मुकेश अंबानींच्या रिलायन्सची अमेरिकेत ३ अब्ज डॉलरची गुंतवणूक

वॉशिंग्टन डीसी : मुकेश अंबानींच्या रिलायन्स समुहाने अमेरिकेतील टेक्सास प्रांतात ३०० बिलियन यूएसडी म्हणजेच ३ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून ही माहिती दिली. टेक्सास प्रांतात मागील ५० वर्षांत एकही नवा कारखाना सुरू झाला नव्हता. रिलायन्सच्या रिफायनरीच्या (तेल शुद्धीकरण प्रकल्प) स्वरुपात टेक्सास प्रांतात प्रदीर्घ काळानंतर कारखाना सुरू होत आहे. ब्राउन्सव्हिले बंदराजवळ रिलायन्सची रिफायनरी सुरू होणार आहे.


वाढत्या प्रदूषणामुळे मागील ५० वर्ष टेक्सास प्रांतात नव्या कारखान्यांना मंजुरी दिली जात नव्हती. अखेर आता इराण विरुद्ध युद्ध सुरू असताना टेक्सासमध्ये रिलायन्सच्या रिफायनरीच्या स्वरुपात नव्या औद्योगिक प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. लवकरच ही रिफायनरी सुरू होईल आणि भारतीय उद्योगसमूह अमेरिकेत तेलाचे शुद्धीकरण करेल.


अमेरिका आणि इस्रायलने इराणविरोधात युद्ध पुकारल्यानंतर जगावर ऊर्जा संकट ओढवले आहे. कच्च्या तेलाचे दर वाढले असून गॅसचा पुरवठा विस्कळित झाला आहे. अशावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील टेक्सास प्रांतात रिलायन्स ३ अब्ज डॉलरची गुंतवणूक करून रिफायनरी सुरू करत असल्याचे जाहीर केले आहे. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठा रिफायनरीचा करार झाला असल्याचेही ट्रम्प यांनी जाहीर केले आहे. टेक्सास प्रांताच्या दक्षिणेकडील भागासाठी ही खूप मोठी बाब असल्याचे ट्रम्प यांनी ट्रुथ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील त्यांच्या पोस्टमध्ये नमूद केले आहे. भारतातील आमचे भागीदार आणि त्यांची सर्वात मोठी खासगी मालकी असलेल्या रिलायन्सचे आभार; असेही ट्रम्प यांनी त्यांच्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.

Comments
Add Comment

Baramati Assembly by-election : बारामती पोटनिवडणुकीत महायुती सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी

- निवडणूक बिनविरोध करण्याचे उपमुख्यमंत्री शिंदेंचे इतर सर्व पक्षांना आवाहन ठाणे : बारामती विधानसभा

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 'बुद्ध रत्न' पुरस्कार प्रदान

- युद्ध नको, बुद्ध हवा; ठाण्यात आठव्या आंतरराष्ट्रीय धम्म परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला समतेचा

Mohammed Shami : ज्याच्या निवृत्तीच्या चर्चा रंगला त्यानेच...; झहीर खानला पछाडत शमीने रचला नवा विक्रम!

आयपीएल २०२६ स्पर्धेत रविवारी (५ एप्रिल) डबल हेडर सामन्यांचा थरार रंगला असून हैदराबादच्या मैदानावर झालेल्या

मुंबई–पुणे एक्सप्रेसवे होणार १० पदरी; टोल वसुली....

२०६० पर्यंत टोल वसुली सुरूच  मुंबई : वाढत्या वाहतुकीमुळे कायम कोंडीचा सामना करणाऱ्या मुंबई–पुणे एक्सप्रेसवे वर

Nanded Crime : टोळीयुद्धाने नांदेड शहर हादरले; एकाचा थेट रुग्णालयात घुसून खून

नांदेड शहरात शनिवारी (४ एप्रिल) मध्यरात्री पुन्हा एकदा टोळीयुद्धाचा भडका उडाला. येथील कुख्यात साईलाला आणि सदा

Iran Attack on Kuwait : इराणचा कुवैतमधील मंत्रालयाच्या इमारतींवर हल्ले

इराणने रविवारी (५ एप्रिल) कुवैतमधील अनेक इमारतींना लक्ष्य केले. कुवैतच्या वित्त मंत्रालयाने सांगितले की, तेल