Mohammed Shami : ज्याच्या निवृत्तीच्या चर्चा रंगला त्यानेच...; झहीर खानला पछाडत शमीने रचला नवा विक्रम!

आयपीएल २०२६ स्पर्धेत रविवारी (५ एप्रिल) डबल हेडर सामन्यांचा थरार रंगला असून हैदराबादच्या मैदानावर झालेल्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) संघाने दमदार सुरुवात केली. कर्णधार रिषभ पंत (Rishabh Pant) याने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि गोलंदाजांनी तो सार्थकी लावला.


या सामन्यात मोहम्मद शामी (Mohammed Shami) याने अप्रतिम कामगिरी करत इतिहास रचला. त्याने अवघ्या ४ षटकांत केवळ ९ धावा देत २ बळी घेतले. त्याची इकॉनॉमी २.२० इतकी प्रभावी होती. या कामगिरीमुळे तो लखनऊसाठी ४ षटकांच्या स्पेलमध्ये सर्वात कमी धावा देणारा गोलंदाज ठरला.


गेल्या काही महिन्यांपासून मोहम्मद शामीच्या निवृत्तीची चर्चा रंगल्या होत्या. मात्र त्याने आयपीएलच्या १९ व्या हंगामातील पहिल्या दोन सामन्यांमध्येच आपल्या गोलंदाजीच्या जोरावर निवृत्तीच्या चर्चांना चोख उत्तर दिलं आहे.





शमीने आपल्या स्पेलची सुरुवातच आक्रमक पद्धतीने केली. पहिल्याच षटकात त्याने अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) याला बाद केले, तर पुढील षटकाच्या पहिल्याच चेंडूवर स्फोटक फलंदाज ट्रॅव्हिस हेड (Travis Head) याला माघारी पाठवले. यापूर्वीच्या सामन्यात त्याने के एल राहुल (KL Rahul) याला पहिल्याच चेंडूवर बाद केले होते. या कामगिरीमुळे त्याने पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या यादीत जाहीर खान (Zaheer Khan) याला मागे टाकत सातव्या स्थानावर झेप घेतली. या यादीत भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) अव्वल स्थानावर आहे.





विशेष म्हणजे, शमी मागील हंगामात सनरायझर्स हैद्राबाद (Sunrisers Hyderabad) संघाचा भाग होता. २०२५ मध्ये त्याचा फॉर्म खराब राहिला होता. त्याने ९ सामन्यांत फक्त ६ विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे त्याला ट्रेडद्वारे एलएसजीमध्ये आणण्यात आले. मात्र, यंदा त्याने आपल्या जुन्याच संघाविरुद्ध शानदार कमबॅक करत सर्वांना प्रभावित केले.


दरम्यान, एलएसजीचे मालक संजीव गोएंका (Sanjiv Goenka) सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित होते. शमीची घातक गोलंदाजी पाहून त्यांनी तिरुपती बालाजींचा फोटो डोक्याला लावत आनंद व्यक्त केल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Comments
Add Comment

India vs Sri Lanka : कोलंबो कसोटीत पावसाच्या व्यत्ययाचा भारताला फटका, श्रीलंकेची १६ धावांची आघाडी; पाचव्या दिवशी रंगणार निर्णायक लढत

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात पावसाने पुन्हा एकदा व्यत्यय आणला. त्यामुळे चौथ्या

WCL Season 3 : डब्ल्यूसीएलचा तिसरा हंगाम संयुक्त अरब अमिरातीत होणार

नवी दिल्ली : वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स (डब्ल्यूसीएल) आपल्या बहुप्रतिक्षित तिसऱ्या हंगामासह परत येण्यास

Sanjay Manjrekar : वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वालच्या आक्रमक वर्तनावर मांजरेकरांचा संताप; BCCI-ICC कडे कारवाईची मागणी

मुंबई : माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी युवा भारतीय क्रिकेटपटूंच्या

Anaya Bangar : पुरूषाची महिला झाल्यानंतर आता अनाया बांगरच्या कमबॅकचा मार्ग मोकळा; 'या' लीगमधून उतरणार मैदानावर

Anaya Bangar WBBL : अनाया बांगरने (Anaya Bangar) क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. क्रिकेट

BWF world rankings : बीडब्ल्यूएफ जागतिक क्रमवारीत त्रिशा आणि गायत्रीची मोठी झेप

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या बॅडमिंटन विश्वचॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर, भारतीय महिला दुहेरी

Rahul Dravid : टीम इंडियाला डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी, पण मार्ग खडतर - राहुल द्रविड

नवी दिल्ली : भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे मत आहे की, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी)