंबई: नागरिकांना महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपलब्ध रुग्णशया व अतिदक्षता विभागातील रुग्णाशय्या इत्यादी

घाटकोपरवासियांचा १० एप्रिल २०२६ पासून पाणीपुरवठा पूर्ववत; पुढील काही दिवस उकळून प्यावे लागणार पाणी

मुंबई: घाटकोपर (पश्चिम) येथील घाटकोपर निम्नस्तरीय जलाशयातील दोन कप्प्याच्या दुरुस्तीचे काम महानगरपालिकेच्या

MLA Amit Satam सीसी रस्त्यांमुळे खड्डे दुरुस्तीवरील खर्चात जवळपास ७० टक्क्याहून अधिक घट — भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम

आमदार अमीत साटम यांनी घेतला सीसी रस्त्यांच्या कामांचा आढावा मुंबई : भाजप-नेतृत्वाखालील महायुती सरकारकडून

Matunga Fire : माटुंगा वर्कशॉपमध्ये ट्रेनच्या डब्यांना भीषण आग; धुरामुळे परिसरात भीतीचे वातावरण

मुंबई : मुंबईतील माटुंगा रेल्वे वर्कशॉप येथे आज म्हणजेच मंगळवार ७ एप्रिल रोजी दुपारी उभ्या असलेल्या ट्रेनच्या

रंगांमधून उमलणारी स्वप्नं : जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये

दिव्यांग कलाकारांसाठी ‘विविधतेचा उत्सव’ मुंबई : कॅनव्हासवर रंग उमटत होते, पण ते केवळ चित्र